Author: Kishor Koli

लिंबाचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. त्यात व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने, डॉक्टर देखील त्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेमुळं लिंबाचा वापर (लिंबू लागवड) वाढला आहे. उन्हाळ्यात तर त्याचे भाव गगनाला भिडतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की अनेक शेतकरी याच्या लागवडीतून दरमहा दीड लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत. त्यामुळं कागदी लिंबाची लागवड करुन तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. अलीकडच्या काळाज कागदी लिंबाच्या लागवडीत वाढ होत आहे. कागदी लिंबाचे एक रोप सुमारे २०० रुपयांना मिळते. विशेष म्हणजे हे लिंबाचे एक झाड सलग १२ वर्षे फळ देते. एवढेच नाही तर लिंबाच्या या जातीमध्ये सामान्यपेक्षा जास्त फळे आहेत. एका झाडाला…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाच्या घोषणेवर मंत्री गरीश महाजन यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे यांना २० जानेवारीला मुंबईकडे येण्याची गरज पडणार नाही. कारण त्यापूर्वी मराठा आरक्षणा विषय सरकार मार्गी लावणार असल्याचे महाजन म्हणाले आहे. नांदेड येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी महाजन म्हणाले की, मनोज जरांगे यांनी बीडला सभा घेतली. या सभेत त्यांनी २० जानेवारी ची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आम्ही मुंबईला येऊन उपोषण करणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे.…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी वरणगाव शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा दर्जा खालावल्यामुळे संपूर्ण योजनेचेच तीन तेरा वाजले आहेत. हा विषयच बाजूला आहे. तथापि, या योजनेचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्या ‘अरिहंत’ च्या शहा नावाच्या ठेकेदाराने बँक ग्यारंटीच बोगस दिली आहे. तरीही शासनाचा पगार घेणारे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी निकम, वरणगावचे शेख, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे पवार या तिघांनी संबंधित ठेकेदारासाठी पायघड्या घालून २५ कोटीच्या पाणी योजनेची वाट लावली आहे. ठेकेदाराने बॅँक ग्यॅरंटी बोगस सादर केली असल्याचे उघडकीस येवून देखील तरीही ठेकेदाराला हे तीन शासनाचे प्रतिनिधी पाठिशी घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वरणगाव नगरपरिषदेला महाराष्ट नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी अमळनेर येथे संमेलन स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर त्यांनी पीडब्लूडी, तहसील, पोलीस, एमएसईबी, नगरपालिकेसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत जबाबदाऱ्या निश्चित केल्या. संमेलनासाठी प्रशासनातर्फे प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी संमेलनाचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन काही सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कॅफेत तरुण-तरुणींचा अनैतिक प्रकार सुरु होता. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांना माहिती मिळाली. त्यांनी चाळीसगाव पोलिसांसह कॅफेवर धाड टाकली. यावेळी त्यांना अत्यंत धक्कादायक प्रकार आढळुन आला. हा प्रकार पाहून संताप अनावर झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेची तोडफोड केली. दरम्यान, कॅफे चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. कॅफे मालकाने तरुण आणि तरुणींना अनैतिक कृत्यासाठी जागा दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मंगेश चव्हाण यांनी पोलिसांसह केलेल्या छापेमारीत तरुण-तरुणी गैरकृत्य करताना आढळून आल्याचे समोर आले. गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका…

Read More

सांगली : वृत्तसंस्था अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यापासून माजी खासदार शालिनीताई पाटील या अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी पुन्हा पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील”, असा दावा पाटील यांनी केला आहे तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे पाटील म्हणाल्या. अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबर गेल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर शालिनीताई म्हणाल्या, तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभे राहता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत अजित…

Read More

नाशिक : प्रतिनिधी अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत उद्धव ठाकरे यांचा समावेश नसल्यामुळेच त्यांना राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावण्यात आलेले नाही, असे वक्तव्य भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. राममंदिराच्या उभारणीत किंवा कारसेवा अशा दोन्ही गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळेच सरकारने त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिलेले नसावे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण न देण्याच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले. राम मंदिर आंदोलनाचे आपण…

Read More

बदलापूर : वृत्तसंस्था वरिष्ठ गटाच्या 54 व्या महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात नागपूर संघाने पुणे संघाला नमवत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले तर पुरूष गटात मुंबई संघाने नागपूरच्या संघाला पराभूत करत अजिंक्यपद मिळवले. अविष्कार सांस्कृतिक व क्रीडा मंडळ तसेच व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ही स्पर्धा बदलापूर पश्चिमेतील बदलापूर जिमखाना येथे रंगली. मानाची समजली जाणारी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अजिंक्य पद स्पर्धा नुकतीच बदलापुरात पार पडली. गेल्या 54 वर्षांच्या इतिहासात मुंबई महानगर प्रदेशात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान ठाणे जिल्ह्याला आणि बदलापूर शहराला मिळाला. बदलापूर जिमखाना येथील भव्य मैदानात चार दिवस ही स्पर्धा रंगली. स्पर्धेचे उद्घाटन मुरबाड…

Read More

पुणे : वृत्तसंस्था शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील ओपिनियन पोलवर मत मांडले आहे. ते म्हणाले की, सर्व्हे नेहमी येत असतात. त्यात ते अनेकवेळा खरे-खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते पण प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला. त्यामुळे सर्व्हेेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये असेही शरद पवार यांनी येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना स्पष्ट केले. …इंडिया…च्या दिल्ली येथील बैठकीत मी स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांना प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे, असे सांगितल्याचेही शरद पवार म्हणाले.त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मविआची शक्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजपासह महायुतीसमोर मोठे आव्हान उभे…

Read More

पुणे : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातदेखील याचा फैलाव होताना दिसत आहे.अशातच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.आता राज्याच्या आरोग्ययंत्रणा सतर्क झाल्याचे पहायला मिळत आहे.त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात यावर माहिती देत राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत पण अपेक्षा करूया की, याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. गेल्या काही वर्षात लोकांना अनुभव आला आहे, जनतेला याचा त्रास झाला आहे. त्यामुळे…

Read More