अमळनेर ः प्रतिनिधी तालुक्यात तीन जिनिंगमध्ये कापूस खरेदीसाठी मोजमाप सुरू राहील, अशी ग्वाही आ.अनिल पाटील यांनी येथील कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रसंगी दिली. यावेळी व्यासपीठावर पणन संचालक संजय पवार, माजी आ. स्मिता वाघ, पणन माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, जि.प. सदस्या जयश्री पाटील, पं.स.माजी सभापती शाम अहिरे, माजी पणन संचालक सुभाष चौधरी, अनिल शिसोदे, सहाय्यक निबंधक गुलाबराब पाटील, लामा जिनर्सचे विनोद कोठारी, विभागीय व्यवस्थापक ए.के.गिरमे, उपव्यवस्थापक आर.जी.होले, बाजार समिती सचिव उन्मेष राठोड, बाळासाहेब सिसोदे, यतीन कोठारी, केंद्रप्रमुख अनिल कदम आदी उपस्थित होते. कापूस पणन महासंघाचे निवृत्त कर्मचारी ए.बी.निकम यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच…
Author: saimat team
चाळीसगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील धडाडीचे पत्रकार तथा खडकी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मुराद पटेल यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचा भगवा त्यांच्या गळ्यात घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. हा प्रवेश सोहळा जळगाव येथील शिवसेना कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आ.चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ.लताताई सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, भीमराव खलाने, सुनील गायकवाड उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दोन दिवसीय ६६ वे राष्ट्रीय अधिवेशनास काल रेशीमबाग, नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, अभाविप राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.छगनभाई पटेल, राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. कोविड-१९ च्या सूचना नुसार अधिवेशनास जे कार्यकर्ते उपस्थित राहू शकले नाहीत अशा कार्यकर्त्यांकरीता ऑनलाईन पद्धतीने अधिवेशनास सहभागी होण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अभाविप जळगाव महानगराच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात शारदाश्रम शाळा येथे अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, शारदाश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका चैतना नन्नवरे, जिल्हा संयोजक रितेश चौधरी, महानगरमंत्री आदेश पाटील यांच्या उपस्थितीत स्वामी विवेकानंद व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत पुरविण्यात येणारी ४५ वाहनांची वाहन सेवा गेल्या पंधरा दिवसापासून अचानक थांबली असल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी व शालेय आरोग्य तपासणीचे कामकाज पूर्णतः बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित, नाशिक यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी २२ डिसेंबर रोजी पत्र काढून सेवा सुरु करण्याबाबत निर्देश दिले व अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. जिल्ह्यातील ४६ पथकांचे काम थांबलं राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम नुसार जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत एकूण ४६ आरबीएसके पथके कार्यरत केले आहे. ४६ पैकी ४५ पथकांना वाहने पुरविण्यात आलेली आहे. सदर वाहने…
भुसावळ ः प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीच्या गेटमधून दारूची वाहतूक होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली होती.यात नुकतेच दोघा कर्मचार्यांना दारूच्या ३५ बाटल्या आतमध्ये नेतांना पकडण्यात येऊन महाप्रबंधकांनी या कर्मचार्यांवर कारवाई केल्याचे वृत्त आहे. सविस्तर वृत्त असे की, वरणगाव आयुध निर्माणीमध्ये युनियनची निवडणूक सुरू असतांना आयुध निर्माणीमध्ये ओली पार्टी रंगत होत्या. तसेच निवडून येण्यासाठी कर्मचार्यांना दारूचे आमिष दाखविण्यात येत असल्याने रोज गेट मधून दारू जात असल्याचे तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली होती.