धरणगाव : प्रतिनिधी शहरतील एका परिसरात आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित चंदुलाल शिवराम मराठे (वय – ६२) यांच्याविरुद्ध पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेने शहर प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मराठी गल्ली परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) यांची पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आल्या होत्या .…
Author: saimat team
मलकापुर – प्रतिनिधी सतीश दांडगे येथील पोलीस कर्मचाऱ्याने अहेरी पोलीस स्टेशन,जिल्हा गडचिरोली येथे ड्युटीवर असतांना स्वतावर गोळी झाडुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलडाण्यातील मलकापुर येथील पंतनगर परिसरातील रहिवासी असलेला प्रमोद चांगदेव शेगोकार हा गडचिरोलीतील अहेरी पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी पदावर कार्यरत होता.दी. 20 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास त्याने ड्युटीवर असतांना स्वतःहाच्या पिस्तुल ने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे,तर त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत कळू शकले नसुन अहेरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करित आहेत. तर प्रमोद चांगदेव शेगोकार हा मुळचा मलकापुर येथील पंतनगर परिसरातील रहिवासी असुन त्याच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरातील…
जळगाव : प्रतिनिधी येथील शिवतीर्थ मैदानावर जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक सुनील खडके यांच्या संकल्पनेतून युवा पर्व फाऊंडेशन च्या वतिने 2100 दिव्यांनी शिवरायांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आशिष शिवाजी सोनवणे यांनी रेखाटली व त्यांना युवा पर्वच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. प्रतिमा साकारण्यासाठी 40 किलो रांगोळी,2100दिव्यांचा वापर झाला तसेच 60100 फुट इतकी भव्य दिव्य अशी हि कलाकृती होती अशी कलाकृती साकारण्याचा उपक्रम प्रथमच शहरात राबविण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळातून आपण सावरलो त्यानंतरचा सकारात्मकता दर्शविण्यासाठीचा हा उजेड होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंघर्ष…
चोपडा – चोपडा नगरपालिकेच्या नगरसेविका सौ.मिनाताई प्रकाश शिरसाठ यांचे पती प्रकाश विष्णू शिरसाठ, माजी सैनिक व माजी वरिष्ठ लेखापाल एस.टी.डेपो चोपडा यांचे दि.२१/२/ २०२२ सोमवार रोजी सकाळी ९.३० वाजता निधन झाले. ते भरत शिरसाठ, केंद्रप्रमुख, आडगांव यांचे काका होत. तर संदिप(सनी) शिरसाठ व प्रदिप(विक्की) शिरसाठ यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले, सुना, दोन मुली, जवाई, भाऊ, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कोळगाव ता-भडगाव – (प्रतिनिधी) कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक समता परिषद,जळगावच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तात्यासाहेब ज्योतिराव फुले समता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. एस.ए.वाघ यांनी प्रास्ताविकातुन नानासाहेबांनी शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची ओळख करुन दिली तसेच त्याचे फलित म्हणजेच हा समता पुरस्कार असल्याचे महत्व विषद केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या…
यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यातील आदिवासी समाजातील प्रदेश स्तरावरील एका महिला पदाधिकाऱ्यांने नुकताच भाजपला राम राम ठोकल्याने यावल तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे यानंतर जिल्ह्यातील एक आमदार सुद्धा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संपूर्ण भुसावळ परिसरात बोलले जात आहे. यावल तालुका भारतीय जनता पार्टी मध्ये काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच पक्षाचे काम काज करताना विश्वासात घेतले जात नसल्याच्या कारणावरून भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्यांने राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे,तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे ध्येय,उद्दिष्ट जनतेपर्यंत पोचविण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमाची माहिती सर्व स्तरावरून प्रसिद्ध करणेकामी पदाधिकारी कर्तव्यात कसूर…
फैजपूर: प्रतिनिधी यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेले निसर्गरम्य जागृत देवस्थान श्री पंत मंदिर आनंदवन, डोंगरदे येथिल मंदिर जीर्णोध्दार व भूमी पूजन, वार्षिक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोज ,,,न करण्यात आले. यात सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. त्यावेळी एकूण १४ रक्त दात्यांनी रक्त दान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या कार्यक्रमाला प.पु. गोपाल चैतन्य जी महाराज पाल, स्वरूप दासजी महाराज डोंगरदे, स.गु. शास्त्री भक्तीकिशोर दासजी सावदा गुरुकुल, फैजपूर खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, महंत कृष्ण गीरीजी महाराज सावदा, महंत सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा सावदा, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत दादा पाटील, पंत…
जळगाव प्रतिनिधी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेनेचे नेते तसेच पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांची भेट घेतली. या वेळी संघटनवाढीसाठीच्या भविष्याच्या वाटचाली विषयी गुलाबरावजी पाटील यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्ता दशकातील किस्से व अनुभव युवासैनिकांना आवर्जून सांगितले. पक्ष व संघटन वाढीसाठी स्वतःला झोकून निस्वार्थपणे कार्य करा, मी भक्कमरिते आपल्या पाठीशी आहे असा विश्वास गुलाबरावजी पाटील यांनी उपस्थतीत युवासैनिकांना दिला. युवासेना करीत असलेले कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. करीत असलेले कार्य अविरतपणे, चिकाटीने करीत नवीन समविचारी, राष्ट्रसेवेच्या भावनेने ओतप्रोत युवकांना सोबत जोडून युवासेना जळगाव जिल्ह्यातील कान्या-कोपऱ्या पर्यंत पोहोचवा अशे सूचक विधान केले. या वेळी युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील…
फैजपूर: प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव अंतर्गत आंतर विभागीय पुरूष आणि महिला दोन्ही गटांसाठी भारतलोन व शक्तितोलन स्पर्धा तसेच पुरूष गटासाठी शरीर सौष्ठव अशा वेगवेगळ्या तीन स्पर्धां घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांच्या एकत्रित उद्घाटन करून स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ. सतिश चौधरी आणि उद्घाटक म्हणून फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे तसेच प्रा.डॉ.मुकेश पवार, प्रा.डॉ.दिनेश तांदळे, प्रा.सुभाष वानखेडे, प्रा. क्रांती क्षीरसागर प्रा. उमेश पाटील, प्रा. तेजस शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतिश चौधरी सर यांनी स्पर्धकांना संबोधित करताना महाविद्यालयात विविध क्रीडा प्रकारांच्या आयोजनामगची…
शासकीय यंत्रणा आंधळी आहे का? यावल (सुरेश पाटील): न्यायालयाच्या पायथ्याशी आणि यावल नगरपालिकेच्या समोर 100मीटर अंतरावर अति प्राचीन अशा बुरुजाची तोडफोड करून शासकीय जागेवर व इतर ठिकाणी अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे, यामुळे यावल नगरपालिकेत संबंधित शासकीय यंत्रणा आंधळी आहे का?यावल शहरातील ऐतिहासिक वास्तूंना नष्ट करण्याच्या कुटील कारस्थानाकडे पुरातत्व विभागाचे,विविध सामाजिक आणि काही राजकीय संघटनांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण यावल शहरातून केला जात आहे. यावल शहरात खाटकी वाड्यातुन आठवडे बाजारात जाणार्या प्रमुख रस्त्यावरील अतिप्राचीन बुरुज सुद्धा अतिक्रमणामुळे अदृश्य झाला आहे.इत्यादी ठिकाणांसह अनेक शासकीय कार्यालयांच्या समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूने यावल नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल,आणि महसूल कार्यक्षेत्रात काही ठराविक नागरिकांकडून मिळेल…