Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव येथील तहसील कार्यालयात शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम होणार आहे. उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर हे अध्यक्षस्थानी असतील. खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहील. राष्ट्रीय ग्राहक दिन 2021 या दिनानिमित्त केंद्र सरकारने Consumer –Know Your Rights ही संकल्पना निश्चित केलेली आहे. या निमित्ताने ग्राहकांचे प्रबोधन व्हावे, या दृष्टिकोनातून ग्राहक संरक्षण कायदा 1986 यावर प्रबोधनपर कार्यक्रम व ग्राहक जागृती विषयक प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय, चाळीसगाव येथे करण्यात येणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. विशेषत: ग्राहकांना तक्रार करावयाची असल्यास त्यांनी ई- फायलिंग तंत्राचा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ‘नाबार्ड’ने जळगाव जिल्ह्याचा सन 2022-23 करीता 8862.81 कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- 2022-23) तयार केला आहे. या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक विश्वजित करंजकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अरुण प्रकाश, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शशिकांत पाटील, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सदाशिव शिसोदे आदी उपस्थित होते. ‘नाबार्ड’तर्फे प्रतिवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा (पी एल पी) हा एक महत्वाचा दस्तऐवज असून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील गरजू नागरिकांसाठी सामाजिक दायित्व निभावण्याच्या हेतूने शिवसैनिक नीलेश पाटील यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले.या रूग्णवाहिकेचा पिंप्राळा परिसरासह इतरही नागरिकांना लाभ दिला जाणार असल्याचे नीलेश पाटील यांनी सांगितले. नागरिकांची आरोग्य सेवेची गरज लक्षात घेता पिंप्राळा परिसरातील नागरिकांसाठी शिवसैनिक नीलेश पाटील यांच्या वतीने शिवसेना जळगाव महानगर तर्फे मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, विराज कावडिया, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, डॉ अस्मिता…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध समाजमाध्यमे देखील महत्त्वाची आहेत. माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येत्या काळात समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर करुन शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे काम करीत अचूकता आणि गतिमानतेवर भर द्यावा, असे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी केले. दीपक कपूर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी संचालक (प्रशासन) श्री. गणेश रामदासी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कपूर यांचे स्वागत केले तर डॉ. पांढरपट्टे यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद…

Read More

मुंबई, प्रतिनिधी । राज्य सरकारच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आहे.बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, या संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले आहे पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कारण्याबाबत अधिनियम, 2017 च्यानियमांचे पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास राज्य सरकारने परवानगी दिली. या नियमांचा भंग झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशामुळे राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यंत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । विजेत्यांच्या रस्त्यात अडथळे येत राहतात. त्यांच्यापासून बचाव करणे योग्य नसून ते पार करून उद्दिष्टप्राप्ती करण्यात खरा पुरुषार्थ असतो. आयुष्यात पूर्वी जे कधीच केले नाही, ऐकले नाही, त्या अज्ञात विश्वात स्वत:ला झोकून द्या. एखादे काम आपल्याला अशक्य वाटत असेल, तेसुद्धा काम करून पाहा, धैर्याने पाऊल उचलत चला. बंडखोरी वृत्ती जागवा आणि आपल्या कम्फर्ट झोनचा विस्तार करत पुढे जा. नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहिलात तर तुमचे यश त्या कक्षांना कधीही भेदू शकणार नाही. तुम्हाला कम्फर्ट झोनच्या भिंती पाडाव्याच लागतील तेव्हाच तुम्ही जीवनात यशाचे शिखर गाठाल. असे प्रतिपादन कबचौ उत्तर महाराष्ट्र दिन दयाल उपाध्याय योजनेचे संचालक प्रा. डॉ. विवेक काटदरे यांनी…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । पत्र म्हणजे दोन मनांचा संवाद. भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना पत्र लिहून भुसावळ कला विज्ञान आणि पु . ओं .नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पत्राच्या माध्यमातून संवाद साधला. निमित्त होते भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली त्याबद्दल आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धेचे. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम जागृत करणारी हे अभिनव स्पर्धा भारतीय डाक पोस्ट खात्याच्या मार्फत संपूर्ण भारतात आयोजित केलेली आहे. या स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शेकडो पत्रं लिहिली. मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतून पत्र लिहीत विद्यार्थ्यांनी 2047 मध्ये माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल? आणि स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित नायक या विषयांवर अतिशय समर्पक भाषेत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती विद्या मंदिर व प्रगती माध्यमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार दिनांक २०, २१, २२ डिसेंबर गणित उत्सव साजरा करण्यात आला. त्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या रांगोळी, परिपाठ, गणितीय पोस्टर गणितीय प्रतिकृती, गणितीय खेळ, प्रश्नमंजुषा असे वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीच्या 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त प्रेमचंदजी ओसवाल संस्थेचे अध्यक्ष मंगला दूनाखे,संस्था सचिव सचिन दूनाखे यांनी कार्यक्रमास उपस्थित दिली. सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कुणाल पाटील व रामेश्वर नाईक या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरव केला. याप्रसंगी…

Read More

चाळीसगाव : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी चाळीसगाव तहसिलदार यांना ओबीसी आरक्षणाबाबत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील २७ टक्के आरक्षण स्थगित करण्याबाबत दिलेल्या निर्णयामुळे केवळ महाराष्ट्रात राज्यातच नाही तर देशभरातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा देण्यास नकार दिल्याने मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने आता हा डेटा गोळा करावयाची असून त्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. परंतु याच कालावधीत राज्यातील अनेक जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुका आरक्षण पूर्ववत होण्याच्या अगोदर घेतल्या गेल्यास तर राज्यभरातील ओबीसींच्या…

Read More