Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेता आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. “सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन”, असे चाकणकर यांनी म्हटलं आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना कोरोना झाल्याने नेते मंडळींच्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली आहे. राऊतांच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत असून आमदार, खासदारांपासून ते अनेक…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्याप्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याने निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलीस दलातील ५५ वर्षांवरील वयोगटाच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गुरुवारी माध्यमांना ही माहिती दिली. त्यामुळे आता पोलीस दलाला कमी मनुष्यबळ उपलब्ध असेल. मात्र, कोरोनाच्या यापूर्वीच्या दोन लाटांवेळी पोलीस दलाने अशाचप्रकारे काम केल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मुंबईत गेल्या २४ तासांत ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. सक्रीय पोलीस रूग्णांची संख्या २६५ वर जाऊन पोहचली आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत १२३ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित…

Read More

अमृतसर, वृत्तसंस्था । देशात गेल्या दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या हजारोंच्या पटीने वाढत आहे. ओमिक्रॉनचा अनेकांना संसर्ग होत आहे. आता एअर इंडियाच्या इटली-अमृतसर फ्लाइटमध्ये जवळपास १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व प्रवासी अमृतसर विमानतळावर उतरले होते. याची माहिती विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिलीय. अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून निघालेले एअर इंडियाचे विमान उतरले. या विमानातील १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानात एकूण १८० होते. करोना संसर्ग झालेल्या सर्व प्रवाशांना आयसोलेट करण्यात आलं आहे. त्यांचे नमुने घेऊन ते ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे, अमृतसरचे पोलीस उपायुक्त गुरप्रीस सिंगही करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पंजाबमध्ये…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत आयुक्तांच्या चौकशीसाठी अमोल कोल्हे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. जळगाव शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागात भ्रष्टाचार , अनागोंदी कारभार सुरू असुन अजेंट सक्रिय आहे व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू आहे असा आरोप सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केलेला आहे . तसेच त्यांनी या भ्रष्टाचार व त्रासाविषयी आवाज उचलण्याचे जळगावकर जनतेला जाहीर आवाहन देखील केलेले आहे . वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असलेले अभियंता व कर्मचारी यांच्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता वाढते म्हणुनच यासंदर्भात छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी देखील वर्षभरापूर्वी दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी महानगरपालिका…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी करोनाचा शिरकाव झाला आहे. ‘शिवतीर्थ’वरील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या पुढील १० दिवसांतील कार्यक्रम आणि बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. मुंबईतील लोकल ट्रेन इतक्यात बंद होणार नाही, पण नाईट कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊनचा प्रस्ताव विचाराधीन: टोपे मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. २००८…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आणि नाशिक जिल्ह्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ग्रामीण भागाशी निगडित ही कामे वेगाने मार्गी लावता येत असल्याची भावना यावेळी श्री. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही दुरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थिती लावून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि या योजना वेळेत पूर्ण होतील आणि कामे दर्जेदार होतील याकडे…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,०८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…

Read More

गुजरात, वृत्तसंस्था । गुजरात गॅस गळतीविमुळे विश्व प्रेम डाईंग अॅण्ड प्रिटिंग मिलजवळ एका टँकरमधून गॅस गळती झाल्याने मिलमधील चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. विश्व प्रेम डाईंग अॅण्ड प्रिटिंग मिलजवळ एका टँकरमधून गॅस गळती झाल्याने मिलमधील चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गुदमरल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान २५ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर आहे. पहाटे प्रिटिंग मिलमध्ये झालेल्या या दुर्घटनेनंत खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलजवळ असलेल्या नाल्यात एका अज्ञात टँकरचा चालक विषारी केमिकल टाकत होता. यावेळी विषारी वायूची गळती होऊ लागली. जवळच असणारे मिलमधील कर्मचाऱी या विषारी वायूच्या संपर्कात आले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर…

Read More

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी ५ जानेवारी रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २३८ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिव्यांगांच्या तपासणीच्या कामकाजाची पाहणी केली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या. ज्या दिव्यांग बांधवानी ५ जानेवारीचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तसेच ज्यांना परिवहन सेवेच्या (एसटी बस वगैरे) अडचणींमुळे मागील बुधवारी येता आले नाही अशा ३८ दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी हि…

Read More