Author: saimat team

यावल : प्रतिनीधी आश्रय फाऊंडेशन यावल रावेर च्या वतीने डॉ.अतुल गुणवंतराव सरोदे यांची कोविड-१९च्या राष्ट्रीय स्तरावरील कोविड-१९ऑन अप्रोप्रिएट बिहेवीअर या समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे यावल रावेर तालुका स्तरीय असलेल्या आश्रय फाउंडेशनच्या वतीने डॉ. अतुल सरोदे यांच्या सावदा येथील निवासस्थानी सन्मान करण्यात आला. खउचठ व नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या व देशभरातील ख्यातनाम डॉक्टर आणि वैज्ञानिक यांचा समावेश असलेल्या या समितीत डॉ.अतुल सरोदे यांचा ही समावेश आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानस्पदबाब आहे,या उत्तुंग भरारी बद्दल यावल रावेर तालुका स्तरीय आश्रय फाऊंडेशनतर्फे डॉ.अतुल गुणवंतराव सरोदे यांना सन्मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन त्यांच्या राहत्या घरी त्यांचा सन्मान करण्यात आला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने १८,१६,१४,१२ व १० वर्षांखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा या वर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे खेळाडूंना घरबसल्या राज्य, राष्टीय जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. कोविड१९ च्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सर्व वयोगटातील व खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यावर्षीच्या सर्व स्पर्धा नेहमी सारख्या होतील असे वाटत होते परंतु मार्चपासून पुन्हा करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे व परिस्थिति पुर्वपदावर येण्याची शक्यता कमी वाटल्यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटनेने या विविध वयोगटातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जुलैमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निश्चित केले. त्यानुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेनेही या सर्व…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निकषात बदल केल्याने गेल्या वर्षापेक्षा या वर्षी केळी फळ पीक विम्याची मिळणारी मदत सरकारने कमी केली आहे.त्यामुळे या दोन वर्षात विम्याच्या रक्कमेत २६ हजार रुपयांची हेक्टरी तफावत आहे. ही रक्कम शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना द्यावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे. या संदर्भात मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री , मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्ताईनगर आणि रावेर या दोन्ही तालुक्यातील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळी फळ पीक विम्याच्या निकषात यावर्षी बदल केल्याने…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शिवसेना जळगाव महानगर तर्फे शिवसैनिक विराज कावडीया यांच्या नेतृत्वात पांडे चौक येथे रिक्षा चालक बांधवांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले. रविवार पर्यंत ११८३ परवानाधारक रिक्षा चालक बांधवांनी शिवसेना कक्षामार्फत ऑनलाईन अर्ज भरले आहे. २५ ते ५ जून पर्यंत शहरातील परमीटधारक रिक्षाचालक बांधवांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील ७ लाख १५ हजार परमिटधारक रिक्षा चालकांना लॉकडाऊच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य म्हणून १ हजार ५०० रूपये घोषीत करण्यात आले आहे. सदर रक्कम परमिटधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा होणार असून यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, लायसन्स, बॅच, रिक्षा परवाना…

