Author: saimat team

???????? भाग पहिला -1???????? ???? नमस्कार मंडळी ???????? ????️ आज आपण देवांचे देव महादेव…????️ नवग्रह ज्यांच्या अधीन आहे त्या शिवशम्भो विषयी जाणुन घेऊ या. ???????? माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीस येणारे व्रत म्हणजे महाशिवरात्र होय.तसे म्हटल्यास प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीस शिवरात्र येते पण माघ महिन्यातील शिवरात्रीस विशेष महत्त्व म्हणून तिला “महाशिवरात्र” म्हटले आहे. ???????? ज्याला प्रत्येक सोमवारचा उपवास करणे जमत नाही त्याने किमान श्रावण सोमवारचे उपवास तरी करावेत पण ज्याला हे सुद्धा शक्य नाही त्याने महाशिवरात्रीचा तरी उपवास करावाच. दिवसभर उपोषण करून प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी केलेली पूजा ही अधिक फलदायी असते. ????यंदा महाशिवरात्र 1 मार्च मंगलवार रोजी आहे. ???????? शंकराला…

Read More

मलकापूर(सतीश दांडगे): येथील माकनेर तालुका मलकापुर जिल्हा बुलढाणा येथील विद्यार्थिनी अवंतिका शेषराव खरसने हि युक्रेन या देशात शिकण्यासाठी गेलेली असून तिला भारत देशात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एका निवेदनाद्वारे वडील शेषराव प्रभाकर खरसने यांनी मागणी केली आहे. युक्रेन नाटो संघटनेचे सदस्य होऊ इच्छित आहे मात्र रशियाचा त्याला विरोध आहे यावरून दोन्ही देश आमने-सामने आले आहेत. रशिया युक्रेनमध्ये संघर्ष पेटला असून दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची चर्चादेखील जगभर होऊ लागली आहे. भारतीय विद्यार्थिनी अवंतिका शेषराव खरसने ही विद्यार्थिनी युक्रेन देशातील नॅशनल पिर्गोव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी विनीतया येथे मेडिकल च्या प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेतला असून ती दि. 15 नोव्हेंबर 2021…

Read More

बोदवड : प्रतिनिधी सुहास बारी  तालुक्यातील येवती येथे शेतातील गोठ्यास व शेतखोलीसआग लागून एक बैल मरण पावला तर एक बैल, एक,गाय,व म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात एक लाख पस्तीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. येवती गावचे सरपंच यांचे लहान भाऊ पांडुरंग त्रंबक वाघ यांचे गावा लगतच्या शेतात असलेल्या गोठा व शेतीची औजारे व कुटार, कुट्टी असलेल्या खोलीस रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली .आग लागल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आग विझवली मात्र या आगीत एक बैल तात्काळ मृत्युमुखी पडला तर एक बैल ,गाय, व म्हैस गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जनावरांसाठी साठवून कुट्टी ,कुटार, जळून खाक…

Read More

चोपडा ( प्रतिनिधी )      मारवड (ता.अमळनेर) येथील मूळ रहिवासी हल्ली मुक्काम निवृत्ती नगर जळगाव येथील हिराबाई रामकृष्ण साळुंखे (७१) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या दूध संघाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण नथू साळुंखे यांच्या पत्नी तर अंजनविहिरे(ता.एरंडोल) येथील माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक शिक्षक कैलास साळुंखे व शामकुमार साळुंखे यांच्या मातोश्री,तसेच मारवड येथील सामाजिक कार्यकर्ते वासुदेव साळुंखे,ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या वहिनी व अमळनेर येथील पद्मश्री हॉस्पिटलचे संचालक धन्वंतवरी डॉ.विक्रांत पाटील यांच्या त्या काकू,सौ.कविता साळुंखे व सौ.कांचन साळुंखे यांच्या सासू तर चिं.कार्तिक साळुंखे व कु.मृदुला साळुंखे यांच्या आजी होत.तसेच जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या…

Read More

जामनेर (प्रतिनिधी):-  देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय यांनी दिनांक 23 रोजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करून मोठा गौप्य स्पोट केला आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे .या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असून भ्रष्टचारी मंत्री नवाब मलिक हे जोपर्यंत या पदावर राहतील तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही. म्हणून नवाब मलिक यांनी अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ते राजीनामा देणार नसतील तर माननीय मुख्यमंत्री व माननीय शरद पवार साहेब यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी. या  प्रकरणाची राष्ट्रीय तपासणी यंत्रणेमार्फत सखोल चौकशी  करण्यात…

Read More

नवी दिल्ली: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वापरणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. चॅटिंग, कॉलिंगपासून ते महत्त्वाच्या फाइल्स पाठवण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग होतो. आपण WhatsApp वर मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील अनेक ग्रुपचे सदस्य देखील असतो. अनेकदा ग्रुप अ‍ॅडमिन देखील असतो. ग्रुपवर येणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाते. मात्र, आता केरळ उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, कोणत्याही WhatsApp ग्रुपमध्ये येणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजसाठी ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मार्च २०२० मध्ये ‘फ्रेंड्स’ नावाच्या एका WhatsApp ग्रुपमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये लैंगिक कृत्यामध्ये सहभागी लहान मुलांना दाखवले…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. यंदाही महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणार असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला असून  यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष परशुराम तपासे आणि मनविसे मुंबई विद्यापीठाचे उपाध्यक्ष किरण मर्चंडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह  युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. महापालिकेत यंदाही शिवसेनेचा भगवा फडकणार असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे महापालिका निवडणूक युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी…

Read More

पहुर ता.जामनेर प्रतिनिधी –  कोरोनामुळे  उच्चशिक्षित बेरोजगार तरुण तरुणीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बेरोजगार तरुणाईला पोलीस व सैनिक होण्याची आजही तितकीच आशा आहे.स्पर्धेत कमी पडु नये,आज ना उद्या पोलीस भरती होईल या आशेने जिवतोड मेहनत करणाऱ्या तरूणांसाठी पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील व माजी सभापती निता कमलाकर पाटील या दाम्पत्याने शिवजयंतीनिमित्त पोलीस तसेच सैन्यदलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते यात लेखी परीक्षा व मैदानी शिबिरासाठी जवळपास ४५० तरूण तर ६० तरुणीनी सहभाग नोंदविला ग्रामीण भागातील शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उच्चशिक्षित युवक सुद्धा इतर ठिकाणी नोकरी मिळत नसल्याने या क्षेत्राकडे वळत आहेत परंतु इथे…

Read More

फैजपूर:प्रतिनिधी येथील हजीरा मोहल्ला येथे मुदस्सर नज़र युवा मंच तर्फे आयोजित ई श्रम योजना मोफत नांव नोंदणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुदस्सर नज़र युवा मंचचे उपक्रम स्तुत्य आहे.  समाजासाठी लोकहिताचे कार्य करून दाखवण्याची एक उत्तम संधी असते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अब्दुल जलिल शेख, जफर मेंबर, शेख कुरबान, कलिम मेंबर, आसीफ मॅकेनिक, मारूळ चे सरपंच असद अहमद, आर क्यु शेख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आसीफ मॅकेनिक व मुदस्सर नज़र यांनी केले होते. रहीम मलक वाहेद, मलक कलिम मिस्त्री, वसीम इकबाल, अजिम बुरहान ,अल्ताफ खान,…

Read More