Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»श्रीरामाच्या वनवास भारतासाठी आसेतुहिमाचल अभंग – दादा महाराज जोशी
    जळगाव

    श्रीरामाच्या वनवास भारतासाठी आसेतुहिमाचल अभंग – दादा महाराज जोशी

    SaimatBy SaimatJanuary 23, 2024No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतीनिधी

    श्रीरामांनी रघुकुलनीतीने पिताश्री दशरथांचे वचन खरे करण्यासाठी हे सर्व वनवास गमन सहज स्वीकारले. नुसते स्वीकारले नाही, तर संकटाचे सुसंगतपणे प्रतिबिंबित केले. सज्जन शक्तीला जागविले. वनवास ही पर्वाची देणगी आहे. श्रीराम वनवासात जेथे जेथे गेले, तेथे तेथे अयोध्येचा विस्तार झाला. श्रीरामाच्या चौदा वर्षांच्या वनवासामुळे भारतवर्ष आसेतुहिमाचल अभंग झाला. आजच्या भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक एकता ही श्रीरामाच्या वनवासाची परिणती आहे. असे हभप परमपूज्य दादा महाराज जोशी यांनी श्री राम कथेच्या चौथ्या दिवशी कथेत निरुपण केले.

    विवाहनंतर अयोध्येत आनंद आणि शांततेचे वातावरण होते. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चार भाऊ आपापल्या पत्नींसोबत सुखाने राहत होते. काही काळानंतर भरतचे मामा युधाजित यांनी भरतला सोबत घेतले. शत्रुघ्नही त्याच्यासोबत गेले. दुसरीकडे, अयोध्येत रामाने वडिलांसोबत प्रशासनात मेहनतीने काम करण्यास सुरुवात केली. जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेवून ते जनतेचे लाडके झाले. राजा दशरथ आपल्या पुत्र रामाला अशी लोककल्याणाची कामे करताना पाहून खूप आनंद वाटायचा. त्यांनी रामाला युवराज बनवायचे ठरवले. राजाने दुसऱ्याच दिवशी रामाच्या राज्याभिषेकाची घोषणा केली. अयोध्यानगरीत आनंदाचे वातावरण होते. पण ही बातमी ऐकून कैकेयीची दासी मंथरा हिला आनंद झाला नाही. रामाच्या अभिषेकाची सुवार्ता ऐकताच ती लगेच कैकेयीजवळ पोहोचली. तिने कैकेयीला रामाच्या राज्याभिषेकाची बातमी सांगितली. रात्री राजवाड्यात जाताना दशरथ राजाला कैकेयीच्या नाराजीचे कारण कळले. त्यांनी प्रेमाने दुःखाचे कारण विचारले आणि तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे, असे देखील सांगितले. हे सर्व ऐकून कैकेयीला संधीचा फायदा घ्यायचा होता. तिने राजाकडून मंथराने सांगितलेले दोन्ही वरदान मागितले. पहिले वरदान म्हणजे भरतला राजा बनवणे आणि दुसरे वरदान रामाला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवणे. हे दोन वरदान ऐकून राजा दशरथ आश्चर्याने आणि क्रोधाने भरला. रामाच्या वनवासाची बातमी ऐकून राजाला इतका मोठा धक्का बसला की तो बेशुद्ध झाला. शुद्धीवर आल्यानंतर कैकेयीला समजावले मात्र कैकेयी ऐकायला तयार नाही. राम आल्यावर दशरथने उठण्याचा प्रयत्न केला. पण ते उठू शकले नाही आणि पुन्हा बेशुद्ध झाले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर रामाने सीता आणि लक्ष्मणासोबत वनात जाण्याची परवानगी मागितली आणि वडिलांना धीराने सांत्वनही दिले. राम, लक्ष्मण आणि सीता राजवाड्यातून बाहेर आले. संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते. अयोध्या नगरवासी राजवाड्याबाहेर जमलेले असतांना राम, सीता आणि लक्ष्मण यांनी मंत्री सुमंत्राला रथासोबत पाहिले. राजा दशरथ, कौशल्या, सुमित्रा आणि नगरवासी रथाच्या मागे धावत होते. संपूर्ण शहरात ‘राम!’ राम… आमचा राम ! हे लक्ष्मण ! हे सीता !’ चे स्वर गुंजत होते. रथ दृष्टीआड होताच राजा दशरथ तिथेच खाली पडले. असे एक एक रामायणातील पान दादा महाराज जोशी उलगडत होतो.

