Author: saimat team

मुक्ताईनगर : प्रतिनिधी I तालुक्यातील खामखेडा येथे मावस भावाकडे लग्नानिमित्त आलेल्या रावेर तालुक्यातील महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात हरवल्याची नोंद केल्या नंतर निष्काळजीपणामुळेच व वेळेवर जिल्हा पोलीस अधीक्षकांना हरवल्याचा ईमेल न पाठवल्याने नाहक जीव गेल्याचा आरोप निळा निशानचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी केला आहे. विटवा तालुका रावेर येथील ज्योती विलास लहासे वय 31 या विवाहित महिलेचे प्रेत खामखेडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकडी वन विभागाच्या 441 व 442 हद्दीत असलेल्या एका साचलेल्या नाल्याच्या पाण्या ठिकाणी 31 डिसेंबर रोजी आढळून आला होता. सदर घटने प्रकरणी निळा निशानचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन मिसिंग नोंद करणाऱ्या तसेच मिसिंगचा तपास…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था I भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली. देशात आणि राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राजकीय नेते आणि मंत्री यांनाही कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्रात 12 आणि 40 पेक्षाजास्त आमदार आणि राजकीय नेत्यांना कोरोना झाला आहे.काही दिवासांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा यांच्यानंतर आता गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच याआधी केंद्रीय राज्यमंत्री…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अभिनेता हेमंत बिरजे जखमी झाला आहे. हेमंत बिरजे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगीही गाडीत होती. अपघातात त्यांनाही दुखापत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कारने दुभाजकाला दिलेल्या धडकेनंतर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 1985 मध्ये आलेल्या ‘टार्जन` चित्रपटामुळे हेमंत बिरजे प्रसिद्धीस आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूड अभिनेता हेमंत बिरजे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत असताना हा अपघात झाला. तळेगाव टोलनाक्याजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारने दुभाजकाला धडक दिली. अपघातात पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे”. हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही गंभीर…

Read More

पुणे : वृत्तसंस्था I राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पुन्हा बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांतील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Read More

चेन्नई : वृत्तसंस्था I दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने अखेर भारताची बॅडमिंटनपूट सायना नेहवालची माफी मागितली आहे. सिद्धार्थने सायना नेहलावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच्या या टीकेवरुन सोशल मीडियावरुन नेटिझन्सनी संताप व्यक्त केला होता. राष्ट्रीय महिला आयागानेही याची दखल घेत सिद्धार्थला नोटीस पाठवली होती. सिद्धार्थने माफी मागावी अशी मागणी सायना नेहवालच्या कुटुंबीयांकडून केली जात होती. त्यामुळे आपल्या त्या टीकेसंबंधी स्षष्टीकरण देत बाजू मांडल्यानंतर आता सिद्धार्थने ट्विटरवरच जाहीर माफी मागितली आहे.

Read More

जळगाव, विशेष प्रतिनिधी | शहरात सध्या महापालिका प्रशासनाच्या आदेशावरून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे.त्यात प्रामुख्याने महापालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित सहा रस्त्यावरील कच्ची व पक्की अतिक्रमणे हटविले जात आहेत.या कारवाईचे नागरिक स्वागत करीत आहेत मात्र या कारवाई अंतर्गत कोणत्याच प्रकारचा अडथळा न ठरणारे गांधी रोडवरील दुकानांचे ओटे तोडले जात आहेत.वास्तविक ते अतिक्रमण किंवा अवैध बांधकाम ठरत नसतांना अतिक्रमण विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर निर्दयीपणे हातोडा चालवीत आहेत आणि दुसरीकडे बेसमेंटचा दुरुपयोग करणाऱ्यांंना पाठीशी घातले जाते आहे.त्याबद्दल महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.महापालिका प्रशासन व पदाधिकारी याची दखल घेतील काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जळगाव शहरातील धुळयुक्त आणि…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था I केंद्र सरकारच्या सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालायाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. या ट्विटर अकाऊंटचे नाव आणि प्रोफाईल फोटोही बदलण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर बुधवारी सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली मात्र, आता खाते पूर्ववत करण्यात आले आहे. दरम्यान, हॅकर्सने नाव आणि फोटो बदलला आहे. हॅकर्सने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटचा फोटो आणि नाव बदलले होते. हॅकर्सनी प्रोफाईलवर एलोन मस्कच्या नावासह माशाचा प्रोफाईल फोटो अपलोट केला होता. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, आज (12 जानेवारी) सकाळी मंत्रालयाच्या खात्यात छेडछाड झाली…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज कोरोना अहवालात दिवसभरात २८५ रूग्ण आढळून आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहर-८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-५, चोपडा-२२, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २८५ रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ८९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर १९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती वसंतस्मृती भाजपा कार्यालय जळगाव येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी,प्रमुक वक्ते सुरेश कुलकर्णी,युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दिपक साखरे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते सुरेश कुलकर्णी यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेले स्वराज्य निर्मितीचे ध्येर्य आणि पाश्चात्य देशात भारतीय संस्कृतीची ओळख या विषयावर व्याख्यान केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात युवकांना महापुरुषांनी दिलेली प्रेरणा आचरणात आणण्याची गरज आहे असे…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । पुण्यातल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता यांचं आज निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते व त्यांच्यावर पूना हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हळूहळू अवयव निकामी होत गेल्याने त्यांचं निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून मेहता हे पुण्यातल्या पूना हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनसाठी उपचार घेत होते. मात्र अवयव निकामी होत असल्याने त्यांना दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज संध्याकाळी ४ वाजता अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सीईओ आणि एमडी, सुनील अनिल मेहता यांनी १९८६ मध्ये त्यांचे वडील अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली.…

Read More