रॅलीने दिला सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी, ८ डिसेंबर रोजी समाज बांधवांतर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीची सुरुवात तरुणांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत कुढापा चौक, नेरी नाका येथून झाली. ही रॅली पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चित्रा चौक, एस.टी. वर्कशॉप मार्ग असा मार्गक्रमण करत संताजी जगनाडे महाराज बगीचा येथे समारोप करण्यात आला. शहरातून निघालेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच रॅलीने सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला.
रॅलीत शारदा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, महानगराध्यक्ष मनीषा चौधरी, बेबाबाई सुरळकर, डॉ. सुषमा चौधरी, आशा चौधरी, अनिता चौधरी, जयश्री चौधरी, मेघा चौधरी, दिपाली चौधरी, सरिता चौधरी, सिमरन चौधरी, रूपाली चौधरी, तृप्ती चौधरी, प्रिया चौधरी, रंजना चौधरी, मोहिनी चौधरी, भारती चौधरी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
