Author: Kishor Koli

१ लाख २४ हजार क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :  हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरण पातळीत वाढ होत असल्याने दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हतनूर धरणातून ३५१७ क्युमेक्स (१२४२०३ क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासाठी धरणाची एकूण २० गेट पूर्णपणे उघडण्यात आली आहेत, अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली. नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदारांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आले.

Read More

साग जातीच्या बेलन तस्करांवर कारवाई साईमत/अडावद/ता.चोपडा/प्रतिनिधी – चोपडा तालुक्यातील विष्णापूर ते वर्डी रस्त्यावर वनपाल शीतल माळी यांनी विनापरवाना साग जातीच्या बेलन तस्करांवर कारवाई केली. या कारवाईत साग जातीचे मोठे बेलन ९५५ नग व लहान ८७७ नग आणि अंजन जातींचे ३०७ असे एकूण २१३९ अनघड बेलन नग जप्त करण्यात आले आहे. मात्र बेलन तस्करर फरार झाले. दि.१४ रोजी सकाळी वनपाल विष्णापूर राऊंड शीतल माळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून काही इसम बेकायदेशीर विनापरवाना साग जातीचे बेलन याची वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरून विष्णापूर ते वर्डी रस्त्यावर शितल माळी यांनी आपल्या राऊंड स्टाफसह सापडा रचला. काही जण संशयितरित्या हालचाल करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर…

Read More

रोप भेट देण्यासाठी अश्विन सुरवाडे यांनी घेतला पुढाकार साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी/: ‘झाड माझ्या दादांचं’ या उपक्रमांतर्गत विविध झाडांचे वृक्षारोपण व्हावे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन व जतन व्हावे या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभेचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्विन सुरवाडे यांच्या पुढाकाराने मुक्ताईनगर शहरातील वरिष्ठ महाविद्यालयांना भेट म्हणून रोपे देण्यात आले. जैवविविधतेचा विचार करुन झाडे लावून हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात यावे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नातून वृक्षारोपण करणे या उद्देशाने मुक्ताईनगर शहरातील जी.जी. खडसे महाविद्यालय, शासकीय कृषी महाविद्यालय, संत मुक्ताबाई महाविद्यालय येथील प्राचार्य यांना रोप भेट म्हणून देण्यात आले. यात सर्वसाधारणपणे आवळा,…

Read More

जळगाव । प्रतिनिधी मुक्ताईनगर येथील पोलिस ठाण्यात दाखल सी.आर.क्रं. ६३/२०२५ च्या केस प्रकरणी ॲड. केतन जयदेव ढाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्याच्या विधी व न्याय विभागाने केली असून त्यासंबंधीचे लेखी आदेश मंगळवारी (१८ मार्च) येथे प्राप्त झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे यात्रोत्सवामध्ये मुलींची छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याप्रकरणी दाखल न्यायालयीन खटल्यास ॲड. केतन ढाके स्पेशल पब्लिक प्रॉसेक्युटर अर्थात सरकारी वकील म्हणून सरकार पक्षातर्फे काम पाहतील.

Read More

यावलला सकल धनगर जमातीचे ‘रास्ता रोको’ आंदोलन साईमत/यावल/प्रतिनिधी : धनगर जमातीला अनुसूचित लजमाती (ST) चे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने यावल येथे सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ टी पॉईंटवर ‘रास्ता रोको’ आंदोलन शांततेच्या मार्गाने पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन करीत यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आत्तापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली असल्याने जमातीत अजूनही सरकार केवळ देखावा अथवा वेळ काढूपणा तर करत नाही ना अशा भावना येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी…

Read More

एक तास वाहतुकीची झाली कोंडी साईमत/रावेर/प्रतिनिधी : पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी व धनगर (ST) आरक्षण अंमलबजावणीसाठी रावेर येथील नवीन विश्रामगृह जवळील बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने धनगर समाज उपस्थित होता. त्यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती. याप्रसंगी संदीप सावळे, राजन लासुरकर, ॲड. प्रवीण पाचपोहे , सुरेश धनके यांनी समाजाच्या मागण्या शासनाने पूर्ण करावे, यासाठी भाषण केले. धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र मिळावे, अशा प्रमुख मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय तायडे यांना देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. धनगड…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे भरधाव डंपर आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी ओमनी वाहनाने शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी जळगाव येथे काही कामानिमित्त येत होते. त्यावेळेला सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार ही भुसावळ तालुक्यातील सूनसगाव जवळून जात असतांना भरधाव डंपरने त्यांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (वय ५२), कारकून…

Read More

साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल  संपूर्ण जगात ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त यावर्षीही यावल येथील आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयातर्फे कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कार्यक्रम शुक्रवारी, ९ ऑगस्ट २०२४ रोजी यावल येथे सकाळी १० वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल सार्वजनिक बांधकाम उपविभाग आवारात शासकीय कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हाधिकारी जळगाव, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्ते, आदिवासी सेवक, आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासह पंचक्रोशीतील अंदाजे ४ ते ५ हजार आदिवासी बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत. जागतिक शासकीय आदिवासी दिन उत्सव कार्यक्रम तसेच विविध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सरूवात झाली. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आमदार सुरेश भोळे यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहीरी पोवाडा, देशभक्तीपर गीत, वहीगायन, भावगीते, मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस कला सादर करणार आहेत. खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागर सखींचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा झाली. आमदार सुरेश भोळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जळगांव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, शैलेश मोरखडे, मनोहर पाटील, डॉ. पी. आर चौधरी, अनिल कांकरीया,…

Read More

धुळे : प्रतिनिधी मोटार अपघात दाखल करुन वाहन सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील आणि हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने हे वाहन धुळ्यातील देवपूर पोलिसांनी जप्त केले होते. या किरकोळ अपघाताबाबत मोटार अपघात दाखल करुन संबंधितांचे वाहन सोडण्यासाठी देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील, हवालदार रवींद्र मोराणीस या दोघांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे संबंधित वाहन मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली. पथकाने १७ जानेवारीच्या रात्री साडेनऊ…

Read More