Hari Mandir Pratishthan : हरी मंदिर प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीचा सोहळा साजरा

0
2

ह.भ.प. गजानन महाराजांच्या प्रवचनाने वातावरण ‘विठ्ठलमय’

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील पोस्टल कॉलनी परिसरातील श्री हरी मंदिर प्रतिष्ठानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त रविवारी, ६ जुलै रोजी श्री हरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने हजेरी लावत आषाढी एकादशीचा आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या आरतीने झाली. आरतीनंतर ह.भ.प. गौ प्रेमी गजानन महाराज, वरसाडेकर यांच्या भव्य दिव्य प्रवचनाचे आयोजन केले होते. महाराजांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसरातील वातावरण विठ्ठलमय झाले. उपस्थितांनी भक्तीरसात तल्लीन होऊन प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचन झाल्यानंतर भाविकांना फराळाचे वाटप केले. त्यात साबुदाणा खिचडी, केळी, चिक्की आणि लाडू यांचा समावेश होता. भाविकांनी फराळाचा आस्वाद घेतला.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी कैलास भोळे, माजी नगरसेविका गायत्री राणे, उज्ज्वला बेंडाळे, प्रतिभा वारके, विलास चौधरी, प्रशांत भंगाळे, डॉ. गजानन पाटील, योगेश सूर्यवंशी, महेश खडके, दीपक किरंगे, बी. एस. पाटील, गिरीश भोळे, हितेश जावळे, सचिन महाजन, शैलेंद्र पाटील, मुकेश महाजन, कुशल महाजन, शेखर चौधरी, पंकज पाटील, जितेंद्र भोळे, मयूर भोळे, पवन शिरसाळे, मयूर भोळे, आशुतोष मनिवाल, भूषण पाटील, दीपक पाटील, विनोद महाजन, रितेश पाटील, नंदिनी गिरीश भोळे, रेखा रवींद्र जावळे, उषा बेहरे, भूमी वारके, सेजल वारके, ज्योती पंकज पाटील, पल्लवी कपिल पाटील आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here