Read More

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी येथील महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन धाडी नदीपात्रामध्ये पाणी अडवण्यासाठी खड्डा खोलीकरण कामाचा नुकताच शुभारंभ केला. मागील दोन वर्षांमध्ये झाडी नदीपात्रात केलेल्या खड्ड्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना याचा फायदा झाला हा खड्डा तीन वेळा पूर्ण भरून पाण्याचा जमिनीतील निचरा झाला. परिसराचे प्रांत कैलास कडलक तसेच या विभागाचे सर्कल जे.डी. बंगाळे यांच्या पूर्वपरवानगीने यावर्षी सुद्धा महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पाणी शुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागे तसेच स्मशाभूमी मागे धाडी नदीपात्रात खड्डा खोदण्यास शुभारंभ केला. परिसरातील शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन ना नफा ना तोटा या तत्त्वाने धाडी नदीपात्रातील माती आपल्या शेतात किंवा भराव टाकण्यास घेऊन जावी. यासाठी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी ‘जो मे बोलता हु वो मै करता हु’ असे फिल्मी डायलॉग फक्त सिनेमांमध्ये हिरोच्या तोंडून ऐकायला भारी वाटतात मात्र प्रत्यक्षात तसा अनुभव मात्र प्रेक्षकांना येत नाही. त्यात राजकारणी लोकांच्याबाबत तर बोलायलाच नको. मात्र याला अपवाद ठरेल असा अनुभव चाळीसगाव वासियांना वेळोवेळी येत असतो. आ. मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांनी सकाळी मागणी करताच दुपारी निधीचे पत्र देत संध्याकाळीच कामाचे भूमिपूजन करत पुन्हा एकदा आपल्या धडाकेबात स्टाईलचा प्रत्यय चाळीसगाव वासियांना करून दिला आहे. झालं काय तर चाळीसगाव शहरालगत पावर हाऊस व ओझर शिवारात बहुतांश शेती ही चाळीसगाव शहरात पूर्वापार राहणार्‍या चौधरी समाजाची आहे. या शेतांमध्ये जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा…

Read More

नाशिक – प्रतिनिधी शहरात करोना रुग्णांची संख्या घटत असताना, मृत्युदर मात्र वाढत असल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. एप्रिल व मे महिन्यात खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील रुग्णांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआर पोर्टलवर वेळेत न करता रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सुरू केल्याने दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये शहरात ३९४, तर मे महिन्यात आतापर्यंत ३६५ मृत्यूंची नोंद झाली असून, हा आकडा आणखी वाढणार आहे. दुसरीकडे नाशिकमधील स्मशानभूमीतील आकडा मात्र दीड हजारावर असल्यामुळे आकड्यांची लपवाछपवी होत असल्याचे दिसून येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशकात हाहाकार माजवला. मार्च महिन्यात करोनाचे तब्बल ३० हजार रुग्ण वाढले होते. एप्रिलमध्ये तर दिवसाला तीन ते चार हजार रुग्णांची भर पडत…

Read More

शहीद मेजर विभूती ढौंढियाल यांच्या पत्नी निकिता ढौंढियाल (Nikita Dhandhiyal) सैन्यदलात भरती झाल्या. विभूती शहीद झाल्यानंतर निकिता यांनी जिद्दीने सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला होता. सैन्यदलातील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्यांची लेफ्टनंटपदावर (Lieutenant) नियुक्ती करण्यात आली आहे. देहरादूनमधील मेजर विभूती ढौंढियाला २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निकिता यांनी सैन्यदलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली होती.इलाहाबादमधून वूमेन एँट्री स्कीमअंतर्गत परीक्षा दिली. त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकाडमीतूनत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज त्यांची सैन्यदलात निवड करण्यात आली. https://twitter.com/ANI/status/1398546132100259846?s=20 मेजर विभूती शंकर ढौंढियाल यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे. आज त्यांना सर्वोत्कृष्ट श्रद्धांजली…

Read More

मुंबई : प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वन धन केंद्रामार्फत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हा प्रकल्प राबविणार आहे. आदिवासी कुटुंबाचे सशक्तीकरण व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी हा प्रकल्प राबविण्यासाठी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी पाठपुरावा केला होता. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मोहफुलांचे उत्पादन होते. मोहफुल हे या भागातील आदिवासी कुटुंबाचे उपजीविकेचे हे एक साधन आहे. राज्य शासनाने नुकतेच मोहफुलांवरील निर्बंध हटविले आहेत. मोह फुलाचे आदिवासी बांधवांच्या जीवनातील महत्त्व ओळखून आदिवासी विकासमंत्री…

Read More

मुंबई – प्रतिनिधी पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते. कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्सदेखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथम त्यांचे  आभारही मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार…

Read More