डीपीडीसी बैठकीत अंबादास दानवे मंत्री भूमरे, सत्तारांना थेट भिडले

0
15

साईमत, छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव्ो हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भिडले. ठाकरे गटाचे आमदार उदयिंसग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याव्ोळी मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे आमदार राजपूत आणि अंबादास दानव्ो सत्तार-भुमरे जोडगोळीवर तुटून पडले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पावसाळी अधिव्ोशनानंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरणार असे संकेत होते. अगदी तशीच वादळी बैठक झाली. निधीवाटपावरून जसा अधिव्ोशनात गदारोळ झाला तसाच गदारोळ नियोजन समितीच्या बैठकीतही झाला.
ठाकरे गटाचे आमदार उदयिंसग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याची तक्रार केली. यावरून भडकलेल्या पालकमंत्री भुमरेंनी आणि अब्दुल सत्तारांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनवायला सुरूवात केली. त्यानंतर अंबादास दानव्ो यांनी रौद्ररूप धारण करत आपल्या खुर्चीवरून उठून भुमरे-सत्तारांवर तुटून पडले. उभय नेत्यांमधला हा वाद थेट हमरीतुमरीपर्यंत गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here