यानंतर दिनांक १८ डिसेंबर रोजी वरणगाव आयुध निर्माणीच्या गेटवर दोन जणांना आत दारू नेतांना पकडण्यात आले होते. आयुध निर्माणीत आलेले नूतन महाप्रबंधक सुशांत कुमार…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील मानराज पार्कजवळ बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलीसांनी आज सकाळी ७ वाजता कारवाई केली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर जमा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ उमेश पवार आणि संतोष पाटील हे रात्रीची गस्त करत असतांना आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क जवळ एक ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ पी २८५० आणि ट्रॉली क्रमांक एमएच १९ एएन ८७०२) वाळूची वाहतूक करतांना दिसून आले. पोलीसांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर चालक सागर उल्हास कोळी रा. वाल्मिक नगर याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला. वाळू वाहतूकीचा परवाना नसल्याने पोलीसांनी वाळूने…
भुसावळ ः प्रतिनिधी मनोरंजन वाहिन्यांचं मायाजाल, समाजमाध्यमांचा वाढता वापर अशा नानाविध कारणांनी कुटुंबातील संवाद हरवला. ज्या घरात ज्येष्ठांचं वास्तव्य नाही ती घरे मुकी बनतात. अभिव्यक्त होण्यांची प्रक्रीया थांबते. संवाद होत नसल्याने साचलपेपणा वाढतो. कालांतराने कौटुंबिक तणाव वाढत जातो. अव्यक्त मने व्यक्त झाली तर ताणतणावावर मात करता येते, असे परखड मत वाशिमच्या लेखिका उज्ज्वला सुधीर मोरे यांनी व्यक्त केले. भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय पुष्पांजली ऑनलाइन प्रबोधनमाला घेण्यात आली. त्यात शनिवारी अंतिम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ‘मुकी घरे बोलकी करू या’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. संकटाच्या काळात, ताणतणावाच्या परिस्थितीत…
भुसावळ ः प्रतिनिधी केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या वतीने नागपूर येथे केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय भटकर यांना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, गसचे माजी संचालक योगेश इंगळे, नूतन प्राथमिक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे, उषा सायन्स सेंटर अध्यक्ष जिवन महाजन, अमितकुमार पाटील, अमित चौधरी आदिंची उपस्थीती होती .
जामनेर ः प्रतिनिधी आमदार गिरीश महाजन यांच्यासह इतर अनेकांनी बीएचआरच्या मालमत्ता अत्यंत कवडीमोल भावात घेऊन ठेवीदारांचे नुकसान केले. ठेवीदारांनी साथ दिल्यास व ते जामनेरात आल्यास बीएचआरच्या मालमत्ता घेणार्यांच्या घरासमोर २६ जानेवारी रोजी मोर्चा काढून घंटानाद करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ललवाणींनी गिरीश महाजन व साधना महाजन यांच्यावर आरोप केले मात्र एकही पुरावा दिला नाही. आमदार गिरीश महाजनांचा जामनेर शिक्षण संस्थेच्या मालमत्तांवरही पूर्वीपासूनच डोळा आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या अधिकृत परवानगी न घेता बीओटी मार्केटमधील गाळे अव्वाच्या सव्वा भावात विक्री करून जवळपास २०० कोटी रूपये कमवले. शेतकी संघाच्या व्यापारी गाळ्यांबाबतही हेच सुरु…
जळगाव ः प्रतिनिधी लिहित्या हातांना ऊर्जा देण्याचे काम पुरस्कारांच्या माध्यमातून होते.वर्तमानात वाङ्मयात नवनवे विषय हाताळले जाताहेत.समाजाच्या वेदनेचा तळ शोधण्याचा प्रयत्न नवी पिढी करते आहे. वाचन, चिंतन, लेखन, मननाची प्रक्रीया साहित्यविषयक उपक्रमातून गतिमान होत आहे, असे मत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक प्रा. डॉ. तेजपाल चौधरी यांनी येथे व्यक्त केले.श्री गजानन हार्ट अॅण्ड आय हॉस्पिटलच्या सहकार्याने यंदापासून साहित्यविषयक पुरस्कार सुरू करण्यात आले. मनोज बोरगावकरांच्या …नदिष्ट…ला स्वर्गीय दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी तर संदीप शिवाजीराव जगदाळेंच्या …असो आता चाड…ला स्वर्गीय गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला होता.या दोन्ही पुरस्कारांचे वितरण शनिवारी करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किसन पाटील, कवी शशिकांत हिंगोणेकर, ज्येष्ठ कवी बाळकृष्ण…