जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका कंपनीतून सातशे लिटर डिझल चोरी करणा-या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अटक केली आहे. तालुक्यातील उमाळा शिवारात असलेल्या स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत इलेक्ट्रिकल वायरिंग अँसेसरीजची निर्मिती होते. वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी या कंपनीत जनरेटरची व्यवस्था आहे. या जनरेटरसाठी लागणारे डीझेल एका बंद खोलीत साठवलेले असते. 27 व 28 डिसेंबर दरम्यान या खोलीचा कडीकोंडा तोडून 65 हजार 800 रुपये किमतीचे सातशे लिटर डीझेल चोरी गेले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखला करण्यात आला होता. जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व स्थानिक…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी पाथरी ग्रामची जत्रा भरत असते.तसी ती दोन तीन दिवसा पासूनच सुरूवात होते . मार्गशीर्षची अमावास्याला वर्षभरातून खंडेरायाला कबूल केलेले नवस फेडण्याचा दिवस असतो.सामुहीक जेवन करत असतात हा चांगल्या वागणूकीचा परीपाक आहे.या दिवसा पासून गावातीलच कर्तबगार तरुण बाहेर नौकरी निमित्ताने गेलेले,कितीही लांब म्हणजे सुरत हून गावचे मंडळी येत असतात . दुसऱ्या दिवशी सकाळी घरोघर वरण, बट्टी ,वांग्याची घोटलेली भाजी साजुक तुप तेही केळीच्या पानावर सकाळी जय मल्हारला ,बहिरोबाला नैवेद दिला जातो ,सोबत श्रीफळ वाढवले जाते.अगरबतीचा घमघमाट तर विचारू नका मग घरोघरी आलेले पाहूणे सोबत जेवणाचा बेत मस्त पार पडतो.जेवनात केलेला गरमागरम स्वयंपाक ,गुळ,साखरेची मधूर…
जळगाव, प्रतिनिधी । नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील सर्व मंदिरे ही सरकारी नियंत्रणांतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विषयीचा कायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती मनापासून स्वागत करते. हिंदु जनजागृती समिती आणि अनेक समविचारी संघटनांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कर्नाटक राज्याप्रमाणेच देशातील अन्य राज्यांनीही राज्य सरकारने कह्यात घेतलेली हिंदूंची सर्व मंदिरे ही सरकारीकरण मुक्त करून भक्तांकडे सुपूर्द करावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी तेथील भाजपने मागील निवडणूक जाहिरनाम्यातच याविषयीची घोषणा केली होती. आज देशातील अनेक राज्य सरकारे, तसेच केंद्र सरकार त्यांच्याकडील…
चोपडा, प्रतिनिधी । अजमेर येथून भडगाव – चाळीसगाव कडे जात असणाऱ्या वाहनातून १४ तलवारी चोपडा ग्रामीण पोलिसांनी आज जप्त केल्या आहेत . सूत्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारावर ओमनी कार मधून काही इसम छुप्या पद्धतीने तलवारी घेऊन जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले चोपडा उपविभाग चोपडा यांना मिळाली होती. त्याआधारे अधिक तपास केला असता एका वाहनातून या तलवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले चोपडा उपविभाग चोपडा , चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्या पथकाने वाहनाची झाडाझडती घेतली असता गाडीच्या मागे सीट कव्हर व गाडीच्या पत्र्याच्या मधल्या गॅपमध्ये १४ तलवारी लपवल्याचे निदर्शनास आले. यावेळी १४ तलवारी चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त…
जळगाव, प्रतिनिधी । केळी या पीकाला जास्त तापमान व तापमानात जास्त घट झाली तरी मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. हवामानावर आधारीत फळपीक विम्याचा नवीन निकषानुसार तापमानाचा पारा सलग तीन दिवस ८ अंशापर्यंत खाली गेला तर विमाधारक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरत असतो. डिसेंबर महिन्यात १७ ते २० डिसेंबर दरम्यान जळगाव शहर परिसराचा पारा सलग काही दिवस ८ अंशापर्यंत स्थिर होता. त्यामुळे याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचा सूचना पालकमंत्री गुलबराव पाटील यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. फळपीक विमा योजनेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील…
पारोळा, प्रतिनिधी । गुजरात राज्यातील दिंडोरी येथील अट्टल गुन्हेगार कैलास आधार पाटील राहणार महादेव नगर दिंडोली सुरत गुजरात हा जळगाव जिल्ह्यात लपुन बसल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे मिळाल्याने त्यांनी त्यांच्या शोध घेत त्याला जेरबंद केले. स्पेशल ऑपरेशन ग्रुप सुरत सिटी गुजरात यांनी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्याशी संपर्क साधुन जळगाव जिल्ह्यात कैलास आधार पाटील हा लपुन बसल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ. अशोक महाजन, पोह. संदीप रमेश पाटील, पोना. प्रवीण मंडोले, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील असे पथक नेमून त्यांना आदेश दिले.…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या व्यापारी गाळेधारकांनी आजच्या बाजार भावानुसार भाडे व अनामत रकमेचा भरणार करावा असे सूचित करत याआधी अनधिकृतपणे गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण केलेल्या गाळेधारकांवर गाळे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. ते जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या सभेत बोलत होते. या सभेत क्रीडा संकुलांशी संबंधीत सर्व विषयांवर व्यापक उहापोह करण्यात आला. जळगाव जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची सभा आज जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला आमदार राजूमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला महानगरच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आदर्श शिक्षीकांचा सत्कार जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श शिक्षीकांचा सन्मान व सत्कार जिल्हा बँकेचे मा अध्यक्ष गुलाबराव देवकर व जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरोज तिवारी मुख्याध्यापिका, अश्विनी रावसाहेब साळुंखे, ज्योती लक्ष्मण पाटील, नीता शैलेश पाटील, दीप्ती चंद्रकांत नारखेडे, उज्वला विलास पवार, वर्षा प्रकाश गवळी, धारा ठक्कर आदी शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, शालिनी सोनवणे, कल्पिता…
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. विजय गायकवाड, राजेंद्र वाघ, राजेंद्र धाकड, दिलीप मोराणकर, ज्ञानेश्वर डहाके, गोपाळ बहुरे, उमेश टेकाळे आदी उपस्थित होते.
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी दि. ३ जानेवारी जनसंपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच, रुग्णालय व महाविद्यालयाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले असून लवकरच दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतल्यानंतर सुधारणांना सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वी बंद झालेला जनसंपर्क कक्ष सोमवारी दि. ३ जानेवारी सुरु करण्यात आला. सोमवारी ओपीडीमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी गर्दी केली होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातून शेकडो नागरिक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी दररोज येत आहेत. रुग्णालयाच्या आवारात मुख्य गेट क्र. १ समोर…