जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून ऑनलाइन सभेतून बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी या सभेनंतर सोमवारी रात्री पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी सत्ताधारी सदस्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबत तीनही पक्षश्रेष्ठींशी बोलून याबाबत निर्णय घेणार असल्याचे ठरवल्याची माहिती महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी दिली. भाजपच्या अनागोंदी कारभारासह अधिकार्यांची मनमानी, दिरंगाई या विषयाची गार्हाणेही सदस्यांनी पालकमंत्र्यांपुढे मांडली. जिल्हा परिषदेतील भाजपच्या पदाधिकार्यांविरोधात महाविकास आघाडीच्या सदस्यांनी रणशिंग फुंकले आहे. या पंचवार्षिकचा कालावधी ८ महिने राहिले असताना सत्ताधारी गटाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याच्या हालचाली शिवसेना, राष्ट्रवादी व जिल्हा कॉंग्रेस या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सुरू केल्या आहेत. सोमवारी झालेल्या सभेतील अभिसरण शुल्कासह अर्थसंकल्पाच्या विषयावर विरोधकांनी पदाधिकार्यांसह…
Author: saimat team
पाळधी ः वार्ताहर पाळधी बुद्रुक येथील शेत रस्त्यावरुन खेडी, कढोली तसेच टाकरखेडा येथील शेतकरी विजय पाटील, सतीश पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील, श्रीकृष्ण पाटील, गुलाब पाटील, शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, भूषण पाटील यांच्यात वाद निर्माण झाला होता. ही माहिती पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कळताच ते वादाचे निवारण करण्यासाठी स्वतः शेतातील बांधावर पोहोचले. त्यानंतर मध्यस्थी करुन पालकमंत्र्यांनी हा वाट मिटवला. या वेळी गावातील प्रगतशील शेतकरी देविदास पाटील, अशोक पाटील, विजू पाटील, दिलीप पाटील, भगवान ठाकरे, बळीराम ठाकरे आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री वाद मिटवण्यासाठी थेट शेतकर्यांच्या बांधावर पोहोचले, अशी चर्चा परिसरात दिवसभर सुरु होती.
अमळनेर ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अमळनेर येथे शिंदे परिवाराने दशक्रिया विधीला वेगवेगळ्या गावी असलेल्या भाऊबंदांनी एकत्र न येता आपापल्या गावी राहत्या घरीच दहाव्याला केस देण्याचा विधी पार पाडला. अंत्यविधींच्या निमित्ताने गर्दी करणार्या समाजमनासमोर नवा पायंडा पडत आदर्श ठेवला आहे. अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या आजी स्मृतिशेष मखमलबाई पिराजी शिंदे यांचे मालेगाव येथे वयोवृद्धत्वामुळे ११ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंड, भाऊबंद असा मोठा परिवार आहे. अंत्यविधीतील अंत्ययात्रा, राख सावळणे, दशक्रिया, उत्तरकार्य अशा प्रत्येक दिवशी भाऊबंद अनेकदा एकत्र येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून इतर सर्व विधींसह दशक्रिया विधीलाही शिंदे परिवारातील…
चोपडा : प्रतिनिधी सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन जाहीर करुन परमीट रुम व वॉईन शॉप विक्री केंद्रे बंद ठेवावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार चोपडा शहरात सर्व दारुची दुकाने बंद आहेत. मात्र, हे बंद असल्यामुळे अवैध दारुविक्रीला ऊत आला असून शहरातील बंद वाईनशॉपच्या बाहेर खुलेआम अवैध दारु विक्री होत आहे. म्हणून प्रशासनाने अवैध दारु व गुटखा विक्री करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी उत्पादन शुल्काच्या अधिकार्यांना दिले. शहरातील वाईन शॉप आणि रितसर परवाना धारक जे आहेत, त्यांनी आदेश स्विकारून आपली मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवली आहेत. पण त्याचाच फायदा घेत चोपडा येथे…
जळगाव: विशेष प्रतिनिधी आज कोरोनाने सार्या देशाला विळखा घातला आहे,आपले जळगाव सुद्धा त्यास अपवाद नाही.रुग्णांची संख्या रोजच वाढत चालली असून मृत्यू चे आकडे धडकी भरविणारे आहेत. ज्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली ते तात्काळ डॉक्टर कडे धाव घेतात . सार्यांनाच जीव प्यारा असतांना काही डॉक्टर मंडळी अव्वाच्या सव्वा बिल आकारून त्या रुग्णास जिवंत असतांनाच मरण दाखवीत आहेत. अशा काही डॉक्टर मंडळींना रुग्णांकडून घेतलेले जादा बिल परत करण्याची नामुष्की आली असून काहींची मान्यताच रद्द करण्यात आली आहे .या घटना पाहून येथे सर्व सामान्यांनी डॉक्टरांविरुद्ध संताप व चीड व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्याच्या समावेश सद्य स्थितीत कोरोना बाबत राज्यातील दहा हॉटस्पॉट शहरात झाला…
यावल ः प्रतिनिधी रावेर येथे एका कोविडने मृत झालेल्या वृद्ध परिचित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही जवळचा नातेवाईक नसल्याने निंभोरा (ता.रावेर) येथील युवा रसिक मंडळाने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी सुनील कोंडे, डॉ.एस.डी. चौधरी, धीरज भंगाळे, हर्षल ठाकरे यांच्यासह रावेर येथील दोन सहकार्यांंनी मिळून अंत्यसंस्कार पूर्ण केले. समाजात अशावेळी तरुणांनी सुरक्षित साधनांचा वापर करून पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन निंभोरा येथील जागरूक तरुणांनी केले होते. याला पाठिंबा देत रावेर तालुक्यातील निंभोरा गावातील प्रसिद्ध डॉ.एस.डी.चौधरी यांनी हे आवाहन सोशल मीडिया गृपवर टाकला. याला प्रतिसाद देत रावेर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. रावेर व परिसरातील एखाद्या कोविड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तीच्या…
रावेर ः प्रतिनिधी आज रोजी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी, ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर उभारणीसाठी निंभोरा पोलीस स्टेशन मधील अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार यांच्या वतीने स्वेच्छेने १३ हजार रुपये तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर ग्रामीण रूग्णालयात डयुरा ऑक्सिजन सिलेंडर उभारण्यासाठी लोकसहभागाचे स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासनाकडून मदतीसाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यास समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उत्तम प्रतिसाद देत असून रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि स्वप्नील उनवणे, सह सपोनि स्वप्निल उनवणे, पीएसआय योगेश शिंदे, चालक सादिक शेख, अश्रफ शेख, वराडे, स्वप्निल पाटील, अब्बास तडवी, आणि सर्व पोलीस अंमलदार यांनी सामाजिक बांधिलकी, समाजाप्रती…
जळगाव ः प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कोरोना संसर्गजन्य आजाराची लसीकरण सुरू करण्याबाबत आज जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या भडगाव तालुक्यात पिंपरखेड, गिरड, गुढे, कजगाव, असे एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्रासह या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत एकूण २३ उपकेंद्र आहेत या उपकेंद्रात किमान आठवड्यातून दोन दिवस ठराविक देऊन त्या दिवशी कोरोना संसर्गजन्य आजाराची लस दयावी या उपकेंद्र कार्यक्षेञात बहूतांश वयोवृध्द पुरूष व महिलांचे प्रमाण असून तसेच शुगर बी.पी.या आजाराचे मंडळी आहेत. या चारही…
फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून दुसरीकडे नैसर्गिक प्राणवायू मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या वृक्षांची बेसुमार तोड होत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात खिरोदा रस्त्यावरील नगरपालिका पाणी शुद्धीकरण केंद्राजवळ लाकूड तस्करीचा अड्डा झाला आहे. परिसरातील कडुलिंब, बाभूळ, भोकर, वड, पिंपळ या असंख्य वृक्षाची अवैध तोड करून ट्रॅक्टरद्वारे येथे आणली जातात. हातकटर यंत्राच्या सहाय्याने त्यांचे येथेच छोटे-छोटे तुकडे करून येथून अन्य ठिकाणी पोहोच केली जात आहे. या ठिकाणी तसेच धाडी नदी पात्राच्या लगत अनेक ठिकाणी जागोजागी असंख्य मोठमोठे लाकूड आणून बेवारस पडलेली दिसत…
जळगाव : प्रतिनिधी चौपदरी महामार्गाच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराची तिघ्रेनजीक कॅम्प परिसरात शेताच्या बांधावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, कामगारांच्या निवासस्थानी या आत्महत्येनंतर संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तीन महिन्यापूर्वी झारखंडमधील दोंदिया पो.अंबा जुरवाडी जि.जरमुण्डी दुमका येथील तरुण संतोष रॉय भीम रॉय (वय २३) हा तिघे्र ता.जळगाव येथे आला होता. तो नियमित कामावर होता. काल रात्री कामकाज आटोपून तो आपल्या सोबत काम करणार्या मजुरांसह झोपून गेला होता. आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिघे्र शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या…