जळगाव, प्रतिनिधी । शेकडो अनाथांना मायेची सावली देणाऱ्या मातृहदयी सिंधुताई सपकाळ यांच्या सेवाव्रती कार्याचा अव्याहतपणे पुढे नेण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्प जनसेवा विचारधारा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात जनसेवा विचारधारा फाऊंडेशनने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. श्रद्धांजली सभेत संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, बाराबलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष- किशोर सुर्यवंशी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे – हरिश्चंद्र सोनवणे, माजी नगरसेवक – सुनिल माळी, बुलंद छावा संघटनेचे – प्रमोद पाटील, मराठा छावा संघटनेचे अमोल कोल्हे, विद्रोही कवी – वसंततात्या सपकाळे,…
Author: saimat team
मुंबई :- प्रतिनिधी माजी मंत्री आणि भाजपाचे (BJP) प्रमुख नेते आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून याची माहिती देतील. २०२० मिळाली होती धमकी आशिष शेलार यांना २०२० मध्ये देखील ठार मारण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती. पुन्हा एकदा आशिष शेलार यांना धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. आशिष शेलार हे महाविकास आघाडी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत. आशिष शेलार…
मुंबई :- प्रतिनिधी जाब मधील गुरुदासपूर जवळील एका पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ताफा २० मिनिटे अडकून पडल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीच्या चर्चेला सर्व माध्यमातून उधाण आले आहे. ही घटना म्हणजे सुरक्षेतील गंभीर चूक मानली जात आहे. केंद्र सरकारने यावरून पंजाबमधील काँग्रेस (Congress) सरकारवर टीका करत गंभीर आक्षेप घेतले आहेत. दुसरीकडे पंजाब सरकारने देखील या सगळ्या प्रकरणात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरीकडे ज्या आंदोलक शेतकऱ्यांमुळे पंतप्रधानांचा ताफा अडकला असे सांगितले जात आहे, त्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी देखील यासंदर्भात आपली चूक नसल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडीवरून आता शिवसेनेनं (Shivsena) सामनातून केंद्रातील भाजपा सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा…
मुंबई, वृत्तसंस्था । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. बीकेसी मध्ये 2400 बेडपैकी 800 बेड्स वर रुग्ण ऍडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील 99.99 लोक…
जळगाव, प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या संघाने तृतीय क्रमांकाचा मान पटकावला. नूतन मराठा महाविद्यालयाच्या आउटडोअर मैदानात हे सामने पार पडले. यात हर्षल पाटील, हार्दिक जैन, तन्मय देशमुख या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली तसेच यावेळी सर्व विजयी खेळाडूंना उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. ए. गायकवाड यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. तसेच रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले. स्पर्धेतील या विजयी खेळाडूना रायसोनी महाविध्यालयाचे क्रीडा संचालक संजय जाधव…
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । श्री कानिफनाथ महाराज यांची मूर्ती चोरी करून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. यात हि मूर्ती तीन तासात सापडली आहे. तालुक्यातील उचंदा गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री कानिफनाथ महाराज यांची मूर्ती चोरट्यांनी रात्री चोरली होती. दरम्यान चोरीस गेलेली कानिफनाथ महाराज यांची मूर्ती अवघ्या तीन तासात सापडली. यामुळे चोरट्यांनी देव चोरला परंतु केवळ तीन तासातच देव पुन्हा परतला. या घटनेने संपूर्ण गावात व तालुक्यात खळबळ उडाली. सदर घटना सकाळी सहा वाजता किशोर भोलाने यांच्या निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली. घटनास्थळी पोलिस प्रशासन, गावचे पोलीस पाटील हे दाखल झाले. जळगाव वरून काही पथकही थोड्याच वेळात त्याठिकाणी आल्याने…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महापालिका व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत नारीशक्ती गृप जळगाव व रोटरी क्लबच्या वतीने आणि आदित्य ढवळे पाटील सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.२१ सप्टेंबर रोजी शहरी बेघर निवारा केंद्र, जळगाव येथे ८ लाभार्थ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले होते. या सर्व मोतिबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांना व सर्व आजी-आजोबांना नारीशक्ती गृप जळगाव वतीने सुकामेवा चे लाडू महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.याप्रसंगी जळगाव शहराच्या विद्यमान महापौर जयश्रीताई महाजन, नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.मनिषाताई पाटील, सुमित्रा पाटील, ॲड.सिमा जाधव, नूतन तासखेडकर, आशा चौधरी, मनोज कुलकर्णी, राजेंद्र मराठे यांच्यासह ज्योती राणे ,भावना चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री क्षेत्र पद्मालय, जळगावपासून सुमारे 30 किमी अंतरावर स्थित आहे. पद्मालय हा शब्द ‘पद्म’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांचा मिलाफ आहे जो संस्कृतमध्ये कमळाचे घर आहे. हे मंदिराच्या जवळ कमळ तलाव असलेले भगवान गणेशला समर्पित आहे. पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानित आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत – आमोद आणि प्रमोद. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे. या तलावातील कमळाच्या फुलांनी भरलेला होता त्यामुळे मंदिरांना पद्ममालय असे…
इंदूर, वृत्तसंस्था । इंदूरमधील जावेद हबीबने चालवलेले सर्व सलून ४८ तासांच्या आत बंद करावेत, असा इशारा भाजप नेते आणि इंदूरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी शुक्रवारी दिला. हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका क्लिपमुळे अडचणीत सापडला आहे ज्यामध्ये तो कार्यशाळेत महिलेच्या केसांवर थुंकताना दिसत आहे. शहरातील सर्व जावेद हबीब सलून बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विजयवर्गीय यांनी दिला आहे. इंदूरमधील जावेद हबीबची सर्व सलून आणि केंद्रे बंद करण्याची मागणी या भाजपा नेत्याने ट्विटरवर केली. “हा व्हिडिओ शहरातील सर्व जबाबदार प्रशासकीय अधिकार्यांसाठी आहे, ज्यात जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलिस आयुक्त आणि इतरांचा समावेश आहे. अलीकडेच आम्ही एक व्हिडिओ…