मुंबई, वृत्तसंस्था । महिला आणि बलिकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारा आळा घालण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला शक्ती ‘फौजदारी कायदा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. काल या संदर्भात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल सभागृहात मांडण्यात आला. राज्यातील महिलांवरील अत्याचार वाढत असताना आपण बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, तांत्रिक बाबींचा आधार घेत न्यायालयातून आरोपी सुटू नये यासाठी शक्ती कायद्यात सुधारणा करण्यात आले आहेत अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. कायदा परिपूर्ण असल्याचा आमचा दावा नाही गृहमंत्री म्हणाले की, हा कायदा परिपूर्ण असल्याचा आमचा दावा नाही मात्र दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीने यावर सखोल विचार केला आहे, संबंधित सर्व तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहेत तसेच…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । लक्षवेधी सचूनेच्या वेळी सदस्य गोपीचंद पडळकर वीज प्रश्नावर आपली भूमिका मांडत असताना सत्ताधारी बाजूच्या बाकांवरुन काही सदस्यांनी शेतकरी चोऱ्या करतात, अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य केले. शेतकरी चोर आहेत का, असा घणाघाती सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच सत्ताधारी बाकावरील त्या संबंधित सदस्यांनी आपल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली. विरोधी पक्ष नेते दरेकर या वेळी आक्रमक झाले. शेतकरी काय चोर आहे का? शेतकऱ्याला चोर समजता काय तुम्ही? स्वतः तुम्ही चोऱ्या करता आणि शेतकऱ्याला चोर म्हणता काय? असे सवाल दरेकर यांनी केले. यावेळी भाजपाच्या सदस्यांनी त्या वक्तव्याचा निषेध केला व…
जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण विभागात नोकरीसाठी परवानगी देण्यासाठी एका जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकाने तीस हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या भावाला शिक्षण विभागात नोकरीसाठी परवानगी (अॅप्रुव्हल) देण्यासाठी जळगाव जिल्हा परीषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील वरीष्ठ लिपिक योगेश खोडपे याने दोन लाख 30 हजारांची लाच काही महिन्यांपूर्वी मागितली होती. काही महिन्यांपूर्वी आरोपीला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी एसीबीच्या अहवालात सिद्ध झाल्याने आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. मागणीप्ररकणी जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. टेबलावर नोटांचे वजन…
मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी चा विषय चांगलाच गाजला. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना धमकी देणाऱ्याची कठोर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रित येऊन केली. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली . मुंबईतील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी मंत्र्यांना दिल्या जात असलेल्या धमकी प्रकरणावर चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधक व सत्ताधारी यांनी धमकी प्रकरणी चौकशी करण्यासाठी सदस्यांची समिती गठीत करावी, अशी मागणी केली. याप्रकरणी मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी आरोपीना…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,५१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १०…
चोपडा, प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात आज 22 डिसेंबर 2021 राष्ट्रीय गणित दिवस गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी पटांगणावर एकत्र येऊन MATHS DAY हे नाव तयार करीत रंगभरण स्पर्धेत सहभागी होऊन ती संपन्न केली. गणित दिवसानिमित्त गणितावर आधारित रंगभरण स्पर्धा कलाविषया मार्फत विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या संकल्पनेतून व सर्व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली.या उपक्रमासाठी विद्यालयातील गणित शिक्षक सरला शिंदे, नूतन अत्तरदे, अजय पाटील, गौरव पाटील, राजेश्वरी भालेराव आदींनी परिश्रम घेतले.
भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील गणित विभागातर्फे श्रीनिवास रामानुजन अय्यंगर यांचा 134 वा जन्मदिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस्. व्ही. पाटील यांनी अध्यक्षस्थानी होते .कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी.एच इंगोले यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या बद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख प्रा. ए.पी नवघरे यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस्. व्ही. पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात रामानुजन…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रिक्षांची प्रवासी भाडे वाढवण्यास नुकतीच उप-प्रादेशिक परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. दिनांक २० डिसेंबर २०२१ पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली आहे. जळगाव शहरातील रिक्षा संघटना व सामाजिक कार्यकर्ते श्री. दीपककुमार गुप्ता ह्यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदना नुसार जळगाव जिल्ह्यातील ऑटो रिक्षा मधील इलेक्ट्रॉनिक फेअर मिटरचे रि-कॅलिब्रेशन (फेर-तपासणी) करण्यासाठी शहरात रि-कॅलिब्रेशन (फेर-तपासणी) केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने रिक्षा प्रवाश्यांकडून इलेक्ट्रोनिक रिक्षा मीटर द्वारे नियमानुसार योग्य भाडे आकारण्यासाठी मा. जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव या संस्थेला सदर प्रकारची तपासणी करण्यासाठी मान्यता…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 जळगाव शहरातील एकूण 19 उपकेंद्रावर 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फक्त परीक्षार्थींनाच प्रवेश राहील, अशा आशयाचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, की या परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. या परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, खबरदारीचे उपाय…