Author: saimat team

यावल, प्रतिनिधी । तापी नदीच्या किनारपट्टीवर म्हणजे यावल तालुका महसूल कार्यक्षेत्रात तापी नदीच्या आजूबाजूस मोठा विस्तीर्ण गौण खनिजाचा साठा असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र गौण खनिजाचे हजारो ब्रास उत्खनन करण्यात येत असून संबंधित स्टोन क्रशर धारक यावल तहसील मधून नाम मात्र गौण खनिज परवाना उपलब्ध करून घेत असून प्रत्यक्षात मात्र वाजवीपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करून कोट्यवधी रुपयांची कमाई करून घेत असल्याचे यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे. यावल तहसील कार्यालयात म्हणजे यावल तालुका महसूल कार्यक्षेत्रात,अंजाळे,अकलूद, कासवा शिवारात एकूण फक्त एकूण अकरा स्टोन क्रशर धारक मालक-चालक यांची नोंदणी झाल्याचे यावल तहसील कार्यालयात नोंद आहे.यात अनुक्रमे मनमोहन लालचंद लाहोरी,गणेश शिवाजी रावडे, संजय…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ बहिणाबाई ब्रिगेड आणि लेवा सखी घे भरारी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन दिनांक 2 जानेवारी २०२२ रविवार रोजी सकाळी 11 वाजता लेवा भवन टेलिफोन ऑफिस जवळ जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी विवाहोत्सुक युवक-युवतींचे कौटुंबिक व शैक्षणिक माहिती असलेली परिचय पुस्तिका चे देखील प्रकाशन करण्यात येणार आहे याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंब नायक रमेश दादा पाटील हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय, एकनाथरावजी खडसे, डॉक्टर उल्हास पाटील,खासदार श्रीमती. रक्षाताई खडसे , आमदार शिरीष चौधरी , आमदार सुरेश भोळे ,जळगाव महापौर जयश्री ताई महाजन,…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उत्तम काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमाला आणि ‘भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन’ या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, महापौर उषा ढोरे, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. वसंत शिंदे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी…

Read More

रावेर, तालुका प्रतिनिधी । तालुक्याचा केंद्रबिंदू म्हणून पंचायत  समितीकडे पाहिले जात असतांना रावेर  पं.सं ची प्रतिमा मलिन करण्याचे काम पं.स.मध्ये  कार्यरत असलेल्या  बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्यांनी भोंगळ कारभार सुरु ठेवल्यामुळे होत असतांना दिसून येत आहे.  पं. सं च्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची गुणवत्ता घसरत असतानांही वरिष्ठ अधिकारी मात्र आपल्या शाखा अभियंत्याची पाठराखण करीत असल्याने पं. स. सदस्यांसह नागरिकांकडून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली जात आहे.एकंदरीत रावेर पं.स.चे शाखा अभियंते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओंजळीत असल्याचेही बोलले जात आहे. या बाबत कार्यकारी अभियंता बांधकाम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या भोंगळ कारभार करणाऱ्या शाखा अभियंत्यांना त्यांच्या कर्तव्याची  जाणीव करून देऊन या प्रकरणी…

Read More

रावेर :  तालुका प्रतिनिधी मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांची ब्राऊन शुगर घेऊन जळगाव जिल्ह्यात आलेल्या बऱ्हाणपूर येथील महिलेस जळगाव पोलिसांनी रावेर येथे ताब्यात घेत  तिच्याकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगरची दोन पाकीटे हस्तगत केल्याच्या कारवाईने स्थानिक गुन्हे शाखेचा नावलौकिक झाल आहे. याविरुद्ध रावेर पोलीस मात्र अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी देत पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन करीत असतांना खुलेआम दिसून येत आहे.स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी घेत शहरासह तालुक्यात अवैध धंदे चहा व पानटपरीसारखे थाटले आहेत. गंभीर बाब म्हणजे अवैध व्यवसायाच्या प्रसिद्धी माध्यमांनी बातम्या प्रकाशित केल्यावरही नाममात्र कार्यवाहीचा कांगावा करीत रावेर पोलीस आपली आर्थिक पोळी भाजत असल्याची जोरदार  चर्चा रगली  आहे.  वरिष्ठ अधिकारीसुद्धा रावेर पोलीस निरीक्षकांना अभय…

Read More

जळगाव :  विशेष प्रतिनिधी । येथील मुख्यमंत्री सडक योजनेतील कार्यकारी अभियंत्याची नुकतीच बदली झाली आहे. नेतृत्वहीन कार्यालयाचा भोंगळ कारभार मात्र यामुळे चव्हाट्यावर येतांना दिसून येत आहे. कार्यालयात खुर्च्या रिकाम्या दिसून येतात, जिल्हाभरातील ठेकेदारांची कामे रखडल्याचे दिसत आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक माळुदे हे नाशिकला वास्त्यव्यास असल्याने या कार्यालयाचा कारभार आठवड्यातून एक ते दोन दिवस रेल्वेच्या वेळापत्रकानुसार,सोयीनुसार चालत असल्याने कार्यालयातील शाखा अभियंते,उपविभागीय अभियंते हेदेखील मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. याबाबत वरिष्ठांकडे काही सुज्ञ ठेकेदार तक्रारी करणार असल्याचे विश्‍वसनीय गोटातील वृत्त आहे . मुख्यमंत्री सडक योजनेचे जळगाव कार्यलय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने वादग्रस्त राहिले आहे.आता तर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरात अज्ञात व्यक्तीने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातले टॉप्स लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाणा करून अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास केल्याची घटना मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी मेहरूण येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण परिसरातील रेणूका हॉस्पिटल समोर संगिता विजय सोनवणे (वय-४२) ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला घरात काम करत असतांना…

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । शहरात आज सकाळी मच्छी मार्केट परिसरात एका महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातील गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त होत असतांनाच आज एका महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी आरपीडी रोडवरील मच्छी मार्केटच्या परिसरात एका महिलाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. या महिलेची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तिच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसून येत असून शारीरीक अत्याचार…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्याचे पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली. विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केल़े आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, भ्रष्टाचाराचा कहर झाला असून, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे, अशी टीका…

Read More