साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील शिव कॉलनी परिसरातील श्री गुरुदत्त विकास बहुउद्देशीय मंडळ संचालित श्री सिद्धि गणेश मंदिरात दि. 2 ऑक्टोंबर सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता नगरसेवक प्राचार्य डॉ. सचिन पाटील यांच्या सौभाग्यवती ज्योती सचिन पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
यावेळी नगरसेवक प्राचार्य डॉ. सचिन पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, श्री सिद्ध गणेश मंदिराच्या ज्या काही गरजा असतील तसेच या मंडळाच्या कामासाठी मी सदैव मदत करायला तयार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. सचिन पाटील यांचा सत्कार मंडळाचे पांडुरंग बाविस्कर, राजू पाटील, शामराव सोनगिरे, बाळासाहेब कासार, नवीन कार्यकारणी मंडळ सदस्य राजेश रेणुके, मयूर पाटील, दिनेश पाटील, हरीश चौधरी, संभाजी शिंपी, सुधाकर कापुरे, शिव कॉलनी परिसरातील मिलिंद पाटील, रामा पाटील, श्याम पाटील, निरंजन वाणी, आदींनी केला.
तसेच ज्योती सचिन पाटील यांचा सत्कार अनिता पाटील, संगीता कापुरे, संध्या नेर पगारे, लताबाई कासार, बोरसे आजी, सोनल शिंपी, शिव कॉलनी परिसरातील महिला भगिनींनी केला. सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी केले. यावेळी संभाजी शिंपी , राजेश रेणुके यांनी मनोगत व्यक्त केले. आभार मुरलीधर उर्फ सुधाकर कापुरे यांनी केले.