रावेर, तालुका प्रतिनिधी । महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरती असणाऱ्या रावेर शहरात अवैध धंद्यांचा भस्मासूर बोकाळला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच अवैध धंद्यांना व त्यांच्या चालकांना खुलेआम पाठबळ देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिस निरीक्षकच नवीन सट्टा पिढी, पत्त्यांचे क्लब यांना अधिकृत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थीने परवानगी देत असल्याने रावेर शहर व तालुक्याची वाटचाल अंधारमय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिस निरीक्षकच आपल्या आर्थिक फायद्यासाठी चहा व पानटपरीसारखे अवैध धंदेवाल्यांना दुकाने थाटण्यासाठी लाखोचा मलिदा घेऊन परवानगी देत असल्याचे सदर चर्चा सुरू असून त्यामुळे त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा पोलिस…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन मधील औषधनिर्माणशास्त्र विभागात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या डॉ. अमृता मुंडे, डॉ. जयश्री चौधरी (स्त्रीरोग तज्ञ) मान्यवरांच्या हस्ते औषध माहिती केंद्राचे द्वितीय आरोग्य बुलेटिन “नवजात शिशुची काळजी: पहिले २८ दिवस” चे प्रकाशन करण्यात आले. ह्यात नवजात बाळाच्या आरोग्य समस्या, नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी व त्यांच्या बालसंगोपनासाठी काही महत्वपूर्ण टिपा ह्याबद्दलची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. ह्याच दरम्यान उपस्थितीत विविध औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण मान्यवरांच्याहस्ते औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या परिसरात करण्यात आले. हे सर्व औषधी वनस्पती “झाडांची…
रावेर, प्रतिनिधी । केंद्रबिंदू म्हणून पंचायत समितीकडे पाहिले जाते. रावेर पं. सं मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्यांनी भोंगळ कारभार सुरु ठेवला असून पं. सं च्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची गुणवत्ता घसरत असल्याने उपविभागीय अभियंता चंद्रशेखर चोपडेकर यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पं.स.च्या अंतर्गत बांधकाम विभाग मार्फत केल्या जाणाऱ्या कामाची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत आहे.अंदाज पत्रकामध्ये ज्या जागेवर कामे करायची आहेत त्या जागेवर कामे न करता इतरत्र कामे करून त्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंदणी करण्याचा अजब गजब प्रकारही शाखा अभियंत्यांमार्फत खुलेआम केला जात आहे. अनेक कामे न करताच मोजमाप पुस्तिकेत बनावट नोंदणी केली गेली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. डी.आर.महाजन…
जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपाली गिरासे ह्यांनी पदभार सांभाळल्या पासून जळगाव सां . बां च्या अंतर्गत प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळण्या साठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आपल्या विभागाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे . चार महिन्याच्या कालावधीत च शिवाजी नगर रेल्वे पूल , सावदा रेल्वे पूल , निंभोरा रेल्वे पूल ह्यांची कामे . ह्या सह रखडलेल्या निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जळगाव सार्वजनिक विभागातील कामांना गती देण्याचे काम अधीक्षक अभियंता रुपाली गिरासे यांनी अत्यंत कार्यकुशलतेने केले आहे . जळगाव शहरातील महत्वाचा संवेदनशील विषय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम अत्यंत…
यावल, प्रतिनिधी । यावल शहरात एका लग्न समारंभात डीजे वाजंत्री च्या गाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ति पार्टी समर्थक आणि अपक्ष लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात जुगलबंदी झाल्याची चर्चा संपूर्ण यावल शहरात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरातील विकसित भागातील एका कॉलनीत गेल्या दोन तीन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस एका लग्न समारंभात डिजेवर आपल्याच आवडीचे गाणे वाजविले गेले पाहिजे,हे गाणे बंद करा ते गाणे बंद आम्ही सांगितलेले गाणे सुरु करा या कारणावरून यावल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काही प्रहार जनशक्ती पक्षाचे समर्थक तथा अपक्ष लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांची डीजे आवाजाबरोबर चांगलीच खडाजंगी आणि हमरीतुमरी झाल्याची संपूर्ण यावल शहरात चर्चा आहेत. प्रहार जनशक्तीच्या…
