जळगाव, प्रतिनिधी । वनपट्टे धारक (IFR) आदिवासी शेतकरी महिलांच्या क्षमता बांधणीतून “समृद्ध शेती-समृद्ध जीवन” प्रकल्पांतर्गत चेतना विकास संस्था , आलोडी वर्धा येथे आयोजित वनपट्टे धारक गांव कार्यकर्ती महिला शेतकरी यांच्या अभ्यास सहलीला मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात लोकसमन्वय प्रतिष्ठान संस्था शेती संदर्भात सातपुडा पर्वत रांगान मधील आदिवासी क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवीत असते. सन २०२१-२२ ते २०२३-२०२४ या ३ वर्षांच्या कालावधीत Motivation for Excellence (MFE) मुंबई यांच्या आर्थिक सहाय्यातून नंदुरबार व जळगांव जिल्ह्यातील ३० गावांमधील आदिवासी कुटुंबातील महिला शेतकऱ्यांसोबत त्यांच्या शेतीविषयक कौश्यल्यांमधे सुधारित तंत्रज्ञान व सेंद्रिय शेती तसेच त्यांची डोंगर उतारांव्रील शेतीत फळबागलागवड, सिंचन ,…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या न्याय मागण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांनी अजिंठा विश्रामगृहात झालेल्या आजच्या बैठकीत घेतला आहे. कोविड काळात निर्माण झालेल्या भयावह स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात टाकून कंत्राटी स्वरूपात रुग्णसेवा करणारे शासकीय कोविड सेंटरमधील डॉक्टर्स, परिचारिका,परिचर, आया, वॉर्डबॉय, कक्षसेवक, लॅब टेक्नीशियन, बेड सहाय्यक, फार्मासिस्ट, डाटाएंट्री ऑपरेटर, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, रुग्णवाहिका चालक आदी कोरोना योद्धा यांना कोविडचा प्रभाव कमी झाला असल्याचे कारण देत शासनाने सेवेतून कमी करत अन्याय केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत आम्ही शासनाला सहाय्य करुन कोरोना निवारण्यासाठी प्रयत्न केल्याने आम्हाला शासकीय…
जळगाव – शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅ फेवर पोलिसांची कारवाई केल्याची बातमीचे वृत्त हटवावे अशी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी धमकी फोनवरुन दोन जणांनी इंडिया आपतक चॅनल जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धमकी देणार्या संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सर्व पत्रकारांनी सोमवार, २७ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहे. शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅ फेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून त्याठिकाणी अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॅ फेत दोन युगल…
मुंबई, वृत्तसंस्था । ‘सरकार हरवले आहे’ असं प्रिंट असलेला कुर्ता घालून चाळीसगांव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज सोमवारी विधानभवनात प्रवेश केला, सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेल्या या कुर्त्यावर ‘ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना वीज, पूरग्रस्तांना मदत, mpsc नियुक्त्या, नोकर भरती भ्रष्टाचार व इतर मुद्दे प्रिंट केलेले असून या सर्वच मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगत हा लक्षवेधी कुर्ता परिधान करण्यामागे असलेली आपली भूमिका स्पष्ट केली. मागच्या बाजूला ‘वसुली सरकार धिक्कार असो’ अश्या मोठ्या अक्षरात प्रिंट केलेल्या या कुर्त्यावर पुढच्या बाजूला “शेतकरी वीज मागतोय, MPSC उमेदवार नियुक्ती मागताहेत, बेरोजगार पारदर्शकपणे नोकरी मागताहेत, मराठा आरक्षण मागताहेत, ओबीसी हक्क मागतोय,…
मुंबई, वृत्तसंस्था । भूमि अभिलेख विभागाच्या 1967 च्या मूळ नकाशांच्या बोगस प्रती तयार करुन पश्चिम उपनगरातील मढ आयलंड येथे नो-डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड आणि एनअे नियमांचे उल्लंघन करुन दुरुस्तीच्या नावाखाली धनाढ्यांनी नवीन बांधकामे केल्याबाबतच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत केला. भूमि अभिलेख कार्यालय, मुंबई महानगरपालिका व धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीने संगनमत करुन 830 बंगल्याचे बोगस नकाशे तयार केले. यामधून कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या उप अधीक्षक, भूमी अभिलेख, अनधिकृत बंगल्यांना सोयीसुविधा देणारे मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी…
राळेगणसिद्धी, वृत्तसंस्था । ‘सच की नाव डुबती नही है ।’ देशातील सनदी अधिकाऱ्यांनी ठरवलं हा देश बदलायला वेळ लागणार नाही. कोणत्याही सरकारच्या अधिकारात फक्त बदली करणे आहे आणि अधिकारी बदलीला घाबरतात. अशा वातावरणात चांगले अधिकारी काम करताना दिसतात हा एक आशेचा किरण आहे. हे चित्र पाहिल्याने आपल्याला एक पाऊल पुढं टाकण्याची शक्ती मिळाली आहे. या संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘जे श्रवण केलंय ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा’ अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे यांनी केली. राळेगणसिद्धी येथे सुरु असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या दोन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हजारे पुढे…
भुसावळ प्रतिनिधी । येथील दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नी विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या व्यसनाला आहारी गेलेल्या पतीकडून सतत मारहाण व शिवीगाळ होत असल्याचा त्रासाला कंटाळून पत्नीने दारूड्या पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पत्नीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक केली आहे. गणेश प्रभाकर महाजन (वय-५०, रा. लक्ष्मी नारायण नगर, हनुमार मंदीरामागे, भुसावळ) असे मयत पतीचे नाव असून सीमा गणेश महाजन (वय-४६) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. गणेश महाजन आणि सीमा महाजन हे भुसावळातील लक्ष्मी नारायण…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील मी रूम परिसरातील महादेव मंदिर जवळ असलेल्या घोडा वाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलास फोन लावून घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग विझविली. जळगावातील मेहरूण परिसरात असणार्या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्नीशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शहरातील मेहरूण परिसरातील महादेव मंदिराच्या परिसरात असलेल्या गोडाऊनला रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. काही मिनिटांमध्येच आगीचे लोळ उठत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दलास पाचारण केले. महापालिकेच्या फायर फायटर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास प्रारंभ केला. अग्नीशामन दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यास प्रारंभ…
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येत सुधाकर मोहने यांच्या शेतातून ठिबक फिल्टरच्या जाळ्या, रबर, झाकन, कॉक असे जवळपास ५ ते ६ हजार रुपये किमतीच्या वस्तू दिनांक २४ शुक्रवार रोजी रात्रीला चोरी गेल्या, तसेच पिंपळगाव खुर्द येथील अनिल पाटील यांच्या शेतातून मोटार केबल चोरीला गेली, असून चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येते आहे.