    वनवास काळ हा धैर्यवान व्यक्तीस काय शिकवतो, तर प्राप्त परिस्थितीत वचनबद्ध राहणे, येणाऱ्या संकटांना तोंड देताना नीती न सोडणे, शत्रूचा जो बलवान शत्रू असेल त्याच्याशी मित्रता करणे, सामान्य जनांच्या अस्मितेला फुंकर घालून त्यांचे संघटित सैन्यात रूपांतर करणे. श्रीरामायणातील परमोच्च रोमांचक, जीवनदायी आणि वरदायनी काळ म्हणजे श्रीराम-सीता आणि लक्ष्मण यांचा वनवास. मुळात मोठ्या नव सायासाने प्राप्त झालेली दशरथ राजाची ही मुले स्त्रीहट्ट आणि पुत्रप्रेम यांच्यामुळे महाराज दशरथ यांच्या देखत विभागली गेली. असे देखील महाराजांनी सांगितले. श्री राम कथेचा चौथ्या दिवसाच्या कथेत भक्तांच्या मनाला पाझर फोडणारे भावनिक क्षण ऐकण्यात मग्न झाले होते.
    दरम्यान, कथाप्रारंभीपूर्वी ‘राम जी की निकली सवारी, रामजी की लीला है नारी’ हे गीत संघपाल तायडे यांनी सादर केले असून विशाल भोळे यांनी राम मंदिराची प्रतिकृती भेट देवून सन्मान केला. यानंतर एल.एच. पाटील शाळेतील विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा नृत्यव्दारे सादर केले. या संपूर्ण टीमसह राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची भूमिका सदर करण्याऱ्या विद्यार्थ्यांना राम मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली.
    चौथा दिवसाच्या कथा समारोपाच्या वेळी कथा मंचावर श्रीकांत भाऊ खटोड, बंडू दादा काळे, सुचिता ताई अतुलसिंग घडा, सोहम लालजी शर्मा (सपत्नीक), सुरेखा तायडे, गायत्री राणे, डॉ. वीरेंद्र खडके, भरत कोळी, नितीन पंजाबी, जगदीश चौधरी, दीपमला मनोज काळे,संजय शिंदे, राहुल घोरपडे, सुनील सरोदे, शक्ती महाजन, विनोद कुमावत, गोपाल सेनापती, महादू सोनावणे, महेश कापुरे आणि बडे जटाधारी महादेव मंदिर संस्थाचे जगदीश चौधरी, शामकांत जंगले आणि माजी मंत्री दशरथ भांडे, आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे यांच्यासह इतर मान्यवरांनी विधिवत आरती केली. यानंतर भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आला.
    पंच दिवशी म्हणजे बुधवार दि. 2४ जानेवारी रोजी श्रीराम कथेत हनुमंत भेट, बालीवध, वनलीला व सेतू बंध, विभीषण भेट, इंद्रजीत, कुंभकर्ण, रावणवध आणि सांयकाळी ५ वाजता प्रभु श्री राम यांचे राज्याभिषेक होऊन पंच दिवशीय कथा समाप्त होईल. शेवटच्या दिवसाची कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी पावणे दोन वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन आयोग समितीकडून करण्यात आले आहे.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी १२ कोटींचा क्रीडांगण विकास निधी मंजूर

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : ‘ऑपरेशन मुस्कान’ला यश: कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता १५ वर्षीय मुलगी

    January 22, 2026

    Erandol (Kasoda) : गुजरातमध्ये पत्नीच्या उपचारात गेलेल्या निवृत्त सोनाराचे घर साफ

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.