Author: saimat team

मलकापूर ः प्रतिनिधी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आरक्षण तहसील कार्यालयात तहसीलदार डोईफोडे व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली. महिला आरक्षणाबाबतची सोडत गुरुवार दि.१० डिसेंबर रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घोषित करण्यात आली. संबंधित ग्रामपंचायतींमधील वार्डनिहाय आरक्षण यापूर्वीच त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे. जाहीर करण्यात आलेल्या ४९ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पुढील प्रमाणे.- अनुसूचित जाती(एससी) वडोदा, हिंगणा काजी, लासुरा, हरसोडा, वाघुड, पिंपळखुटा बुद्रुक, निमखेड व म्हैसवाडी. अनुसूचित जमाती (एसटी)-काळेगाव, वरखेड, बहापुरा, देवधाबा. नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गातील एकूण १३ ग्रामपंचायतींपैकी पुढील ५ ग्रामपंचायतींची सोडत चिठ्ठ्या टाकून वडोदा येथील लहान बालक रोशन याचे हस्ते पुढील पाच गावांच्या चिठ्ठ्या निवडून निश्चित करण्यात…

Read More

जामनेर : प्रतिनिधी येथील जामनेरपुरा, इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयातील, क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार यांनी शैक्षणिक तथा क्रीडा क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदिल शहा फारुकी बहुउद्देशीय संस्था, अडावद (ता.चोपडा) या संस्थेमार्फत ‘खान्देश भूषण पुरस्कार-२०२०’ साठी निवड घोषित करण्यात आली. हा पुरस्कार जळगाव येथील पत्रकार भवनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दि.१३ डिसेंबर २०२० रोजी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. या यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस.बी.भोई, उपप्राचार्य प्रा.जे.पी.पाटील, पर्यवेक्षक प्रा.के.एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.आर.ए. पाटील, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी. पाटील, महाराष्ट्र राज्य थलेटिक्स संघटनेचे संचालक तथा तांत्रिक समिती अधिकारी राजेश…

Read More

धरणगाव ः प्रतिनिधी येथील भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष तथा पाटील समाजाचे उपाध्यक्ष दिलीप (बापू) जगन्नाथ पाटील यांनी शिवसेना नेतृत्वावर विश्‍वास ठेवत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने लहान माळी वाडा परिसरात शिवसेनेला आगामी निवडणुकीत फायदा होईल. त्यांचा प्रवेशाने राज्याचे पाणीपुरवठा व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, सुरेश महाजन, नंदू पाटील, डॉ.विलास महाजन, गोलू चौधरी, पापा वाघरे, प्रशांत देशमुख, राजू चौधरी,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महाबीजचे अधिकारी कर्मचार्‍यांना सातवे वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आज ९ डिसेंबर पासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे दि.३० जानेवारी २०१९ रोजीच्या आधिसूचनेनुसार शासकीय कर्मचार्‍यांना दि.१ जानेवारी २०१६ पासून सातवे वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर महाबीज मधील अधिकारी कर्मचार्‍यांना महाबीजच्या संचालक मंडळाने १९४ व्या सभेत निर्णय घेवून महाबीज कर्मचारी अधिकार्‍यांना सातवे वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देऊन तसा प्रस्ताव अध्यक्ष महाबीज तथा सचिव कृषि यांच्यामार्फत वित्त विभागाने प्रस्तावित केल्यानुसार सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी अधिकार्‍यांना सातवे वेतन आयोग लागू करण्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंत्री मंडळाने मान्यता दिलेली आहे. परंतु वित्त मंत्रालयाकडून महाबीजची फाईल कृषी विभागाकडे…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी येथील सतपंथ मंदीर संस्थानचे गुरुवर्य ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव अखंड नामसंकीर्तनाने साजरा केला जाणार असल्याचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. हा कार्यक्रम दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सतपंथ संस्थानच्या मंदिरात होणार आहे. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सामुहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन केले नसून फक्त समाधी दर्शन व प्रसादाचे आयोजन केले आहे. ज्यामुळे गर्दी होणार नाही व आळीपाळीने दिवसभर भाविकांची ये-जा सुरू राहील, अशी यंत्रणा आहे. पंचक्रोशीतील संत-महंत तसेच लोकप्रतिनिधी व भाविकांच्या उपस्थितीत दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सतपंथ संस्थानच्या मंदिरात महापूजा केली जाणार असून दि.१४ डिसेंबर रोजी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील अधिकारी व पदाधिकारी यांच्या मुक्ताईनगरच्या मोठ्या प्रमाणात फेर्‍या होत असल्याने बी. एच. आर. आणि जिल्हा परिषद शालेय पोषण आहार प्रकरणात नेमकं पुढे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून भाजपातून राष्ट्रवादी पक्षाकडे माजीमंत्री एकनाथराव खडसे आल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात राजकीय भूकंप झाला. यानंतर एकनाथराव खडसे यांनी बीएचआर प्रकरण उघड केल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या घोटाळ्याकडे लागले आहे. हे प्रकरण उघडकीस येते न येते तोच जिल्हा परिषदेतील शालेय पोषण आहार प्रकरणातील घोळ व त्यातील भ्रष्टाचार सुद्धा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उघड केला आहे . यामुळे जिल्ह्यासह राज्यात भूकंपाचे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी किमान आधारभूत दराने करण्यात येत असलेली कापूस खरेदी पारदर्शीपणे पार पाडा. कापूस खरेदीचे टोकन देतांना शेतकर्‍यांना अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल दिला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सहकार, कापूस पणन महांसघ व सीसीआयच्या प्रतिनिधींची बैठक झाली.यावेळी ते बोलत होते.या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक आर.डी.होले, उपव्यवस्थापक ए. बी. निकम, जामनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील, जळगावचे आर. के. पाटील, पारोळाचे आर.डी.चौधरी, चोपडाचे एन.आर.सोनवणे, सीसीआयचे सहायक प्रबंधक…

