Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत आंबेडकरवादी जनसंघटनाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाची स्थापना करून या मोर्चाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी आंदोलनाचे संघर्षशील लढाऊ नेते मुकुंदराव सपकाळे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रितीलाल पवार उपस्थित होते तर अध्यक्षपदाचा प्रस्ताव अमोल कोल्हे यांनी मांडून संजय तांबे,रमेश सोनवणे यांनी अनुमोदन करून जनक्रांती मोर्चाची सभासद नोंदणी मोठ्या संख्येनी करावी असे सूचित केले. प्रास्ताविक हरिश्‍चंद्र सोनवणे यांनी करून सुत्रसंचलन चंदन बिर्‍हाडे यांनी केले. बैठकीस बाबुराव वाघ, माजी नगरसेवक राजु मोरे, संजय पाटील, श्रीकांत मोरे, दिलीप सपकाळे, धर्मेश पालवे, विजय…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी लेवा पाटील समाज मंडळ जळगावच्यावतीने वधू-वर पुस्तक प्रकाशन काल रोजी मान्यवरांच्या उपस्थितित उत्साहात झाले.यावेळी मंचावर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, आ .राजुमामा भोळे,मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे,जळगाव समाज मंडळ अध्यक्ष हेमंत भंगाळे, नितीन धांडे, मीनाक्षीताई धांडे,नगरसेविका महिला समाज मंडळ अध्यक्षा निताताई वराडे,दिनेश भंगाळे, दीपकभाऊ धांडे,कडु पाटील चितोडा,मराठा समाज अध्यक्ष संजय मराठे,नगरसेवक जितेंद्र मराठे,प्रकाश वराडे, ज्येष्ठ पत्रकार वसंत कोलते,शिशिर भंगाळे,किशोर कोलते, युवा अध्यक्ष कमलाकर वारके, तुषार वारके आदी उपस्थित होते. तोतराम महाराज नवचैतन्य या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हेमंत भंगाळे यांनी प्रास्ताविक करतांना शेतकरी आणि व्यवसाय करणार्‍या उपवर मुलांना वधू मिळणे अवघड झाले आहे. अशा मुलांसाठी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील…

Read More

जळगाव ः संतोष ढिवरे जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्रातील रेशन वितरण प्रणालीतील एनआयसी सर्वर बंद असल्या कारणाने आज सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्रात मशीन बंदचा फटका रेशन वाटपावर झालेला आहे. रेशन दुकानदार व ग्राहक यामुळे हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना मार्च २०१७ पासून बायोमेट्रिक रेशन प्रणालींतर्गत पीओएस मशीनचे वाटप करुन मशीन संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे होते. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात संबंधित तहसील कार्यालयाच्यावतीने पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले आहे. मार्च २०१७ पासून जिल्हाभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन बायोमेट्रिक रेशन प्रणालीस सुरुवात झाली आहे. या प्रणाली नुसार स्वस्तधान्य कार्डधारकांना आता मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर धान्याचे वाटप केले जाते .मशीनमध्ये पीओएस केल्यानंतर ज्या…

Read More

बुलडाणा : प्रतिनिधी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर दाऊदच्या पत्नीशी संभाषण केल्याचा आरोप करणारा कथित हॅकर मनीष भंगाळेच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष भंगाळे याने एकनाथराव खडसे यांनी दाऊदच्या पत्नीशी मोबाईलवरून संभाषण केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यानंतर त्याचा हा कांगावा असल्याचे सिध्द होऊन भंगाळेला अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, एकनाथराव खडसे यांचे समर्थक माधव पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड या पोलीस स्थानकात मनीष भंगाळेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भंगाळे याने खडसेंची प्रतिमा मलीन करण्यासाठी खोटे आरोप केल्याची ही तक्रार आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

Read More

अमरावती : वृत्तसंस्था आंध्र प्रदेशातील एलुरूमध्ये एका अज्ञात आजाराने थैमान घातलेय. या रहस्यमय आजाराने जवळपास ३०० लोक रुग्णालयात दाखल झालेत. त्यातच काल एका व्यक्तीला आपल्या प्राणालाही मुकावं लागले आहे. हा आजार नेमका काय आहे? आणि तो कोणत्या कारणाने फैलावला गेला? याबाबत मात्र डॉक्टारांसमोरही प्रश्‍नचिन्ह कायम आहे.या आजारात अनेक लोक अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळत आहेत.अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसत आहेत. या नवीन आजाराने डॉक्टरही चक्रावले आहेत. एकाचा मृत्यू या आजाराने पीडित एक रुग्ण विजयवाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. या ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. चक्कर आल्यानंतर या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिर्डी येथून आईला भेटण्यासाठी दुचाकीने घरी परतणार्‍या पोलीसाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना आज पहाटे शिरसोली रोडवरील देवकर महाविद्यालयाच्या समोर घडली. या अपघातातील दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त असे की, सागर रमजान तडवी (वय ३०, रा.हंबर्डी, ता.यावल, ह.मु. पोलीस लाईन, जिल्हापेठ, जळगाव) हे पोलीस कर्मचारी असून अगोदर रामानंदनगर पोलीस स्टेशनला कार्यरत होते. जळगावात ते आईसोबत राहात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची शिर्डी येथील देवस्थानाला पोलीस बंदोबस्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आईला भेटण्यासाठी ते दर आठवड्याला जळगावात येत होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी संतोष…

