साईमात : जळगाव : प्रतिनिधी
येथील गोदावरी संगीत महाविद्यालयात राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा या गोदावरी करंडक राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन रविवार दि. १७ रोजी करण्यात आले आहे. गेल्या २६ वर्षापासून ही स्पर्धा यशस्वी होत असून यंदा २७ वे वर्ष आहे.बाल गट, किशोर गट, प्रौढ गट अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे.
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत बाल गटात (इ. १ ली ते ६वी), किशोर गट (इ. ७ वी ते १२ वी), प्रौढ गट (वय वर्षे ४० पर्यंत) अशी विभागणी केली असून बाल गटातुन प्रथम १००१ रोख बक्षीस, करंडक, प्रमाणपत्र, द्वितीय – ७०१ रूपये रोख, करंडक, प्रमाणपत्र, तृतीय ५०१ रोख करंडक, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. किशोर गटातुन प्रथम १५०१ रोख, करंडक प्रमाणपत्र, द्वितीय १००१ रोख, करंडक, प्रमाणपत्र, तृतीय ७०१ रोख, करंडक, प्रमाणपत्र तर प्रौढ गटातुन प्रथम २००१ रूपये रोख, करंडक, प्रमाणपत्र, द्वितीय १५०१ रोख, करंडक, प्रमाणपत्र, तृतीय १००१ रोख, करंडक, प्रमाणपत्र असे बक्षीस राहणार आहे.
सकाळी ८ वा या स्पर्धेचे उदघाटन गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, प्राचार्य पदमजा नेवे आणि परिक्षकांच्या हस्ते तर समारोप सायंकाळी ५ वा. केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय भास्कर मार्केट येथे ९९२१९९६९७४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.