जळगाव, प्रतिनिधी । सध्या देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉन व कोरोना संक्रमण वाढल्याचे निदर्शनास आल्याने , प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातलेले असुन हॉलमधील कार्यक्रमाला आसनक्षमतेच्या 25 टक्के व मोकळ्या जागेवरील कार्यक्रमाला 50% याप्रमाणे मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे . अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, बहीणाई ब्रिगेड व लेवा सखी घे भरारी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २/१/२०२२ वार रविवार रोजी सकाळी 11 वाजता लेवा भवन , जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विवाह ईच्छूक युवक- युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते . सदर परिचय संमेलनास मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून व परराज्यातून देखील मोठ्या…
Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,७५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,७५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,७५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…
मुंबई, वृत्तसंस्था । कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विवाह सोहळय़ांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असेल. तसेच रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत. मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळी चौपाटय़ा किंवा समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाटय़ा बंद केल्या जाणार आहेत. राज्यात दोन दिवसांत करोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थांचे मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘‘ओमिक्रॉन’’ ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा अधिक धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये /रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर, 2021 रोजी व दि. 1 जानेवारी, 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील वरद व्हेटरनरी लॅबतर्फे नववर्षानिमित्त अँटीरेबीज पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्याअंतर्गत पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. प्रभात चौकजवळ समर्थ कॉलनीतील वरद डायग्नोस्टिक लॅबतर्फे पाळीव प्राण्यांसाठी मोफत अँटीरेबीज लसीकरण केले जाणार आहे. दि.१ ते १५ जानेवारी दरम्यान नोंदणी अभियान राबविले जात असून प्रत्येकाला टोकन दिले जाणार आहे. प्रजासत्ताक दिन दि.२६ जानेवारी २०२२ पासून प्रीमियर पेट केअर क्लिनिक, गणेश कॉलनी याठिकाणी टोकन दाखवून लसीकरण करण्यात येणार आहे. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन वरद व्हेटरनरी लॅबोरेटरीजचे पंकज सोनवणे, किर्ती बडगुजर, डॉ.जय राजपूत यांनी केले आहे.
यावल, प्रतिनिधी । भारत सरकारच्या युवा क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्रातर्फे यावल येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात कबड्डी व्हॉलीबॉल आणि धावणे या स्पर्धां स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव यांच्या सहकार्याने संपन्न झाल्या. या स्पर्धेत 15 ते 29 या खूल्या वयोगटातील युवक व युवती खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर सर,लेखापाल अजिंक्य गवळी सर, यावल तालुका समन्वयक तेजस पाटील व पल्लवी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन यावल तालुका तहसीलदार महेश पवार साहेब यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून यावल कॉलेज प्राचार्य डॉ संध्या सोनवणे मॅडम, उपप्राचार्य खैरनार सर उपस्थित…
जळगाव, प्रतिनिधी । राज्य सरकारने विद्यापीठ अधिनियम 2016 सुधारणा विधेयक पारित केले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे मा.राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच मा. राज्यपाल करावी लागेल. राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर भारतीय किसान संघाच्या माध्यमातून लाभकारी मुल्य शेतमालाला मिळावे म्हणून धरणे आंदोलन दि.११ जानेवारी रोजी केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वैभव महाजन यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला उत्पादनाधारीत तसेच शेतकऱ्यांचे कष्ट गृहीत धरून लाभकारी मुल्य प्राप्त व्हावे त्यासाठी सरकारने शेतकरी हितासाठी कायदा करावा म्हणून महामहिम राष्ट्रपतींना आग्रह करणेसाठी भारतीय किसान संघ दि.११ रोजी धरणे आंदोलन तहसील कचेरीवर केले जाणार आहे.या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने तालुका संपर्क प्रमुख गावागावात जावून या धरणे आंदोलनासाठी संपर्क करणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात धरणे आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी भारतीय किसान संघाचे…
जळगाव, प्रतिनिधी । शेतकऱ्याची गाडी आडवून मारहाण करून त्यांच्याजवळून रोकड व सोन्याची चैन हिसकवून जबरी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळीचे पैसे घेवून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याची दुचाकी आडवून बेदम मारहाण करून खिश्यातील ५० हजारांची रोकडसह सोन्याची चैन आणि अंगठी जबरी हिसकावून चोरी केल्याचा प्रकार घडला होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भादली खुर्द ता. जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. निवृत्ती गंगाराम साळुंखे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील…