जळगाव : प्रतिनिधी सिटी मालेगाव क्रिकेट असोसिएशन आयोजित खुल्या टी-२० राज्यस्तरीय लेदर बाँल क्रिकेट स्पर्धेत जळगाव येथील जैन इरिगेशन संघाने अंतिम सामन्यात सीएमसीए मालेगाव संघाचा ८९ धावांनी पराभव करून विजेतेपदाची ट्रॉफी सह एक लाख अकरा हजार एकशे अकराचे पारितोषिक प्राप्त केले. अंतिम सामन्यात फलंदाजीत ३० धावा आणि गोलंदाजीत १९ धावांत ३ गडी बाद करणारा जैन इरिगेशनचा तनिष जैन हा सामनावीराचा मानकरी ठरला. तसेच संपूर्ण स्पर्धेत एकूण पाच सामन्यात चार डावात फलंदाजीत एकूण १५७ धावा आणि अकरा बळी घेणारा तनिष जैन हा मालिकावीराचा सुध्दा मानकरी ठरला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जैन इरीगेशन संघाने २० षटकांत ७ गडी बाद…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी राज्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहकार विभागाने राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश काल दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील जिल्हा मध्यवर्ती बंँकेसह ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. न्यायालयाचे आदेश व २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृह निर्माण संस्था आदेशाने वगळण्यात आल्या. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सलग दुसर्यांदा सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेसह ८२ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जिल्हा बँकेचे विकासो व…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव पीपल्स बँक आयोजित व नाबार्ड प्रायोजित महिला बचत गटांच्या उत्पादनांचा मउद्योगिनी मेळावा २०२१ चे आयोजन दि. १८ ते २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत यशोदया हॉल, रिंग रोड, जळगाव येथे शासनाने जाहिर केलेले कोविड-१९ चे सर्व नियम काटेकोरपणे पाळून करण्यात आले होते.त्यास जळगावकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. १८.०२.२०२१ रोजी सदर मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर भारतीताई सोनवणे व उपमहापौर सुनिल खडके यांच्या हस्ते व नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, मनपा माजी सभापती अॅड. शुचिता हाडा, बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, बँकेच्या बचतगट प्रमुख शुभश्री दप्तरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. २० फेब्रुवारी रोजी उद्योजक-ग्राहक सभा आयोजित करण्यात आली होती.…
फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी आई-वडिलांची पुण्याई व अथक परिश्रमातून यश संपादन केलेला सौरभ उमाकांत पाटील हा आपल्या देशासाठी भविष्यातील तेजस्वी तारा असल्याचे परमपूज्य संत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. येथील सतपंथ मंदीर संस्थानमध्ये त्याचा थोर पराक्रमी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पेन भेट देऊन सत्कार केला. पुणे विद्यापीठातून एमएस्सी परीक्षेत सर्वप्रथम येऊन त्याने नेट-जेआरएफ परीक्षेत भारतातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला असून जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर आपल्या देशासाठी गौरवास्पद बाब म्हणजे बंगलोर येथील जगप्रसिद्ध तथा नामवंत संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) यामध्ये ‘हवामान व अवकाश शास्त्र’ या उपयुक्त विषयात संशोधन कार्यासाठी त्याची निवड…
जळगाव : प्रतिनिधी भाजपा सांस्कृतिक सेलच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवगान स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा नुकताच सातार्यात झाला. याप्रसंगी भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, छत्रपती उदयनराजे भोसले, सांस्कृतिक सेलचे प्रदेश प्रमुख शैलेश गोजमगुंडे, कांता नलावडे, भरत पाटील, लक्ष्मण सावजी, नंदेश उमाप, सौ. विनता जोशी, विसुभाऊ बापट उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १५ हजार कलावंतांच्या सहभागाने ३९ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतून, वैयक्तिक व सांघिक मिळून ७८ संघ अंतिम फेरीत पोहचले होते. परंतु राज्यातल्या ठाकरे सरकारने कोविडचे कारण पुढं करत शिवजयंती साजरी करण्यावर घातलेल्या बंधनांना झुगारत, भाजपा सांस्कृतिक सेलने शिवगान स्पर्धेची अंतिम फेरी