Read More

जळगाव ः छगनसिंग पाटील बीएचआर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेत ठेवीदारांची फसवणूक करून व पर्यायाने त्या माध्यमातून संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल भावाने बळकावल्या.त्यासाठी तसा घाट रचून अवसायक व इतरांनी संस्थेची व ठेवीदारांची फसवणुक केली. संघटितपणे, कट रचून संस्थेची व ठेवीदारांची फसवणूक केल्याने संबंधितांवर संघटित गुन्हेगारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.या सर्व घटनाक्रमात गुन्ह्यातील आरोपींशी गेल्या काळात आर्थिक व्यवहार असणार्‍या व्यक्तींचीही चौकशी होण्याची दाट शक्यता असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या घोटाळा प्रकरणात मास्टरमाईंड व मोठा लाभार्थी असणार्‍या सुनिल झंवर यांचेशी या काळात आर्थिक व्यवहार असणार्‍या तसेच कर्जफेड करणार्‍या व्यक्तींची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शेकडो जण पोलीसांच्या रडारवर…

Read More

जळगाव : गणेश पाटील सत्ता मिळूनही कार्यकर्ते व पदाधिकारी यांची कामे होत नसल्याने भ्रमनिरास झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. संपर्क प्रमुखांकडे गार्‍हाणी मांडूनही काही उपयोग होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी संपर्क प्रमुखांकडे वेळ नाही परंतु एखाद्या ‘अर्थ’पूर्ण विषयात तोडगा काढण्यासाठी विमानाने तात्काळ जळगावी धाव घेऊन कुणालाही न भेटता दौरा आटोपून निघून जाणार्‍या संपर्क प्रमुखांना कुठलीच वेळेची अडचण येत नाही. नुकतेच दोन दिवसांपूर्वी संपर्क प्रमुख विमानाने एक दिवसाचा दौरा आटोपून कुणाही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना न भेटताच निघून गेले. पक्षात या दौर्‍याची चर्चा जोरात सुरु आहे. काही धनाढ्य व्यक्तींचे…

Read More

एरंडोल ः प्रतिनिधी तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथील राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आला आहे. किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. काल सायंकाळी ते घरी परत आले नाही. पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. किशोर पाटील हे प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते.ते तळई येथील सेवानिवृत्त सचिव पुरुषोत्तम गायकवाड यांचे जावई आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी कुंझरकर यांना गौरविण्यात आले होते. त्यांची नुकतीच राज्य…

Read More