Read More

बुलडाणा : प्रतिनिधी शहरातील चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात दोन बाल गुन्हेगारांनी बंद खोलीत गळफास घेतल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगेश लक्ष्मण डाबेराव (१५), गजानन शंकर पांगरे (१७, रा. शेगाव) अशी या मुलांची नावे आहेत. या मुलांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चिखली रोडवरील शासकीय मुलांच्या सुधारगृहात एकूण आठ जण होते पैकी मृतदेह आढळलेल्या खोलीत तीन मुले होती. एक जण सुखरूप आहे. आत्महत्या करण्यात आलेली दोन मुले पंधरा दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून पळून गेली होती. त्यांना पुन्हा पकडून आणण्यात आले होते. दोघांची आत्महत्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, दोघांनी संगनमताने आत्महत्या केल्याचे त्यातून दिसून येत आहे.आत्महत्येसाठी एकमेकांना त्यांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हाभरात शेतकर्‍यांना कृषी पंपासाठी ट्रान्स्फॉर्मर मिळवण्यासाठी महावितरणकडून अडचणी येत आहेत. दुरुस्ती आणि ऑइलसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधी देणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना दिली. याबाबत तातडीने जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन शेतकर्‍यांना तातडीने ट्रान्स्फॉर्मर देणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेची जिल्हा बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली. या वेळी पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांकडून मांडलेल्या अडचणींवर पालकमंत्री बोलत होते. आमदार किशोरअप्पा पाटील यांनी शेतकर्‍यांना वेळेत ट्रान्स्फॉर्मर मिळत नसल्याने पिके धोक्यात आल्याचे सांगितले. या वेळी आमदार चिमणराव आबा पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन,जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील सेवा स्पंदन आयोजित अलंकार ऑनलाईन फोटो स्पर्धेत अश्‍विनी तांबट (पुणे) यांनी प्रथम तर अश्‍विनी कुळकर्णी (औरंगाबाद) हिने द्वितीय आणि कल्याणी देशमुख (नाशिक) यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिके प्राप्त करीत विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केला. जोशी बंधू जेम्स ऍण्ड ज्वेलरीचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. १८ ते ६० वर्षे आणि ६० वर्ष व त्यावरील अशा दोन गटांचे परिक्षण स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले, झी युवा वाहिनीच्या एक्झकेटिव्ह प्रोड्युसर ऋतुजा जोशी यांनी केले. दुसर्‍या गटात कुमुदिनी पाटील (पाचोरा), निलीमा चित्रे (बदलापूर), रेखा कुळकर्णी (जळगाव) आदिंनी परितोषिकांचा गौरव प्राप्त केला. सर्वाधिक वयाच्या स्पर्धक प्रमिला येवले (वय ८०, जळगाव),स्व.रजनी दलाल(मरणोत्तर,पाचोरा),संध्या कौल (विशेष अलंकार,जळगाव)…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरात मध्यरात्री मवाली,गुंड प्रवृत्तीचे भुरटे चोर रस्त्यावर धावणार्‍या ट्रक चालकाशी जबरदस्ती कुरापत काढून मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून ट्रक चालकांना लुबाडले जाण्याचे प्रमाण वाढले आहे.त्याबाबत जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनने जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी काल पीडित वाहनचालक यांना कार्यालयात बोलावून प्रत्यक्ष हकीकत जाणून घेतली व योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्‍वासन दिले. एखाद्या निवेदनावर उच्च दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांनी अशी बैठक आपल्या कार्यालयात घेतली याबाबत असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसह ट्रकचालकांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान वाहनचालकांनी त्यांच्यासोबत झालेल्या लूटमारांविषयी सविस्तर माहितीही दिली. गेल्या काही दिवसांत जळगाव शहराच्या हद्दीत वाहनचालकांकडून लुटल्याच्या घटना समोर…

Read More