किल्ले अजिंक्यताराच्या साक्षीने सातार्यात पार पाडली. या वेळी परिक्षक नंदेश उमाप…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सोसायटी व इतर संस्थांचे २ हजार ३८० ठराव सहकार आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आले आहेत. या ठरावांना मंजुरी मिळाल्यानंतर मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पाठवण्यात आलेल्या ठरावांमध्ये ८६१ विविध कार्यकारी सोसायटी तर १५२१ इतर संस्थांच्या ठरावांचा समावेश आहे. जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी ज्योती लाठकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने २३ डिसेंबर २०१९ रोजीच्या मतदार यादीच्या दिलेल्या कार्यक्रमामध्ये सुधारणा केली. २७ ते ३१ जानेवारी या मुदतीत थांबलेली संस्था सभासद प्रतिनिधीचा ठराव दाखल करण्यासाठी १५ ते २२ फेब्रुवारी…
जळगाव ः प्रतिनिधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमीत्त जैन पाईप्सचा उपयोग करून १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फुट असे मोठ्याभाऊंचे भव्य मोझ्याक आर्ट मधील पोर्ट्रटे जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे साकारत आहे. या कलाकृतीचे जागतिक स्तरावरील विक्रमाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भवरलालजी जैन यांचे हे पोट्रेट अत्यंत कल्पकतेने जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने अवघ्या सात दिवसात साकारले. ही कलाकृती कायमस्वरूपी स्थापित करण्यात आलेली आहे. जागतिक विक्रम प्राप्त होणार्या या कलाकृतीला भाऊंच्या सृष्टीतील नयनरम्य अशा भाऊंच्या वाटिकेतून पाहता येणार आहे. भाऊंच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त…
पहूर, ता.जामनेर : प्रतिनिधी येथील पाचोरा रोडवरील संतोषीमाता नगर मधील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी जामनेर पोलीसा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाचोरा रोडवरील संतोषीमाता नगरमध्ये योगेश गायकवाड हे पत्नी अर्चना गायकवाड व दोन मुलांसह रहिवासास आहे. योगेश गायकवाड हे महावितरण कंपनीत कामाला असून ते रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते तर घरी दोघ मुलांसह अर्चना ही एकटी होती. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास अर्चनाचा भाऊ नवल पाटील हा बहिण अर्चना हीस उपचारासाठी हॉस्पीटला न्यायचे…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी आपल्याकडे शासकीय,प्रशासकीय ,महापालिकास्तरीय किंवा पोलीस दलाच्या अंतर्गत कोणत्याच कामात सातत्य दिसून येत नाही.परिणामी कारवाई करून थांबविण्यात आलेले कोणतेही अवैध काम,अतिक्रमणे, वाहन धारकांचा बेशिस्तपणा या गोष्टींवर पूर्णपणे प्रतिबंध लागलेला दिसत नाही.संबंधित विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो किंबहुना कारवाईची मोहीम राबविण्यात येते तोपर्यंत सारे काही अलबेल व व्यवस्थित वाटते मात्र मोहीम थांबली किंवा कारवाई करणे थांबले की, ‘पालथ्या घड्यावर पाणी’ ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग एखाद्या भागात कारवाई करून दुसरीकडे जाताच त्याच जागांवर अतिक्रमणे पूर्ववत दिसतात.कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्याने अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली की सारे बंद मात्र तो अधिकारी बदलून गेला किंवा त्यानेच थोडी…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक कंबरडे मोडलेल्या चित्रपटगृह चालकांना आता पुन्हा चित्रपटगृहांवर बंदी आणून त्यांच्यासह कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवनातून उठविण्याचे कटू निर्णय न घेता चित्रपटगृहांना कोरोनाचे नियम पाळत,क्षमतेच्या टक्केवारीत व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे. जिल्हाधिकार्यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आजपासून काही नियम व अटी लागू केल्या आहेत त्यात चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत मात्र लग्न सोहळे व ंमंगलकार्यालयांना काही मर्यादित संख्येपर्यंत परवानगी दिली आहे.हेच धोरण चित्रपटगृहांबाबत घेतले तर चित्रपटगृहातील कर्मचायांवर उपासमारीची वेळ येणार नाही.तसेच नुकत्याच सुरु झालेल्या चित्रपटगृहांना जीवदान मिळेल. याबाबत शहरातील चित्रपटगृह चालकांचे शिष्टमंडळ आज…