जळगाव । शिवाजीनगरमधील हुडको परिसरात 30 डिसेंबर रोजी रात्री 2 वाजता झालेल्या दगडफेकीतील जखमी शकील अली उस्मान अली (वय 30, रा.शिवाजीनगर, हुडको) याचा बुधवारी दुपारी 2 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. हुडको परिसरात 30 डिसेंबर रोजी रात्री 2 वाजता किरकोळ कारणावरुन दगडफेक झाली होती. या वादाशी काहीही संबध नसलेला शकीलअली उस्मानअली हा युवक घराबाहेर आला असता त्याच्या डोक्याला दगड लागला. यात गंभीर जखमी झाल्याने त्यास खासगी रूग्णालयात दाखल केले. उपचारानंतर शकील घरी गेला होता. त्याची तब्बेत बुधवारी पुन्हा खालावली. त्यास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Author: saimat team
जळगाव । रामेश्वर कॉलनीतील विवाहितेने माहेरहून एक लाख रूपये आणावे यासाठी तिचा छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली (ता.जळगाव) येथील माहेरवासीण गणेश वंजारी यांचा विवाह गणेश संजय लाडवंजारी यांच्याशी झाला. लग्नानंतर दोन महिन्यांनी गणेश लाडवंजारी याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. माहेरुण एक लाख रूपये आणण्याची मागणी केली. मात्र, वडील पैसे देवून शकत नसल्याने सासरे, दिर आदींनी विवाहितेचा मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी गेली. तिच्या फिर्यादीवरून बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती गणेश लाडवंजारी, सासरे संजय लाडवंजारी, सासू मनीषा संजय लाडवंजारी, दीर संजय लाडवंजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.…
जळगाव । तालुक्याक्यामधील खेडी बुद्रुक परिसरातील वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरचालकाविरुद्ध महसूल विभागाने कारवाई केली. याबाबत डंपरचालकाविरुद्व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खेडी बुद्रुक परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार राहूल वाघ यांनी मिळाली. मंगळवारी रात्री ११ वाजता महसूल पथक गस्तीवर असतना खेडी बुद्रुक परिसरात डंपर (क्र .एमएच १९ बीएम ४४४३) ने वाळू वाहतूक होताना आढळले. याबाबत नायब तहसीलदार राहूल वाघ यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक ज्ञानेश्वर प्रल्हाद कोळी यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झा ला आहे. तपास नाईक दिनेश पाटील करीत आहे.
मुंबई, वृत्तसंस्था । बारामती तालुक्यातील विविध गावांमधील पाणी समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या मागणीनुसार आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या योजनांचा प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. याच्या अंतर्गत तब्बल ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या योजनांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश आज ना. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन सुपूर्द केली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत जळगाव जिल्ह्यातील बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठीचा सुधारित निधी आणि बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा याबाबतची चर्चा करण्यात आली असून याला उपमुख्यमंत्र्यांनी सनिधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. या संदर्भात वृत्त असे की, बारामती तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या…
जळगाव, प्रतिनिधी । रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना लोकाभिमुख आणि पारदर्शक वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची रचना तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि. ६ जानेवारी रोजी नवीन वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. विजय गायकवाड यांची तर उप वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. योगिता बावस्कर, डॉ. नरेंद्र पाटील यांची नेमणूक देखील जाहीर केली आहे. रुग्णालयाच्या कारभारात सुसूत्रता यावी, रुग्णांना उपचार घेतांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी डॉ. जयप्रकाश रामानंद प्रयत्नशील आहेत. पुढील काळात मनुष्यबळाचे योग्य पद्धतीने नियोजन करून पारदर्शक लोकाभिमुख रुग्ण सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत आहे.…
