जामनेर(प्रतिनीधी) पंढरीनाथ पाटील:- शहरातील पाचोरा रोड वरील आयडीबीआय बँकेच्या एटीएमला गॅस कटरचा वापर करून सुमारे १३ लाख रुपये अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यामुळे बँक व्यवस्थापनामध्ये चांगलीच खळबळ माजली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.चोरी करताना चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा बँकेसह एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे शहरातील पाचोरा रोडवरील गजबजलेल्या भागातआयडीबीआय बँक असून शेजारीच बँकेचे एटीएम आहे.अज्ञात चोरट्यांनी सदर बँकेचे एटीएम कटरच्या सहाय्याने कापून एटीएम मधील १२ लाख ७८ हजार रुपयाची रक्कम लंपास केल्याची घटना दि.२६ जानेवारी रोजी मध्यरात्री…
Author: saimat team
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले असून हे पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून शिवसेनेकडून वार्ड क्रमांक १७ मधील आशाबी अश्रफ तडवी नगराध्यक्षपदाच्या दावेदार झाल्या असून आता केवळ त्यांच्या नावाची घोषणाच बाकी असल्याचे चित्र आहे. सोयगाव नगरपंचायतीच्या सभागृहात १७ सदस्य संख्या आहे त्यापैकी ११ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे तर दोन क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपने सहा जागांवर विजय मिळवला असल्याने अल्पमतात असलेल्या भाजपाकडे नगराध्यक्ष पदाची महिला वार्ड क्रमांक १३ मधून निवडून आलेली असतानाही बहुमत नसल्याने त्यांची संधी हुकली आहे त्यामुळे आता शिवसेना सत्तेसाठी दावा करणार आहे.…
चोपडा – प्रतिनिधी तालुक्यातील तापी नदीकाठावर वसलेल्या निमगव्हाण या गांवात व परिसरात सद्या बिबट्याचा खुला वावर असल्याचे दिसून येत आहे. आज पहाटे चार वाजेच्या दरम्यान बिबट्याने भरवस्तीत प्रवेश करीत बापू आत्मारात बाविस्कर यांच्या खळ्यात एक म्हशीचे पारडू फस्त केले. त्यामुळे आता गांवकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून निमगव्हाण परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे गांवकर्यांच्या निदर्शनास आले आहे. व त्याबाबत वनविभागास लेखी अर्जाद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र आजतागायत वनविभागाने कुठलीच भक्कम कारवाई केली नाही. त्याचाच परिणाम म्हणुन बिबट्याने थेट गांवात घुसून म्हशीचे पारडू फस्त केले. या घटनेमुळे संपुर्ण गांवकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या गांवात…
जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील ३३ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील शिरसोली येथील ३३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गिरीष प्रकाश पाटील (वय-३३) रा. शिरसोली ता.जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीष पाटील हा आई वडील, पत्नी आणि भाऊ यांच्यासह शिरसोली येथे वास्तव्याला आहे. गेल्या १३ वर्षांपासून ते बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला आहे. गुरूवारी २७ जानेवारी…
भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदी येथील नवविवाहितेने लग्नानंतर तिस-याच दिवशी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुजा रविंद्र चौधरी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिचे बोदवड तालुक्यातील विचवा येथील तरुणासोबत नुकतेच लग्न झाले होते. माहेरी आल्यानंतर विषारी द्रव प्राशन करत तिने आत्महत्या केली आहे. पुजाचे हे दुसरे लग्न होते. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुजाने विषारी द्रव प्राशन केल्यानंतर तिला वैद्यकीय उपचारासाठी भुसावळ शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले.
मुंबई, वृत्तसंस्था । सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी तेजी होती. तर आज देशभरात सोन्याचा दर किलोमागे तब्बल चार हजार रुपयांनी घसरला. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने ही स्थिती असल्याचे पाहायला मिळाले. भारतात १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५,५०० रुपये झाली आहे. मागील ट्रेडमध्ये या या मौल्यवान धातूची किंमत ४५,९०० रुपये प्रति ग्रॅमवर बंद झाली. दिल्लीत सोन्याचा दर ४५,५०० रुपये होता. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १०…
मुंबई, वृत्तसंस्था । ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक खेचणे आणि तालिका अध्यक्षांना शिवीगाळ करणे, असे आरोप ठेवून गैरवर्तन करणाऱ्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. राज्यातील १२ आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या सर्व आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, एका अधिवेशनापेक्षा जास्त काळाचं निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नाही. असा निर्णय घेणं असंविधानिक आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. महाराष्ट्र विधानसभेत ठराव करत भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. यावेळी भास्कर…
जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा महानगर प्रसिद्धी प्रमुख पदी पूजा पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या प्रसंगी आ. चंदूभाई पटेल, बीजेपी जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिताताई वाघ, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी उज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस रेखाताई वर्मा, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, दिप्ती चिरमाडे, अध्यक्ष जळगाव जिल्हा महानगर महिला आघाडी यांच्या आदेशानुसार पुजाताई यांची नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगी प्रतिनिधींशी बोलतांना पक्ष्याच्या आदेशानुसार महिलांसाठी समाजकार्य नियमीत करीत राहील. स्त्री ही फक्त चूल व मूल या चाकोरीत न राहता स्त्रीने तिचे अस्तित्व निर्माण करावे, यासाठी नियमित समाजकार्य करत राहील असे नमूद केले. पूजा पाटील…