जामनेरातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयात खेळाडूंचा सत्कार

0
72

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन

साईमत/जामनेर/प्रतिनिधी : 

जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.के.डी निमगडे, प्रा.जी जी अत्तरदे, प्रा.संजय क्षीरसागर, प्रा.दिनेश महाजन, प्रा.हर्षा दहिलेकर, सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा प्रा.सविता महाजन, क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.सोनुसिंग पाटील, प्रा.विजेता परदेशी, प्रा.वैशाली पाटील, प्रा.कांचन पाटील, प्रा.रुपाली पाटील, प्रा.पूजा पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेत विशेष कामगिरी करणारे मिताली मिस्तरी, जान्हवी पाटील, प्राची थोरात, सलोनी न्हावी (राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल खेळाडू), तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय पात्र खेळाडू- संचीता पाटील, सुजाता माळी साक्षी माळी, सविता बारेला, दिव्याभारती माळी, सुमित चिंचोले, प्रतीक पाटील, अर्जुन पवार, प्रबोध सपकाळे, मयूर बोरसे आदी खेळाडूंचा सत्कार तसेच शालेय जिल्हा स्पर्धेसाठी पात्र व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, मैदानी संघास शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी आयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here