यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून रक्कम लांबविण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला या घटनेत एका संशहीतास पोलिसांनी अटक केली आहे.घटनेचे वृत्त करतात घटनास्थळी डीवायएसपी,पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह हजर होऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँक चे एटीएम आज रात्री अज्ञात इसमाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला हा प्रकार 27 चे रात्री घडला दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले एटीएम फोडले असल्याचे सकाळी स्टेट बँक ग्राहकांच्या लक्षात आल्यानुसार तत्काळ त्यांनी पोलीस पाटील संतोष जीवराम पाटील यांना व सरपंच अजय-अकमल यांना कळविले त्यानुसार त्वरित दोघांनी यावल पोलिसात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळवल्या नुसार पोलीस निरीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे यांनी भेटी देऊन ग्रामपंचायततिने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली त्यानुसार एका संशियतास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. एटीएमच्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतल्याचे दिसुन येत आहे. एटीएमचे पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तो तोडलेला आहे सुमारे एटीएम मधील 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले आहेत पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व मार्ग सर्व तपासणी केली त्यानुसार एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे,घटनास्थळीचा पंचनामा फौजदार सुदाम काकडे सहाय्यक फोजदार नितीन चव्हाण यांनी केला गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे दरवाजाचे कुलूपही गेल्या आठवड्यामध्ये अज्ञात इसमाने तोडले असल्याचे वृत्त आहे त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयात चार ते पाच वर्षांपूर्वी संगणक कक्ष तोडून फेकण्यात आलेले होते तर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दोन वर्षात दोन वेळा एटीएम रूम फोडून नुकसान करण्यात आलेले आहे हे चोरटे नेमके कुठले व काय याची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे,तसेच गावातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी एक तरी पोलीस कर्मचारी रहिवासी असावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे दहिगावात अनेक वेळा रात्रीच्या वेळेस घटना घडत असतात एखाद्या वेळेस फार मोठा अनर्थ होऊ शकतो याला जबाबदार कोण राहणार?असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत घटनेची फिर्याद एटीएम वेंडर दीपक दौलत तिवारी यांनी यावल पोलिसात दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकारी पोलीस करीत आहेत.