Author: saimat team

यावल, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपन्न झाले या हिवाळी अधिवेशनात रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी महत्वाचे एकूण २४ लक्षवेधी प्रश्न विचारले आहेत. प्रश्न क्रमांक ३७ हजार १७८ बघितला असता यावल येथील नगरपालिकेच्या अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामात पावणेदोन कोटी रुपयाच्या फवारा बाबतचा प्रश्न नगर विकास विभागाचे नगर विकास मंत्री यांना विचारण्यात आला आहे. यावल येथील नगरपालिका द्वारे यावल शहरास पाणीपुरवठा करणारा अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामात कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून या कामात पावणे दोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप खुद्द नगराध्यक्षा व काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दि. २८/०९/२०२१ रोजी केला…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाउंडेशन च्या वतीने जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे. स्व . निखिलभाऊ खडसे यांच्या जयंती निमित्ताने नाथ फाऊंडेशनच्या वतीने १४ वर्ष वयोगटातील जळगाव जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन पर स्मृती चिन्ह तसेच विशेष प्राविण्य असलेल्या खेळाडूंना गोल्डमेडल देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये बेस्ट फलंदाच , बेस्ट बाँलर , व्हिकेटकिपर , मँन आँफ मँच अशी कामगिरी गृहीत होती. तसेच १४ खेळाडू यांना टिशर्ट क्रिकेटचे किट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, नगरसेवक सुनिलभैय्या माळी , सरचिटणीस सुशील शिदे, सरचिटणीस विशाल…

Read More

धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथे व्यायाम व्यायाम शाळेची जिम साहित्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कोरोनाने व्यायामाचे महत्व पटवून दिले आहे. पोलीस, सैन्यदल, निमलष्करी दल भरतीसाठीदेखील व्यायाम आवश्यक आहे. निरोगी समाजासाठी व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते तालुक्यातील निंभोरा येथील जय भोले मंदिराजवळ व्यायामशाळेसह जीम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. या व्यायामशाळेचा परिसरातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील हे होते. निंभोरा येथील युवकांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अद्ययावत व्यायामशाळा उभारून आधुनीक साहित्य प्रदान करण्याचे आश्‍वासन दिले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरापासून गाडेगाव घाट येथे 31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शिवशाही बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी  संशयितांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव आगाराची शिवशाही (बस क्रमांक एमएच १८ बीजी ८७१) ही औरंगाबाद येथून जळगावकडे येत असतांना ३१ डिसेंबररोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काच फोडला आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर बसवाहक युवराज प्रधान कोळी व बसचालक रोहन संजय पाटील (वय-२८ , रा. हिंगोणा ता. चोपडा ) यांनी शिवशाही बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. बसचालक रोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मनियार बिरादरी ने २०२२ या नव वर्षाच्या सुरुवातीला संकल्प केला आहे की या वर्षात समाजातील विधवा, पीडित घटस्फोटीत व परिपक्व महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊ व त्याची सुरुवात त्यांनी एक जानेवारीला पाच शिलाई मशीन देऊन केली आहे. महिलांना गृह उद्योग चालवायचा आहे अशा महिलांना सुद्धा मन्यार बिरादरी आर्थिक सहकार्य करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांनी घोषित केले. मागील दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने शाळेबाहेर बसून गोळ्या बिस्किटे विकणारी महिला यांना सुद्धा मन्यार बिरादरी आवश्यकतेनुसार आर्थिक पाठबळ देत आहे. ज्या घटस्फोटित ,विधवा व पीडित महिला असतील ज्यांना स्वयंरोजगारासाठी मदतीची आवश्यकता असेल त्यांनी…

Read More

पहुर. ता.जामनेर, प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या वाकोद येथील ३५वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची घटना आज दि.३१रोजी रात्री१वाजेच्या सुमारास वाकोद येथे घडली. याप्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी स अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ३५वर्षी य महिलेने पहुर पोलिसात दिलेल्या फिर्यादी त म्हटले आहे की, वाकोद येथील लच राममंदिर जवळ राहणारा गणेश भगवान मोहिते(वय३२)हा आज दि.३१रोजी रात्री १वाजेच्या सुमारास मी झोपेत असतांना माझ्या घराच्या स्वंयपाक खोलिच्या खिडकीतून चोरटा प्रवेश करून आला.व मला झोपेतून उठवून चाकूचा धाक दाखवून खिडकीतून बाहेर खेचून मारहाण करून गालावर चावा घेतला. माझ्या शेजारील गजानन काळे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या पहिल्या रुम…

Read More

पहुर. ता. जामनेर, प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद या राज्य महामार्गावर वाकोद जवळ वाघुर नदीच्या पूलाचे जवळ एक पल्सर मोटारसायकल आयशर या मालवाहतूक करणाऱ्या गाडीला आडवी लावून सुमारे १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावल्याची घटना काल दि.३०रोजी रात्री ८.२० वाजेच्या सुमारास घडली. वाकोद आणि फर्दापूर या सिमेदरम्यान वाघुर नदी असून नदिवर पूलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाकोद हद्दीत रस्त्यावर खोदकाम केले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची गती हळू होते. याचा फायदा उचलून एका विनानंबरच्या पल्सर मोटरसायकलवरील तीन अनोळखी ईसमांनी एका मालवाहतूक करणाऱ्या आयशर गाडी ला पल्सर मोटारसायकल आडवी लावून चालक मुकेश रमेश सोलंकी रा.काबरी ता.भगवान पूरा जि.खरगोन(म.प्र.)ह.मु.भाग्यश्री पाँलिमर्स उमाळा जळगाव याच्या जवळून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे व्यसनमुक्ती कार्यक्रम द_दुधाचा द_दारूचा हा व्यसनाला आळा घालणारा उपक्रम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ शुक्रवार रोजी शिव कॉलनी स्टॉप जळगाव येथे ठीक ४ वाजता आयोजीत करण्यात आला. यावेळी समाजसेविका भारती कुमावत यांनी व्यसनांना बळी न पडता दारू ऐवजी दूध घेतले तरं आरोग्यासाठी हितकारक ठरेल व कुटूंब परिवार देखील आनंदी राहील.तर अध्यक्ष मनिषा पाटील यांनी सांगितले की आज ३१ डिसेंबर सर्व पुरुष वर्गाने घरी दुधाचे पदार्थ नेऊन आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करावा.तसेच उपस्थित पुरुष वर्गाला प्रत्येकाने किमान पाच जणांना हा मोलाचा संदेश देऊन २०२१ सालासाठी उत्कृष्ट कार्य करून सरत्या वर्षाला निरोप…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । शहरातील जुना बोदवड रोडवरील सहा वर्षीय बालिकेला खाऊचे आमिष दाखवीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालिकेचा एका वृध्दाने विनयभंग केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याला जमावाने चोप दिल्याची घटना येथे घडली. शहरातील जुना बोदवड रोडवरील घरकुलातील रहिवासी हाफिस बेग मेहमूद बेग (वय ५८) या वृद्धाने परिसरातील सहा वर्षीय बालिकेला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून तिचा विनयभंग केला. बालिकेच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच ते संशयिताच्या घराकडे आले असता त्या वृद्धाने बालिकेच्या कुटुंबियांशी अरेरावी केली. यामुळे जमावाने त्याला जोरदार चोप दिला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक किरण शिंदे हे आपल्या सहकार्‍यांसह…

Read More