पिंप्री येथे बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न

0
31

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंप्री येथे बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन जण ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रयत्न करीत असतांना धरणगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुण बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या दुकानांवर जात त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. दुकानदारांना मात्र, ५०० ची नोट बनावट असल्याचे लागलीच लक्षात आले. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उध्दव ढमाले यांनी पथकाला पिंप्री गावात रवाना केले. या पथकाने बराच वेळ बाजारात त्यांचा मागोवा घेतला. एका दुकानावर अखेर दोघे सापडले. त्यानुसार प्रवीण नंदलाल जैस्वाल (रा. खंडवा) आणि राधेशाम शरद जाखेटे (रा. जळगाव) असे संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here