साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडीजवळ समाधान मोरे यांची शेती आहे. शेतातील विहिरीत गेली पाच दिवसापासून विषारी जातीचा नाग पडलेला होता. शेतकऱ्याने त्याची माहिती ब्राम्हणशेवगे येथील सर्पमित्र गौरव नेरकर यांना दिली. अथक परिश्रमानंतर नाग विहिरीतून बाहेर काढण्यात येऊन नैसर्गिक आदिवासात सोडून ‘जीवदान’ दिले.
यावेळी परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. याबद्दल गौरव नेरकरचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.