विवो इंडिया लवकरच भारतात आपला आणखी एक स्मार्टफोन Vivo Y51 (2020) लाँच करू शकते. हा स्मार्टफोन Vivo S1 Pro चा रिप्लेसमेंट आहे. विवोने आज भारतात ५जी सेगमेंटचा जबरदस्त फोन Vivo V20 Pro 5G लाँच केला आहे. याची खूप दिवसांपासून उत्सूकता होती. Vivo Y51 मध्ये कंपनी भारतात Qualcomm Snapdragon 665 SoC प्रोसेसर सोबत लाँच करू शकते. तसेच या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. या फोनची भारतात रियलमी, ओप्पो, एमआय आणि सॅमसंगसह अन्य कंपन्याच्या मिड रेंज मोबाइल सोबत टक्कर पाहायला मिळेल. Vivo Y51 चे खास वैशिष्ट्ये Vivo Y51 फोनमध्ये ६.३८ इंचाचा full-HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2340 पिक्सल…
Author: saimat team
जगात आपल्या मसाल्यांची छाप सोडणारे एमडीएच (MDH) मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) यांचं निधन झालं. आज पहाटे ५.३८ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वय ९८ वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केवळ पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांनी बड्या उद्योगपतींना मागे टाकत २०१७ मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता. ‘एमडीएच’ची वार्षिक उलाढाल १५०० कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे १५ कारखाने असून १००० डिलर्सचं जाळं आहे. महाशय…
नागपूर : जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे भारताच्या परंपरेत आहेत. विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावशाली आहेत. विविधतांना जोडणारा घटक हा फक्त भारताजवळच असून तो आम्हास जगाला द्यायचा आहे. जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि रशियाची दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं सुरू केलं. यामध्ये अमेरिका जिंकली, महासत्ता झाली; पण जगाला एकत्र ठेवू शकली नाही, असे मोहन भागवत म्हणाले. ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. दरम्यान,…
केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण हा सन्मान परत केला आहे. नवी दिल्ली: केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला पद्मविभूषण हा सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण परत केला आपला पद्मविभूषण सन्मान परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल म्हणाले,…