जळगाव ः प्रतिनिधी राज्यभरातील महाबीज’च्या अधिकारी, कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ‘ड’ वर्गातील कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे आदी मागण्यांसाठी आज राज्यभरातील महाबीज’च्या अधिकारी, कर्मचार्यांनी महाबीज बहूजन कर्मचारी अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संपास सूरवात केली आहे. जळगाव जिल्हा कार्यालय, विभागीय कार्यालय व एंरडोल येथील बीज प्रक्रिया केंद्रातील अधिकारी कर्मचार्यांनी संपात सहभाग नोंदविला आहे. ‘महाबीज’ मध्ये ६७१ पदे असून प्रत्यक्षात ४८२ कर्मचारी कार्यरत आहे. कोवीड संसर्गाची महामारी असताना शेतकर्यांचे हित लक्षात घेवून कर्मचार्यांनी जीव धोक्यात घालून शंभर टक्के सेवा दिली आहे. खरिप हंगामात शेतकर्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध करून दिले आहे. याची दखल घेत अनेक…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी परिवर्तन जळगावतर्फे पद्मश्री डॉ. भंवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवर्तनतर्फे भाऊंना जयंतीच्या अनुषंगाने विविध कलांतून शब्द, सूर, रंग याद्वारे अनोखी भावांजली अर्पण करण्यात येणार आहे. १२ ते १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. भावांजली महोत्सवाचे प्रमुख अनिस शहा, अनिल कांकरिया, आनंद मलारा, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, नंदलाल गादिया व नारायण बाविस्कर हे आहेत. महोत्सवाची सुरवात ‘वेणुत्सव’ने होणार आहे. भाऊंना बासरी खूप आवडायची.त्यानिमत्त त्यांच्या जन्मदिनी वेणूत्सव हा २० बासरी वादकांच्या बासरी वादनाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. पाच दिवसीय महोत्सवात सोमवार वगळता सर्व कार्यक्रम भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटरमध्ये सादर होतील. सर्व कार्यक्रम दररोज…
जळगाव ः प्रतिनिधी ९ डिसेंबरला शेतकर्यांच्या ४० प्रतिनिधींसोबत चर्चा ठरलेली असतांना आदल्या रात्री अमित शहांना पुढे करत व शेतकरी आंदोलनात फूट टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला त्यासाठी केंद्र सरकारने ८ तारखेच्या रात्री शेतकर्यांच्या १३ प्रतिनिधींना बैठकीला बोलावत एक कुटील डाव खेळण्यात आला अर्थातच या बैठकीतूनही काही हाथी लागले नाही म्हणून मग शेतकर्यांपुढे कायद्यात दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शेतकरी संघटनांपुढे ठेवला आहे. या नव्या प्रस्तावात सरकारने जे बदल करण्यासंदर्भात मुद्दे दिले आहेत ती तर शुद्ध धूळफेक आहे हे मुद्दे पुढीलप्रमाणे – १) एम एस पी ही कायम ठेवण्यात येईल २) कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात दुरुस्ती ३) शेतीमाल खरेदी करणार्या व्यापार्यांनी नोंदणी…
जळगाव ः प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि तत्कालीन सरपंच यांनी पदाचा गैरवापर करून शौचालय बांधकाम प्रकरणात अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली होती मात्र दोनवेळा तक्रारी करून देखील दोघांवर कारवाई न झाल्याने अखेर जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी आदेश काढून तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्त झाला असल्याने त्याच्या भविष्यनिर्वाह निधीच्या पैशातून सुमारे ३९ हजार ९०० रुपये वसूल करून तितकीच रक्कम तत्कालीन सरपंचांकडून वसूल करण्यात यावी असे आदेश सीईओ यांनी ८ डिसेंबर रोजी काढले आहेत. याबाबत माहिती अशी की,जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी १८ नोव्हेंबर २०२० रोजी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांना…
नशिराबाद, ता.जळगाव ः प्रतिनिधी येथील मुर्दापूर धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे काही दिवसांपूर्वी मागणी केली होती. त्यानुसार मुर्दापूर धरणाला आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनामुळे जवळपास ८०० ते ९०० एकर शेतीच्या पिकांना फायदा होणार असल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. नशिराबाद परिसरातील मुर्दापूर धरणक्षेत्रात यावर्षी पुरेसा पाऊस झाल्यामुळे १०० टक्के भरलेले आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी व हरभर्याची पेरणी केलेली आहे. परिसरातील शेतकर्यांकडून रब्बीच्या पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे शेतकर्यांनी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडे पाण्याचे आवर्तन सोडण्या संदर्भात मागणी केली होती. त्या अनुशंगाने या पत्राचा सहानुभूती पुर्वक विचार करुन मुर्दापूर धरणातून…
जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या ८० वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्वाभिमान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. खासदार पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त १२ रोजी मुंंबईत व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे कांताई सभागृहात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाच्या आजी माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकार्यांना बोलावले आहे. याशिवाय चाळीसगाव, रावेर, जळगाव यासह जिल्हाभरात रक्तदान शिबिर, मोतीबिंदू शिबिर, वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात देखिल स्थानिक पातळीवर कार्यक्रम होणार आहे. शेतकरी हिताच्या…
जळगाव : जिल्हा प्रतिनिधी तालुक्यातील चांदसर परिसरातील शेतात गुरुवारी राष्ट्रवादी प्रवक्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे परंतु प्रत्येकवेळी राष्ट्रवादीशी गद्दारी करणार्याच्या शेतात राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रशिक्षण शिबिर, असे कडवट टीकास्त्र राष्ट्रवादीचे विधानक्षेत्र प्रमुख रमेश पाटील यांनी नाव न घेता जिल्हा बँक संचालक संजय पवार यांच्यावर सोडले आहे. दरम्यान, या मेळाव्याबाबत अनेक पदाधिकार्यांना कुठलीही माहिती नसल्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. गुरुवारी जिल्हा बँक संचालक संजय पवार यांच्या शेतात राष्ट्रवादी प्रवक्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास नलावडे आणि श्री.साळुंखे हे मार्गदर्शन करणार आहेत. परंतु या मेळाव्याबाबत अनेक स्थानिक पदाधिकार्यांना कुठलीही माहिती अथवा निमंत्रण देण्यात आले…
जळगाव ः प्रतिनिधी जैन दर्शनात श्री तिलोक छंद संग्रहाचे एक विशेष महत्त्व सर्वश्रुत आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन द्वारा मुद्रित आणि श्री जैन रत्न पुस्तकालय अहमदनगर द्वारे प्रकाशित श्री तिलोक छंद संग्रहाचे प्रकाशन हस्ती हीरा नगर स्थित जैन भवन येथे युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री महेन्द्रऋषीजी म. सा., आदि ठाना ५ तथा महासति परमपूज्य मंगलज्योतिजी म. सा. आदि ठाना ३ यांच्या पावन उपस्थितीत तसेच संघपति दलिचंदजी जैन,उद्योगपती अशोकभाऊ जैन, पूर्व महापौर प्रदीप रायसोनी, नगरसेवक अमर जैन, नेमिचंद चोरड़िया, स्वरूप लुंकड, महावीर बोथरा, मनिष लुंकड आणि नितीन चोपड़ा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संघ सेवाभाव, सहकार्याकरिता प्रदीपभाऊ रायसोनी आणि अशोकभाऊ…
जळगाव ः प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर येथे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शैलेंद्र राजपूत,मुख्याध्यापक हेमराज पाटील सर,समन्वयिका वैशाली पाटील उपस्थित होते. वर्गशिक्षक सचिन गायकवाड, आकाश शिंगाणे, दिपाली सहजे, योगेश रत्नपारखी, गणेश वनडोळे, वैभव काष्टे, उमेश पाटील इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शब्द सुमनाने स्वागत करुन विद्यार्थ्यांची ऑक्सी मिटर व थर्मलगनच्या साह्याने तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना विविध सूचना देऊन त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्याध्यापक हेमराज पाटील सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांचा पहिला दिवस असल्याने त्यांना वर्गात बसवून तासिकेच्या स्वरूपात अध्ययन-अध्यापन करण्यात आले. मुलांनी सोबत सॅनिटायझर, तोंडाला मास्क,स्वतंत्र डबा व पाण्याची बाटली…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्र सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या तिन्ही कायद्याच्या प्रतीची होळी भारत बंदच्या वेळी शहरातील सुभाष चौक येथे विविध पक्षांचे राजकीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या साक्षीने करून आपला निषेध नोंदविला. सर्वप्रथम बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी त्या कायद्यांचे थोडक्यात वाचन केले. काळे कायदे रद्द करा अशी मागणी केली व ही मागणी मंजूर होईपर्यंत या कायद्याच्या पुस्तकांची होळी वारंवार करत राहू असे सुद्धा अभिवचन दिले. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे गफ्फारभाई मलिक, वाल्मिक पाटील, शिवसेनेचे विष्णू भंगाळे समाजवादीचे रईस बागवान, कॉंग्रेसचे सरचिटणीस जमील शेख, माजी आमदार मनीष जैन, एमआयएमचे झिया बागवान, काद्रिया फौंडेशनचे फारूक कादरी, फहिम पटेल, अमन फौंडेशनचे सैयद शाहिद…