मुंबई : डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात आलेल्या तरतुदीपैकी उर्वरित ४०.६५ कोटी रुपयाची रक्कम लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास देण्याची मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. अर्थमंत्र्यांनी डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विभागास वितरित करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले, असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. शेख यांनी दिली. सन २०२० व २०२१ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल परताव्यासाठी रु. ६० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यातील फक्त १९.३५ कोटी रुपये रक्कमच मत्स्यव्यवसाय विभागाला वितरित करण्यात आली. उर्वरित ४०.६५ कोटी रुपये लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास…
Author: saimat team
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात एका कैद्याची अन्य दोन कैद्यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्या प्रकरणात हा कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मुलांनी आणि नातेवाईकांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिल्याने पोलिसांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. कोल्हापूर: किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कळंबा कारागृहातील दोन कैद्यांनी अन्य एका कैद्याचा खून केल्याची घटना दोन दिवसांनंतर उघडकीस आली. यामुळे कारागृहात खळबळ उडाली असून, त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. उमेश राजाराम सामंत असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परूळे मांजर्डेवाडी येथील उमेश सामंत हा गेल्या सात वर्षापासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पत्नीचा खून केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने…
अमळनेर : ईश्वर महाजन ‘स्वामी तिन्ही जगाचा,आई विना भिकारी’ या म्हणीनुसार अतिशय दुर्दैवी वेळ बालपणातच अमळनेरच्या जानवी व कल्पेशवर आली असताना अमळनेरचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील व जि. प. सदस्या जयश्रीताई अनिल पाटील यांनी त्यांना त्यावेळी अनाथ होण्याचा कलंक लागू न देता, मातृपितृ छत्राचा आधार देत कायमस्वरूपीचे पालकत्व स्विकारल्याने दोन्ही बहीण-भावंडे आज शिक्षित व सज्ञान झाले असून यातील जानवीचा विवाह आदर्श पद्धतीने शासकीय नियमांचे पालन करीत दि. २ डिसेंबर रोजी घटिक मुहूर्तावर शिरपूर तालुक्यातील नागेश्वर महादेव मंदिरावर विधीवत पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे जानवी ही रंगरूपाने सुंदर व सुशील असल्याने जयश्रीताई पाटील व आ.अनिल पाटील यांनी आपल्या या लाडक्या…
रावेर : प्रतिनिधी दिल्ली येथे सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या शेती विषयक काळ्या कायद्याच्या विरोधात शेतकर्यांनी उभारलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आज दि.३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३८ वाजेपासून ते १२.१० वाजे पावेतो रावेर तहसील कार्यालया समोर रावेर तालुका कॉंग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या नेतृत्वात तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिभा मोरे, कांता बोरा, डॉ. शब्बीर खाटीक, संतोष लालचंद पाटील, राजू सवर्णे यांच्यासह २५ ते ३० कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार उषारानी देवगुणे यांना निवेदन देऊन आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
पाचोरा : प्रतिनिधी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.सागरदादा गरुड यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३० डिसेंबर बुधवार रोजी पार पडणार असून तो मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे होणार आहे. डॉ सागर सुनिलराव गरुड हे शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील असून ते विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा येथे संचालक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी त्यांना दैनिक दिव्य मराठीचा गौरव रुग्णसेवा २०१९ हा पुरस्कार मिळाला आहे.त्यांना कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्रातील विविध संस्थांनी सन्मानपत्र देऊन गौरवले आहे.समाजाचे आपण…
मलकापूर : प्रतिनिधी पंजाब,हरियाणा, दिल्ली व देशातील अन्य प्रांतातुन दिल्लीत केंद्र सरकारच्या ३ काळे कायद्यांविरोधात एकवटलेल्या शेतकरी मोर्चाला जाहीर समर्थन देण्यासाठी काल २ डिसेंबर रोजी मलकापूर, मोताळा व नांदुरा अशा तीन तालुक्यातून शेकडोच्या संख्येत जुने कॉटन मार्केट यार्ड येथे शेतकरी बांधव एकत्रित झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासकीय नियमांचे पालन करीत शेकडो शेतकरी एकवटलेले होते. याठिकाणी प्रमुख शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारने पाशवी बहुमताचे जोरावर संमत केलेल्या ३ काळ्या कायद्यांविषयी थोडक्यात प्रबोधन केले आणि दिल्लीत जमलेल्या मोर्चाला समर्थन देणे आपले नैतिक व राष्ट्रहिताचे कर्तव्य असल्याची भावना व्यक्त केली. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ.अरविंद कोलते, डॉ.साहेबराव मोरे, ऍड. हरीशभाऊ रावळ…
जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जळगव जिल्ह्यात संयुक्त व सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठ रुग्ण शोध मोहीम १६ डिसेंबर २०२० पर्यंत राबविण्यात येईल. या आजारांच्या लक्षणांनी ग्रस्त नागरिकांनी तपासणीसाठी येणार्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान दिनांक १ डिसेंबर, २०२० ते १६ डिसेंबर, २०२० या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते करण्यात आले. अभियान काळात सर्व शहरी व ग्रामीण भागातील पुरुष व स्त्रीयांची तपासणी आशा व…
जळगाव ः प्रतिनिधी माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची पहिलीच बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात झाली. यावेळी खडसेंनी पक्षसंघटन वाढीवर जोर दिला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील यांनी केले. माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी खडसेंमुळे पक्षसंघटन वाढणार असल्याचे नमूद केले. अल्पसंख्याक आघाडीचे गफ्फारभाई मलिक यांनी जिल्ह्यात बीएचआर प्रकरणी सुरू असलेली कारवाई म्हणजे सीडीविनाच फटाके फुटत असल्याचे म्हटले.जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणीताई खडसे यांनी पक्षात नवीन असल्याने काही चूक झाल्यास आमचे कार्यकर्ते आणि आम्हाला सांभाळून घ्यावे असे आवाहन केले.माजी आमदार मनीष जैन यांनीही पक्षाला खडसेंमुळे चांगले दिवस येणार असल्याचे म्हटले.…
धुळे : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा मतमोजणीला निकाल लागला असून भाजपने या निवडणुकीत बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तब्बल २३४ मतांनी पराभव झाला आहे. धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.त्यांना ३३२ मते मिळाली आहेत. तर, पटेल यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघ्या ९८ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. चार मते बाद झाली आहेत. या निवडणुकीत एकूण ४३७ मतदारांपैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज…
जळगाव ः प्रतिनिधी ओबीसी आरक्षण बचावसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला व मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्यामार्फत मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मोर्चात सहभागी होणार्या प्रत्येक व्यक्तीने माक्स, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करण्याची खबरदारीही घेतली. ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे व ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावेत आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून महिलांनीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सरिता माळी(कोल्हे)यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात निरीक्षक शालिग्राम मालकर,…