मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे महापालिकेतील तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांना प्रशासकीय सेवेतील मानाचा राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराचा मान मिळाला आहे. कोरोना काळातील व्यवस्थानाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अग्रवाल यांच्यासह गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अरुण बोंगिरवार फाऊंडेशनच्या वतीने येत्या सहा जानेवारीला आयोजिलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुण्यात मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा पहिल्या रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य व्यवस्थापनाची जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । समस्त बारी पंच मंडळ जळगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न व नूतन कार्यकारिणी जाहीर आज दिनांक ०२ रविवार रोजी सालाबादप्रमाणे समस्त बारी पंच जळगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा समाजाचे जोशी पेठ येथील बारी समाज हितवर्धिनी हॉल याठिकाणी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन करण्यात आले. सभेची सुरुवात समाजाचे आद्य संत रुपलाल महाराज यांचे प्रतिमा पूजनाने झाली. सभेस गत वर्षात समाजातील ज्ञात-अज्ञात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रस्तावना मंडळाचे सहसचिव मयुर बारी यांनी मांडली. तर सभेचे मागील वर्षाचे अहवाल वाचन मंडळाचे खजिनदार बालमुकुंद बारी यांनी केले. सभेत मागील आर्थिक वर्षातील कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील वर्षात आगामी…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) निमित्त गांधी उद्यानमध्ये बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत संपन्न झाले आहे. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) निमित्ताने गांधी उद्यान येथे पोलीस बँड पथकांच्या आवाजात सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, डीवायएसपी चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. ज्येष्ठ नागरिक रजनी महाजन, आशा तळेले, मधुकर झांबरे, उमेश पाटील यांचे तसेच डीवायएसपी ससे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक सोनवणे व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.…
यावल, प्रतिनिधी । येथे आज शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचे काटा पूजन उद्घाटन करताना यावल तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांना डावलून आपल्या विश्वासातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना आमंत्रित केल्यामुळे यावल तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भरड धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाचे निर्णय आणि परिपत्रक कोणत्या प्रकारे आहेत याबाबतची माहिती सुद्धा यावल तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून भरड धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाला जास्त प्रतिसाद दिला जाणार असल्याचे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.
जामनेर, प्रतिनिधी । येथील अल्पवयीन मुलीवर विनयभंग केला होता. संशयितांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करणारे तीन संशयित आरोपी फरार झालेले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालिकेचा विनयभंग झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावात पोलिसांवर दगडफेक हल्ला करण्यात आले होते . त्यात तिघे आरोपींवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार झाले आहेत. जामनेर येथील जुन्या बोदवड रोडवरील घरकुलातील रहिवासी हाफिस बेग मेहमूद बेग वृद्धाने सहा वर्षीय बालिकेचा विनयभंग केला होता. त्यास घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर सलीम करीम बागवान, कैफ शेख रफिक व शाहरूख शेख साहेबू बागवान यांच्यासह काहींनी दगडफेक केली होती. यात चार पोलिस जखमी झाले…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन संघ व्यवस्थापक पदी जितेंद्र शिंदे यांची सलग तीसऱ्यांदा महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. एडहॉक कमिटी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन (भारतीय बास्केटबॉल महासंघ) यांच्या अधिपत्याखाली दि. १२ ते १६ डिसेंबर २०२१ रोजीपर्यंत औरंगाबाद येथे १८ वर्षा आतील मुले व मूली राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर राज्यस्तरीय स्पर्धेतुन महाराष्ट्र बास्केटबॉल संघ निवडन्यात आला. निवड झालेला संघ दि. ४ ते १० जानेवारी दरम्यान इंदौर (मध्यप्रदेश) येथे भारतीय बास्केटबॉल महासंघ आयोजित १८ वर्षा आतिल मुले व मूली राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. १८ वर्षा आतिल मुले महाराष्ट्र संघासाठी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,१५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०१०रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,१५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,१५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२…
चोपडा, प्रतिनिधी । विश्वातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था म्हणून रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय पातळीवर सुपरिचित आहे. जगभरातील शाखांद्वारे विविध क्षेत्रातील सेवाभावी , विधायक उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ चोपडा या संस्थेने नूतन वर्षाची सुरुवात भव्य योग व प्राणायाम शिबिराने केली आहे. दि. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे शिबिरात सहभागी होणाऱ्या पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे . शिबिर विनामूल्य असून यात योग, ध्यान, प्राणायामाबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबिर सर्वांसाठी खुले असून सोबत योग मॅट, सतरंजी ,पाण्याची बाटली इत्यादी आणण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शिबिरार्थींनी सैल कपडे…
पहुर.ता.जामनेर, प्रतिनिधी । येथील पोलिस ठाण्याअंतर्गत काल दि.३१ रोजी रात्री१०वाजेपासून सकाळी ४वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली. यावेळी एकुण१३०वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच २५ वाहनांवर मोटार वाहन कायदे अंतर्गत कारवाई करण्यात आली. पहुर पोलिस ठाण्याअंतर्गत सर्व प्रमुख शहरातील विविध व्यवसाय वेळेत नियमांचे पालन करत बंद करण्यात आले. नाकाबंदी मध्ये स्वतः पोलिस निरीक्षक अरुण धनवडे सहभागी होते. पहुर पोलिस ठाण्या अंतर्गत प्रमुख शहरातील पहुर, शेंदुर्णि व फत्तेपूर येथे नाकाबंदी करण्यात आली. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक दिपक मोहिते, पोहेकाँ शशिकांत पाटील,पो.काँ.जवानसिंग राजपूत, ज्ञानेश्वर ठाकरे, गोपाल माळी, श्रीराम धुमाळ, रवींद्र देशमुख, मेघराज चव्हाण, किरण शिंपी, प्रशांत विरणारे, प्रविण चौधरी, अनिल राठोड,…
पहुर. ता. जामनेर, प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या वाकोद येथील ३५वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची घटना काल दि.३१रोजी रात्री१वाजेच्या सुमारास वाकोद येथे घडली होती. याप्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली होती. आरोपी गणेश भगवान मोहिते (वय३२)रा.वाकोद यास आज दि.१जानेवारी२२रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास ४जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.