भुसावळ, वृत्तसंस्था । राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा बाळगून तो विक्रीसाठी रीक्षातून नेणार्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. संशयीताच्या ताब्यातून सुमारे 28 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 5 रोजी शहरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर करण्यात आली. बाजारपेठ पोलिसांना काही संशयीत सिंधी कॉलनीत गुटखा घेण्यासाठी येणार असल्याची व गुटख्याची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी साडेचार वाजता शहरातील पुरानी श्रीचंद दरबार सिंधी कॉलनीजवळ रीक्षा (क्रमांक एम.एच.19 बी.यु 3046) आल्यानंतर पोलिसांनी नवीन मोहनदास सोबानी (28, हनुमान नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ), भानुदास भीमराव तायडे (27, वांजोळा, ता.भुसावळ) व सय्यद सरफराज अली इलियाज अली (25, मारुळ, ता.यावल)…
“पत्रकारांच्या ओठावर स्मितहास्य असते;परंतु काळजात मात्र अनेक जखमा आणि वेदना जपत पत्रकार पत्रकारिता करीत असतात.” होय हे अगदी हे सत्य आहे. आणि तेहीअगदी सूर्यप्रकाशाइतके आज ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस त्यांनी दर्पणच्या माध्यमातून महाराष्ट्रात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली त्यांची ६ जानेवारी जयंती दिनी महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल “दर्पणकार” बाळशास्त्री जांभेकर यांसह महात्मा फुले, गो.ग. आगरकर, मेघाजी लोखंडे, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळकांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” अशा प्रकारचे ज्वलजहाल अग्रलेख लिहून ब्रिटिश सत्तेला हादरे दिले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या…
जळगाव, प्रतिनिधी । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती होण्यासाठी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालय आणि जळगाव सायबर क्राईम सेल यांच्यातर्फे “सायबर सुरक्षितता आणि जागरूकता” याविषयावर ता. ६ गुरुवार रोजी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव सायबर क्राईम सेलचे पोलीस उपनिरीक्षक अंगद नेमाने होते. यावेळी उपनिरीक्षक अंगद नेमाने यांनी जळगाव जिल्ह्यात झालेल्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत गुन्हेगार काय तंत्र वापरून कसे फसवतात याचे उदाहरण दिले. तसेच मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन अकाउंट आदीद्वारे विविध प्रकारे फसवणूक करण्यात येते.…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे काल संध्याकाळ 8 वाजेला महेश ज्ञानेश्वर पाटील हा महादेव मंदिर पिंपळगाव बुद्रुक येत्यावेळी ढोल ताशा सह फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले, यावेळी माजी सरपंच नानाभाऊ पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधाकर महाजन यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, महेश हा 3 वर्षाच्या असतांनाच आईचा मृत्यू झाला होता आणि 2007 मध्ये वडिलांचाही मृत्यू झाला होता, यामुळे महेश वर मोठे संकट कोसळले होते, महेश हा कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन आज महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे गावातील आनंदाचे वातावरण तयार झाले, यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जामनेर तालुका अध्यक्ष: संतोष पांढरे साईमत…
अमलवाडी ता चोपडा : तालुक्यातील अमलवाडी येथील रहिवासी दान सिंग रुपसिंग सुळे तथा अमलवाडी गावाचे माजी सरपंच होते.दानसिंग पावरा हे सकाळ झाली पाहता आपल्या घराबाहेरील अगनात आले असता त्यांना म्हशी गायब झालेल्या दिसुन आल्या त्याच्या राहत्या घरासमोरून २ म्हशी अज्ञात चोरुट्याने सकाळी चारचाकी वाहन गावाबाहेर लावुन कोणला नकळता अज्ञात चोरट्यांने २ म्हशी गाडीत टाकून लपास झालेला आहे. हे दृश्य दानसिंग रुपसिंग पावरा यांना कळताच लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली की सरपंचाच्या घरी जर चोरी होऊ शकते तर साधारण नागरिकाचा विषयच वेगळा आहे यामुळे अमलवाडी येथील लोकांच्या मनात भिंती व चोरट्यांनमुळे दहशत निर्माण झालेली आहे गावात एकच खळबळ उडाली की…