साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे संस्थापक अशोक गणेश राठोड यांना गुजरात येथील वेलनेस फाउंडेशनतर्फे २०२४ चा ‘विश्व रत्न सन्मान’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक राठोड यांना हा पुरस्कार देण्यात आला.
ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात नेहमीच नवनवीन उपक्रम आणि समाजोपयोगी कार्य करतात. त्यांच्या विविध कार्याची व कामाची दखल घेऊन वेलनेस फाउंडेशन गुजरातच्या संस्थापिका सोमिया बाजपाई आणि सह संस्थापक हर्षित बाजपाई यांनी ‘विश्व रत्न सन्मान २०२४’ पुरस्कार राठोड यांना ऑनलाइन माध्यमाने प्रदान केला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक राठोड यांचे मित्र परिवारासह तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.