Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बँकेच्या संचालिका अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री ९ वाजता हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, सुनिल पाटील व पंकज कोळी यांच्यासह अन्य चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या संचालिका अ‍ॅड.रोहिणी खडसे या चांगदेव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता माणेगाव फाट्याजवळ जिनींगजवळ त्यांच्या कार क्रमांक एमएच १९ सीसी-१९१९ समोर चार मोटारसायकलवरुन आलेल्या ७ हल्लेखोरांनी हल्ला चढविला होता. हातात तलावर, पिस्तूल व लोखंडी रॉड असलेल्या सात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चारचाकीचा काच फुटला होता. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी “हेडस ऑफ इन्कम अँड इट्स प्रोविसनस” या विषयावर ऑनलाइन सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. ई.भंगाळे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून भुसावळ शहरातील चार्टर्ड अकाउंटंट दीपक मेहरानी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आयकर ला फक्त अभ्यासक्रमा पुरते मर्यादित न ठेवता त्याचे आर्थिक व्यवहारात असलेले महत्त्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना आयकर म्हणजे काय, आयकर साठीचे विविध उत्पन्न स्रोत, जसेकी जसे की इनकम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रोपर्टी, बिझनेस अँड प्रोफेशन, कॅपिटल गैन,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष मा.दिपक सुर्यवंशी यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व भाजपच्या कार्यकर्त्या सना जहांगीर खान यांची अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्यांना नुकतेच शहराचे आमदार व जिल्हाध्यक्ष ग्रामीण मा. सुरेश भोळे(राजूमामा) आणि जळगाव जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सना जहांगीर खान ह्या मुक्ताईनगर तालुक्यापासून ते जळगाव जिल्ह्यापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवल. त्या १९९३ पासून भारतीय जनता पार्टीच्या सदस्या आहेत. २०१२ ते २०१४ पर्यंत जिल्हा चिटणीस, २०१४ ते २०२० जिल्हा उपाध्यक्षा, अल्पसंख्यांक सेवा संघ जिल्हा अध्यक्ष, मायनोरीटी एजुकेशन वेल्फेअर सोसायटी अध्यक्षा, महिला विकास फौंडेशनच्या…

Read More

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्यावर हल्ला चढविला असल्याचा आरोप जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या राहिणी खडसे यांनी नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मी सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे (एमएच १९ सीसी-१९१९) या क्रमांकाच्या कारने येत असताना अचानक त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. कारमध्ये यावेळी त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नेहरू नगरातील मोहाडी रोड परिसरातील दोन दुचाक्यावर पेट्रोल टाकून रात्रीच्या सुमारास जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी एमएमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मोहाडी रोडवर असलेल्या नेहरू नगरात एका अपार्टमेंटच्या पार्किंग झोनमध्ये मध्यरात्री दोन दुचाकींना पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम रामचंद नथाणी (वय-६१) हे मोहाडी रोड एक्झोटीका अपार्टमेंटच्या फ्लॅट नं. ३०४ मध्ये कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. अपार्टमेंटच्या खाली पार्किंग मध्ये त्यांच्या मालकीची पॅशन प्रो (एमएच १९ बीए १९८७) यांसह टिव्हीएस स्कुटी (एमएच १९ एक्स ६३१) अशी दोन वाहने त्यांनी २६ डिसेंबर रोजी रात्री…

Read More

जळगाव प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील कांचन नगर वाणी गल्लीतील रहिवासी हेमकांत उत्तम बाविस्कर (वय-४८) खासगी सुरक्षा रक्षक म्हणुन काम करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ ए एफ ८२१०) क्रमांकाची दुचाकी आहे. सोमवार २७ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात असलेल्या मुतारीजवळ त्यांनी दुचाकी पार्क करून कामावर गेले. त्यानंतर अर्धातासानंतर आले आता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला तरी देखील दुचाकीचा पत्ता लागला नाही. हेमकांत बाविस्कर यांनी शनीपेठ पोलीसात…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यावर गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. यानंतर काल हल्ला करण्यात आला असून याला राजकीय आयाम असण्याचा संशय आज राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त करत याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महानगरतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगलाताई पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी विनोद देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गावगुंडांनी भ्याड हल्ला करून महिलांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या सन्मानासाठी रोहिणीताई यांनी काही दिवसापूर्वी आवाज उठवून आक्रमक भूमिका घेतली होती. याचमुळे रोहिणी ताई…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरातील ४५ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनांची जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत महिला जखमी झालेली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील खंडेराव नगरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाबाई श्याम मोरे (वय-४५) रा. खंडेराव नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास या महिला कामानिमित्त खंडेराव नगर येथून विद्यूत कॉलनी परिसरातून पायी जात होत्या. एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर आज रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दगडफेक केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेक झाली त्यावेळी त्यांच्या कारमध्ये त्या स्वतः होत्या, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत पोलिस अधिक माहिती घेत असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे. रोहिणी खडसे- खेवलकर या चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी येथील त्यांच्या घरी परतत होत्या. त्याचवेळी मुक्ताईनगर सूतगिरणी जवळ अज्ञात इसमांनी समोर येत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांची फॉर्च्युनर कार (एम एच १९ सीसी १९१९) याचा पुढील बाजूने काच फुटला आहे. दरम्यान, या घटनेमुळे…

Read More