Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्ष सदस्यपदी जमील देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून सदस्यपदी अँड. जमील देशपांडे यांची पाच वर्षाकारिता नियुक्ती करण्यात आली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे अल्पसंख्याक कक्ष कार्यान्वित करण्यासाठी दि. २५ ऑगस्ट २०१६ च्या अधिसुचनेद्वारे सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर कक्षाद्वारे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विविध विद्याशाखांचे व महाविद्यालयीन अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल शैक्षणिक माहिती संकलित करणे, तसेच विद्यार्थ्याच्या दृष्टीने विविध कल्याणकारी योजना व शिष्यवृत्तीचा माहिती उपलब्ध करून देणे व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास व हित जोपासणे इ.…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । भारतीय जनता पक्ष व त्यांचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त हिंदूंचे राजे म्हणून, हिंदुत्वाशी संबंध जोडून त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही असे विधान करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला धर्मांध बनवण्याचा प्रयत्न चालवला आहे. चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध वायरस’ आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, त्यांनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भुसावळ शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहराच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजना, वाहतूक व दळण -वळण अशा सुविधा निर्माण करणे गरजेचे आहेे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटिव्ही लावण्यासाठी मुबलक प्रमाणात निधी देण्यात येईल भुसावळ शहराच्या सर्वांगिन विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. भुसावळ नगरपालिकेतर्फे एकूण 11.41 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि 6.41 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार. रक्षाताई खडसे, माजी मंत्री आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत,…

Read More

यावल, प्रतिनिधी । अमळनेर मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वे एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या आणि एक्सप्रेस गाड्यांची लोकल तिकीट विक्री सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी अमळनेर तालुका व शहर एआयएमआयएम तर्फे करण्यात आली आहे. अमळनेर तालुका अध्यक्ष अज़हरओद्दीन भाई,श‍हर अध्यक्ष सईद शेख,श‍हर उपाध्यक्ष मोईज़ अली सैय्यद,कलीम शेख,हाजी जलालोद्दीन,हसनभाई यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्यांनी अंमळनेर येथील रेल्वे स्टेशन मास्तर यांच्यामार्फत पश्चिम रेल्वेचे जीएम आलोक कन्सलजी जळगाव लोकसभा खासदार उन्मेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर रेल्वे स्टेशन वरून जाणारी सर्व एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या तातडीने सुरू करण्यात यावी आणि संपूर्ण एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा सुद्धा सुरू करावी कारण अमळनेर तालुक्यातील…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रातील गाळ,कचरा,डेब्रिज वाहतूक द्वार द्वार कचरा संकलन कामाच्या ठेक्याची प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी न दिल्याने यावल नगरपरिषदेने पुन्हा तो ठराव/विषय दि.23 डिसेंबर 2021रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी घेतल्याने जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयात यावल नगरपालिकेचा “कचरा” झाला? तसेच यावल नगरपालिकेचा कारभार पाहणाऱ्यांच्या बौद्धिक क्षमतेची सुद्धा चर्च्या सपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणात सुरु झाली आहे. दि. २३ रोजी होणाऱ्या सर्व साधारण सभेचा अजंठा बघितला असता विषय क्र.21असा घेतला आहे की,घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील गाळ, कचरा,डेब्रिज वाहतूक व द्वार ते द्वार कचरा संकलन व अनुषंगिक कामाकरिता नवीन निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश होई पर्यंत सध्या सुरु असलेल्या कामास (कचरा संकलन करणाऱ्या त्याच…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची देशपातळीवर प्रथमत: अंमलबजावणी करत महाराष्ट्राने नेहमीच आपले पाऊल पुढे टाकले आहे. ड्रोनद्वारे लस वाहतूकीच्या या उपक्रमाने दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची आरोग्य रक्षणाची वाट अधिक प्रशस्त आणि सोपी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा जनहितासाठी किती उत्तमपणे उपयोग करून घेता येतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी कर्तव्याप्रती समर्पित राहून एका वेगळ्या उर्जेने काम केल्याबद्दल तसेच सर्वसामान्यांची आरोग्य सुविधा प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचवल्याबद्दल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास, पालघरचे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात २३ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून तीन जणांनी बेदम मारहाण करून चाकू हल्ला केल्याची घटना १६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील २३ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून तीन जणांनी बेदम मारहाण करून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी १६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज गजानन कोळी (वय-२३) रा. हुडको खेडी बुद्रुक ता. जि. जळगाव हा खाजगी वाहन चालवून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. गुरुवार १६…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे गुरुवारी कारगील विजय दिनानिमित्त रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देशभर यावर्षी आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे विजय दिनानिमित्त रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नेहरु युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रेल्वे स्थानक परिसर, रेल्वे पोलीस दूरक्षेत्र स्थानक परिसराची नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी साफसफाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. स्वच्छता अभियानासाठी नेहरू…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव यांच्या पाच लाख लिटर क्षमतेचा नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उदघाटन सोहळा आज सकाळी पार पडला. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँटचे, तर पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीखंड, लस्सी व पनीर या दुग्धजन्य…

Read More