Author: saimat team
मुंबई, प्रतिनिधी । मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अशी माहिती त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असलेल्या रमेश देव यांनी मराठी व हिंदी चित्रपटातील अभिनय करत आपली एक स्वतंत्र छाप सोडली. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे रमेश देव यांना जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी जन्म झाला. सन १९५६ साली प्रदर्शित झालेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर बॉलीवूडमधील ‘आरती’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. रमेश देव विशेष ओळख मिळाली ती ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेद्वारे. त्यांनी दिग्दर्शनासह…
कजगाव ता.भडगाव, प्रतिनिधी । कजगाव विज वितरण च्या दुर्लक्ष मुळे कजगाव येथील शांती नगर या गजबजलेल्या परिसरातील उघड्या ट्रान्सफॉर्मर ला आग लागल्याने परीसरात मोठी घबराट पसरली होती प्रसंगी परीसरातील काहि तरुणांनी पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझवली या नंतर काहि वेळाने विजवितरण चे कर्मचारी घटनास्थळी पोहचले तरुणांनी समयसूचकता दाखवली नसती तर गजबजलेल्या या भागात मोठा अनर्थ घडला असता. उघड्या ट्रान्सफॉर्मर मुळे नागरिकां सह लहान बालक यांचे जिव धोक्यात आले असूनही या बाबीकडे लक्ष दिले जात नसल्याने या खात्या विषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे सविस्तर वृत्त साऱ्याच दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर देखील या खात्याने कोणतीहि सुधारणा न केल्याने नागरिका मधुन…
जळगाव, प्रतिनिधी । तत्त्वज्ञान, विज्ञान अन् आध्यात्मिक गुरू स्वामी विवेकानंद यांचे साहित्य, पुस्तके व विचार सर्वांसाठी आजीवन प्रेरणादायी असून, ते विशेषतः युवकांसाठी अतिशय मार्गदर्शक आहेत. सद्यःपरिस्थितीत डिजिटल युगामध्ये जेथे चिथावणीखोर वक्तव्ये होतात अशा वेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे साहित्य, पुस्तके ही युवकांसाठी मार्गदर्शक ठरतात. जीवन म्हणजे प्रत्यक्ष वाटचालीची परीक्षा आहे. तिला प्रत्येकानेच धैर्याने सामोरे जाऊन निश्चितपणे यश संपादन केले पाहिजे. मात्र, त्यासाठी जळगावसह प्रत्येक खेड्या-पाड्यात वाचन संस्कृती वाढीस लागायला हवी. या कार्याच्या प्रचार अन् प्रसारासाठी आपल्या संस्थेसह या कार्यात सेवारत असलेल्या सर्वांना समस्त जळगावकरांतर्फे मनस्वी शुभेच्छा देते, अशी भावना महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. जयश्री सुनिल…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील राधेकृष्ण नगरात राहणारी २० वर्षीय तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील शिवाजी नगरातील भारत नगर येथील राधेश्याम नगर परिसरातील २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोमल ज्ञानेश्वर कांबाळे (वय-२०) रा. भारत नगर, शिवाजी नगर परिसर जळगाव असे मयत तरूणीचे नाव आहे. कोमल कांबळे ती युवती आपल्या आई, वडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. वडील खासगी लक्झरी चालवून…
जळगाव, प्रतिनीधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमबीबीएस शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १७ जणांनी नोंदणी करीत प्रवेश प्रक्रियेसाठी कार्यवाही केली. राज्य शासनाच्या सीईटी सेलतर्फे मंगळवारी १२५ विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली. या अंतर्गत इच्छुक पात्र उमेदवारांना ७ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रियेविषयी कार्यवाही करावयाची आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी सकाळपासून विद्यार्थी व पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरु होती. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १५० विद्यार्थी क्षमता आहे. त्यात राज्याच्या कोट्यातून १२५ नावे आली आहे. तर केंद्र शासनाच्या सीईटी सेल कडून २३ नावे अद्यापि यायची बाकी होती. विद्यार्थ्यांच्या…
जळगाव, प्रतिनिधी । आसोदा रेल्वेगेटजवळ आज दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर चा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा चाकाखाली दाबून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे., ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चाकाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना आसोदा रेल्वेगेटजवळ आज दुपारी घडली. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. विठ्ठल यशवंत रायसिंग (कोळी) (वय-४५, रा. आसोदा ता.जि.जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते ट्रक्टर चालक असून ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २ फेब्रुवारी रोजी विठ्ठल कोळी हे जळगावहून आसोदाकडे रिकामे ट्रॅक्टर घेवून जात होते. त्यावेळी आसोदा रेल्वे गेट बंद होते. ट्रॅक्टर…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे 70 वर्षे वयावरील निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक तसेच इतर राज्याचे 70 वर्षे वयावरील शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, दिनांक 1 ते 28 फेबुवारी, 2022 या काळात आपण मूळ निवृत्तीवेतन तसेच पती/पत्नी यांची पुढीलप्रमाणे तपशिल – नाव, संपर्क क्रमांक, बँक, ब्रांच , खाते नंबर इ. एका कागदावर नमूद करुन यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक प्रथम पानाची छायांकित प्रत जोडून जिल्हा कोषागार कार्यालय जळगाव येथे कार्यालयीन वेळेत आणून जमा करावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी कार्यालयाच्या to.jalgaon@zillamahakosh.in या ई-मेलवर अथवा इतर व्यक्तीकडे पाठवून…
जळगाव, प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी अहमदनगर येथील निरंतर शिक्षणाधिकारी नितीन पोपटराव बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांची बदली झाल्यानंतर सहा महिन्यांपासून कल्पना चव्हाण या प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहत होत्या. दरम्यान, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी परिपत्रक काढून नितीन पोपटराव बच्छाव यांची शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती केल्याचे अादेश काढले.
सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था । शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला, नेमके काय झाले होते ? कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी…