Author: saimat team

जळगाव :  शहरातील भारत विकास परिषद, शाखा जळगाव देवगिरी प्रांततर्फे काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी नेहरू चौक भागात प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भारत विकास परिषदेचे श्री.विशाल चोरडिया, श्री.पीयूष गांधी यांच्यासह पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Read More

जळगाव: युवा सेना व ‘महापौर सेवा कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त आज बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी शहरातील पंडित नेहरू चौक, जुन्या जळगावमधील रथ चौक, मेहरुणमधील विठ्ठल मंदिर चौक या ठिकाणी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच काव्यरत्नावली चौकात युवा सेनेचे विस्तारक श्री.किशोर भोसले व शिवसेनेचे नगरसेवक श्री.नितीन बरडे, तर ख्वाजामियाँ चौकात शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख श्री.गजानन मालपुरे व युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. शिवराज पाटील यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी…

Read More

जळगाव : लोकशाही ही एक जीवन पद्धती असून, तो एक राज्यघटना व राज्यव्यस्थेचा प्रकार आहे. भारतात सर्वच निवडणुका या मुक्त, पारदर्शक व निर्भीडपणे पार पाडण्याकरिता लोकशाही समृद्ध करण्यासह ती जपण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध व्हायला हवे, असे भावनिक आवाहन जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेतर्फे काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी महापालिका आवारात आयोजित ध्वजवंदन कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते पार पडला, याप्रसंगी त्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून लोकशाही म्हणजे नेमके काय? यासंदर्भातील उलगडा करताना बोलत होत्या. महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त सौ.विद्या गायकवाड, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, सामान्य प्रशासन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी    विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वेतील निवृत्त अधिकारी पद्माकर नाईक हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मनोज भादूपोता यांनी करून दिला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, शाळेचे प्राचार्य गणेश पाटील समन्वयिका का संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व कार्यक्रमाचे प्रमुख पद्माकर नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी एन.सी.सी परेड सादर केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार व योगासनाचे विविध प्रात्यक्षिक मंजुषा भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. विधी किनगे या विद्यार्थिनीने एरियल सिल्क चे…

Read More

जळगाव : जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोणाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना बुधवारी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी गुरुवारी कोरोना चाचणी केली. डॉ.मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी आवन केले आहै कि त्यांचा संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घ्यावी .

Read More

यावल ( सुरेश पाटील) यावल तालुक्यात 15 वर्षाच्या मुलीवर 2 अल्पवयीन मुलांकडूनच आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पत्र याबाबत यावल पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच पोलीस पथकाच्या माध्यमातून तात्काळ चौकशी करून अल्पवयीन दोन संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की बुधवार दि.26 जानेवारी 2022 रोजी दुपारी2:30 ते 3 वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन पीडित मुलगी शौचास गेली असता त्याचवेळी दोघं अल्पवयीन मुलांनी पीडित मुलीला बळजबरीने केळीच्या बागेत नेले व त्या ठिकाणी त्यानीं त्या पीडित मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला भादवि…

Read More

मुंबई: पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी गुगलचे सीईओ पिचाई (Sundar Pichai) आणि गुगल, तसेच यूट्यूबच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात मुंबईत निर्माता आणि दिग्दर्शक सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी मुंबईत एफआयआर दाखल केला आहे. दर्शन यांनी बॉलिवूडमध्ये सनी देओल आणि अक्षय कुमार यांच्यासोबत ‘इंटकाम’, ‘लुटेरे’ आणि ‘जानवर’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. पिचाई यांच्या विरोधात कॉपीराइटचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ जानेवारी रोजी हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यूट्यूब आपल्या चित्रपट आणि संगीताच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे आणि त्यासाठी आपण ११ वर्षांपासून संघर्ष करत आहोत, असे सुनील दर्शन यांचे म्हणणे आहे. निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुनील दर्शनचा शेवटचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ हा २०१७…

Read More

 चोपडा – (संदिप ओली) येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात सकाळी  ७:०० वाजता राष्ट्रीय ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, किरण गुजराथी, रमेश जैन, शैलेंद्र अग्रवाल तसेच सर्व माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक , निवृत्त शिक्षक व कर्मचारी आदिंची उपस्थिती होती. यावेळी शालेय प्रार्थना “माझाच हिंद देश” हे पंकज नागपुरे आणि त्यांच्या चमूने सादर केले. त्यानंतर तुषार लोहार यांचे स्वरचित “सबसे प्यारा हिंदुस्तान” हे राष्ट्रभक्तीपर गीत शिक्षक व शिक्षिकांच्या समूहाने सादर केले. या गीताचे संगीत संयोजन पी.बी.कोळी व डी.एम.वैद्य यांनी केले. देशभक्ती व राष्ट्रप्रेमा प्रती शाळा आणि संस्था नेहमी तत्पर असते. तसेच यानंतर समाजप्रबोधनासाठी इ.…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी (मुराद पटेल)  स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया”ह्या संकल्पासह ग्रामपंचायत कार्यालय व जी.प.प्राथमिक शाळा चितेगांव येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक राज्यात आपण सुरक्षित आहोत याचं कारण म्हणजे आपल्या देशाचे जवान आहेत,जे दिन-रात्र सीमेवर पहारा देऊन देश सुरक्षित ठेवतात म्हणून आजचे ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण ज्यांनी देशासाठी सेवा देऊन निवृत्त झाले ते गावातील माजी सैनिक सचिन उत्तमराव भोसले व जी.प.प्राथमिक शाळा चितेगांव येथील ध्वजारोहण श्री.गणेश पंढरीनाथ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले,ही ह्या कर्यक्रमाची विशेष गोष्ट होती. याप्रसंगी गावाच्या सरपंच सौ.प्रभावतीताई गायकवाड, उपसरपंच भारत सोनवणे, ग्रा. सदस्य…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी (मुराद पटेल)   आज दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी शालेय आवारात मा.सरपंच अहिल्याबाई भास्कर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रतन ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सूत्रसंचालन राजेंद्र वाघ सर यांनी केले त्यात त्यांनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील नावे वाचून दाखवली व मान्यवरांच्या हस्ते सदर मुलांचा सत्कार करण्यात आला इयत्ता तिसरीच्या चार मुलांचा ऑनलाइन भाषणात शालेय स्तरावर उत्कृष्ट भाषण केल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले राजेंद्र वाघ यांनी शालेय गुणवत्तेचा आलेख मांडून विविध कार्यक्रमातून शाळा कशी उपक्रमशील झाली याचा नामोल्लेख करून शाळेचे उल्लेखनीय बाबी उपस्थितांसमोर मांडल्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी शाळेच्या मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्त्यांचा आढावा दिला तर यावर्षी…

Read More