नाशिक, प्रतिनिधी । कांदा पिकवण्यात अग्रेसर असलेल्या कळवण तालुक्यातील अभोणा परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी यंदाही नेहमीप्रमाणे कांदा लागवडीवर भर दिला असला तरी अवकाळी पावसाने कांदा रोप जमिनीतच सडल्याने अर्धवट कांद्याची लागवड करून शेतकरी वर्ग दुसऱ्या टप्प्यातील कांदा रोपाची वाट बघत असल्याचे चित्र असतांना मध्येच वातावरण बदलाने शेतकरी हवालदिल झाला आहे पहिल्या टप्यातील रोपांनवर करपाने धाव घेतल्याने पूर्ण क्षेत्रात कांदा लागवड होती का नाही तर महिन्यानंतर सर्वत्र अपूर्ण कांदा लागवडीची लगबग सुरू आहे . तालुक्यातील बऱ्याचशा शेतकर्यांची कांदा लागवड झाली आहे तर काहींची अंतिम टप्प्यात आहे. अभोण्यासह,वंजारी,कुंडाणे,विठेवाडी,कळमथे,कुंडाणे,भगुर्डी,दत्तनगर,गोसराणे,बार्डे,बेलबारे,मोहमुख,आंबुर्डी, ओझर, तिऱ्हळ , जामशेत , पळसदर, मोहपाडा , देवळी , बिलवाडी आदि परिसरात कमी प्रमाणात…
रावेर, तालुका प्रतिनिधी । मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन जळगाव जिल्ह्यात टॅक्सीने आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस जळगाव पोलिसांनी रावेर येथे ताब्यात घेऊन तिच्याकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगरची दोन पाकीटे हस्तगत केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने केली मात्र रावेर पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्याचा भस्मासुर बोकाळला असून अवैध धंद्यावाल्यांनी चहा व पानटपरी सारखी आपली दुकाने थाटली आहेत. रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे कायदेप्रिय आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या गुड बुक मधील ते अधिकारी असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची त्यांची हातोटी आहे मात्र अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालून अवैध धंद्यांना चालना देण्याचे कामही त्यांच्या मार्फत होत असल्याने त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले…
यावल, प्रतिनिधी | पिंपरूड फाट्याजवळ वाहने अडवून रस्तालूट करणार्या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जण फरार झाले आहे. आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केले असून दोघे मात्र फरार झाले आहेत. दि. २१ रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास फैजपूर पोलिसांचे पथक पहाटे गस्तीवर असताना पिंपरूळ फाट्यावर तीन तरुण वाहने अडवून वाहनचालकांना मारहाण करत असल्याचे निदर्शनास आले. त्यात मंगेश भाट, (आंदलवाडी, ता. रावेर) यांच्या ताब्यातील ट्रक क्रमांक ४३/ई- ७४४८ या वाहनाला थांबवून चालक यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील २०० रुपये घेतले. या वाहनाच्या काचासुद्धा दगडफेक करून फोडल्या तसेच उमेश चौखंडे (रा. रुईखेडा, जि. अकोला) यांच्या ताब्यातील वाहनालासुद्धा अडवून चौखंडे…
दिल्ली, वृत्तसंस्था । देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून ओबीसी बांधवांच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींना संविधानिक आरक्षण द्यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. समृद्ध भारत फाउंडेशनच्या वतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी राष्ट्रीय परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डी राजा,खा.कॅप्टन अजय यादव,खा. शामसिंग यादव,माणिकराव ठाकरे,दिलीप मंडल,अरविंद कुमार,मनोज झा,समृद्ध भारतचे पुष्पराज देशपांडे, सुनील सरदार यांच्यासह समृद्ध भारत फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना पंचायत राज संस्थांमध्ये राजकीय आरक्षण…
जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न मा प्रधानमंत्री श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचेही आ सुरेश भोळे यांनी पत्रकात म्हटले आहे. आ सुरेश भोळे व दिपक सुर्यवंशी यांनी पत्रकात म्हटले आहे की, ‘अटलजी ते मोदीजी – सुशासनाचा प्रयास’ या विषयावर विविध क्षेत्रातील नामवंतांची…