जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. विजय गायकवाड, राजेंद्र वाघ, राजेंद्र धाकड, दिलीप मोराणकर, ज्ञानेश्वर डहाके, गोपाळ बहुरे, उमेश टेकाळे आदी उपस्थित होते.
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी दि. ३ जानेवारी जनसंपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच, रुग्णालय व महाविद्यालयाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले असून लवकरच दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतल्यानंतर सुधारणांना सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वी बंद झालेला जनसंपर्क कक्ष सोमवारी दि. ३ जानेवारी सुरु करण्यात आला. सोमवारी ओपीडीमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी गर्दी केली होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातून शेकडो नागरिक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी दररोज येत आहेत. रुग्णालयाच्या आवारात मुख्य गेट क्र. १ समोर…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील शिवसेनेचे प्रसिद्ध प्रमुख तथा पत्रकार गणेश राव पांढरे यांचे धाकटे बंधू स्वर्गीय श्याम कुमार पांढरे पैलवान यांचा आज 22 वा स्मृतिदिन निमित्त अभिवादन करण्यात आले. येथील शिवसेना शहर कार्यालय स्वर्गीय शामकुमार पांढरे यांच्या प्रतिमेचे पूजन विविध कार्यकारी संस्थेचे माजी चेअरमन तथा माजी शहरप्रमुख सुकलाल बारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार गणेश पाढरे राष्ट्रीय काँग्रेसची तालुका उपाध्यक्ष रवींद्र पांढरे शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे उपशहर प्रमुख सुभाष पाटील युवा सेनेचे उपतालुका प्रमुख अमीन शेख शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्यअशोक जाधव भाऊ राव गोंधनखेडे बापू सोनार गणेश तायडे आत्मा…
यावल, प्रतिनिधी । राजकारणात समाजात आता काही ठिकाणी आपले विशिष्ट वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी कोण काय शक्कल लढविली हे आता सांगता येणे कठीण झाले आहे.काही धूर्त व्यवहारी हे शासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून किंवा नाम मात्र मानधनावर कामकाज करून आणि काही ठराविक मध्यस्थी दलाली करीत असून काही ठिकाणी रक्ताचे नातेसंबंधातील सदस्य आपल्या आर्थिक बळावर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून अधिकारी कर्मचारी व सामाजिक क्षेत्रात आपला प्रभाव टाकीत असतात आणि याकडे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे एक उदाहरण यावल शहरात उघडकीस आले आहे,गुप्त खबर मिळाल्या वरून तसेच यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच यावल पोलीस स्टेशनला तत्कालीन स्वीपर…
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात रविवारी दि. २ जानेवारी रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी रस्ते, ब्लॉकची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे परिसर स्वच्छ व सुंदर दिसत होता. सोमवारी दि. ३ जानेवारी रोजी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी जनसंपर्क कक्ष पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सकाळी रुग्णालयात जाऊन सर्व कक्षांचा आढावा घेतला. या वेळी दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. डॉक्टर, परिचारिकांशी संवाद साधून रुग्णसेवेबाबत विचारपूस केली. रुग्णालयातील रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत देखील त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचार्यांकडून आढावा घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला जनसम्पर्क कक्ष सोमवारी दि. ३ जानेवारी…
जळगाव, प्रतिनिधी । बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भीमाकोरेगाव लढाईच्या २०४ विजय शौर्य दिन व मशाल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रॅली ची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ला अभिवादन करून रॅली सुरुवात करण्यात आली तद्नंत रॅली ही रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन त्या ठिकाणी रॅली चे अभिवादन सभे मध्ये रूपांतर झाले. यावेळी या प्रबोधनात्मक सभेचे उद्घाटक सुमित्र अहिरे (खान्देश प्रभारी, बामसेफ) तसेच विजय स्तंभ पूजन जयश्री सुनील महाजन (महापौर, जळगाव म.न.पा) यानी केले. यावेळी प्रमुख वक्ते दिपाली…
जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सतरा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा गिरणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नांद्रा (ता. पाचोरा) येथील सतरा वर्षीय शाळकरी मुलाचा माहेजी येथील गिरणा नदीपात्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. हर्षल संजय तावडे असे मृत मुलाचे नाव असून, रविवारी (ता. २) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. हर्षल काही मित्रांसोबत माहेजी येथील गिरणा नदीपात्रात (Girna River) पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला. हनुमंतखेडा येथील नावेकरींनी शोध घेऊन त्याला बाहेर काढले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. हर्षलने…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून तीन जणांनी लाकडी दांड्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तालुक्यातील शिरागड येथील तरूणाला जुन्या वादातून तीन जणांनी लाकडी दांड्याने मारहाण करून कुऱ्हाडीने जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील शिरागड येथील योगराज शामराव साळुंखे (वय-३७) रा. शिरागड ता. यावल जि.जळगाव हा तरूण शेती करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. १ जानेवारी रोजी गावातील काशिनाथ अण्णा साळुंखे याने योगराज याला शिवीगाळ केली. याचा जाब विचारला. याचा राग आल्याने सकाळी ७…
जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज २ जानेवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील भादली येथील ३५ वर्षीय तरूणाने रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीला आली आहे. नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील भादली येथील रहिवासी भागवत अशोक फेगडे (वय ३५, रा. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथील भागवत फेगडे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेर जाऊन…