Author: saimat team

जळगाव- शासकीय क्रीडा सप्ताहअंतर्गत बहिणाबाई माध्यमिक विद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाच्या विविध पुस्तकांच्या वाचनातून व साहित्यांच्या आधारे रुची वाढविण्याबाबत प्रयत्न करण्यात आले गिर्यारोहण अथवा ट्रेकिंग विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वामधील सुप्तगुणांना वाव देते आणि भविष्यात एक जबाबदार नागरिक बनवून नेतृत्वगुण सोबत त्यागाची भावना, धाडसीपणा ,  काटक ता ,स्वावलंबन असे गुण विकसित   होतात असे डॉ. विलास नारखेडे यांनी  क्रीडा सप्ताहप्रसंगी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक  टी एस चौधरी यांनी प्रेरक वाचनामुळे   धाडसी कृत्ते  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपणास मार्गदर्शक ठरतात असे मत व्यक्त केले. याप्रसंगी गिर्यारोहणासाठी आवश्यक कपडे व उपकरणे नकाशा वाचन हार्नेस ,रोप, बुट, अशाप्रकारे ट्रेकिंगची  माहिती व उपयोग डॉ. विलास…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ‘कोविड- 19’ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या उत्पन्नात मोठी घट झाली असूनही नागरिकांच्या आरोग्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी निगडित असलेल्या योजनांना राज्यातील महाविकास आघाडी शासन प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. चोपडा, जि. जळगाव नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा (अंदाजपत्रकीय रक्कम 64.76 कोटी रुपये) योजनेंतर्गत जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभाचा उद्घाटन सोहळा गृहमंत्री श्री. वळसे- पाटील यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती…

Read More

यावल, प्रतिनिधी । गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून यावल तालुक्यात रेशन सार्वजनिक वितरण प्रणालीत मोठा घोळ सुरू आहे.दक्षता समितीचे कामकाज सुद्धा फक्त कागदोपत्री असल्याने अनेक रेशन कार्ड धारकांच्या समस्यांकडे, आणि तक्रारीकडे जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा,जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव,फैजपूर भाग प्रांताधिकारी,तहसीलदार यावल कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.यात सर्वात प्रथम जबाबदार ज्या त्या गावातील दक्षता समिती अध्यक्ष आणि सचिव सदस्य यांचे हित संबंधामुळे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता काही रेशन कार्ड धारक दक्षता समितीचे सचिव तथा संबंधित तलाठी यांच्या विरोधात लवकरच रीतसर लेखी तक्रारी करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तसेच विशेष करून यावल रावेर तालुक्यात रेशन सार्वजनिक वितरण व्यवस्थेत…

Read More

नवी दिल्ली । आयात तेलाच्या किमती कमी झाल्याने मोहरी आणि कापूस तेलाच्या भावात शनिवारी देशभरातील तेल-तेलबिया बाजारात घसरण झाली, तर सोयाबीनचे दाणे आणि लूज कमी दराने विक्री न झाल्याने भावात सुधारणा झाली. सामान्य व्यवहारादरम्यान, सोयाबीन तेल, सीपीओ, पामोलिन आणि इतर सर्व तेलबियांचे भाव मागील स्तरावर बंद झाले. व्यापार्‍यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील धुळे येथे प्लांट असलेले सोयाबीन 6,625-6,650 रुपये क्विंटल दराने खरेदी केले जात आहे, ज्यामुळे सोयाबीन धान्याच्या दरात सुधारणा झाली. गिरण्यांना सोयाबीनचा व्यवसाय करावा लागत आहे आणि बाजारभाव गाळपाच्या किमतीपेक्षा खूपच स्वस्त असल्याने गिरण्यांना गाळप केल्यानंतर ते तेल स्वस्तात विकावे लागत आहे, म्हणजेच मिलर्स, प्लांटर्स, आयातदार या सर्वांना मोठ्या प्रमाणात…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर विधानसभा मतदार संघात विधानसभा तालुका संपर्क नेते श्रीकांत पाटील (मुंबई) यांनी विधानसभा मतदारसंघातील गावातील शाखाप्रमुख व शिवसैनिकांची प्रत्यक्ष गावात जाऊन भेटी घेऊन शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जामनेर तालुका विधानसभा मतदार संघाचे आढावा बैठक आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाळधी येथील राजगड या ठिकाणी जामनेर तालुक्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व अंगीकृत संघटनेची पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुका संपर्क नेते श्रीकांत पाटील यांनी सांगितले की आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण ताकदीनं कामाला लागावे जास्तीत जास्ती उमेदवार निवडून आणण्यासाठी जनतेचे काम करावे महाराष्ट्रातील महा विकास आघाडी शासनाचे दोन वर्षात झालेले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सोमवार, दिनांक 20 डिसेंबर, 2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे. सोमवार, दिनांक 20 डिसेंबर, 2021 सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 8.50 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व चोपड्याकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता चोपडा येथे आगमन व चोपडा नगरपरिषद आयोजित सुवर्ण महाराष्ट्र जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत चोपडा शहरात नवीन पाणीपुरवठा योजना उद्घाटन समारंभ. दुपारी 12.00 ते 1.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा. दुपारी 1.00 ते 1.30 अरुणभाई गुजराती, माजी विधानसभा अध्यक्ष यांच्या निवासस्थानी राखीव. 1:45 ते 2:15 वाजता चोपडा तालुका…

Read More

जळगाव प्रतिनिधी । रावेर येथील ब्राऊन सुगर प्रकरणी मुख्य आरोपीला रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे आले असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल रावेर येथून एका महिलेस एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला देखील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट खुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रावेर पोलीस आणि महसूल खात्याच्या मदतीने काल रावेर येथे मोठी कारवाई केली होती. याच्या अंतर्गत रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अख्तरी बानो पिता अब्दुल रऊफ…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । एका भागातील पार्किंगमध्ये असलेली दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील डी मार्ट परिसरात पार्क केलेली तरूणाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र लोटन न्हावी (वय-३४) रा. जिजाऊ नगर, वाघ नगर जवळ हा सलुन दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान शहरातील डीमार्ट येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी दुचाकी (एमएच १९ एएच ६९९९) ने गेला. दुचाकी डीमार्ट परिसरातील पार्क केली. खरेदी करून परत आल्यानंतर दुचाकी जागेवर…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. ही डायनॅमिक किंमत हे सुनिश्चित करते की जागतिक तेलाच्या किमतींमध्ये एक मिनिटाचा फरक देखील इंधन वापरकर्ते आणि डीलर्सना प्रसारित केला जाऊ शकतो. अंतिम पेट्रोल दर रिफायनरीज, उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि मूल्यवर्धित कर किंवा व्हॅट यांना पेमेंट जोडून ठरवले जातात. ते जोडल्यानंतर, पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत जवळपास दुप्पट होते. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,६९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७२० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,६९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,६९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More