Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»प्रपोजल नाकारताच अल्पवयीन मुलीला संपवलं
    क्राईम

    प्रपोजल नाकारताच अल्पवयीन मुलीला संपवलं

    saimatBy saimatAugust 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण :

    कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची बुधवारी संध्याकाळी आपल्या आईसोबत घरी येत होती. तेवढ्यात सोसायटीच्या आवारातच आदित्य कांबळे या माथेफिरू तरुणाने तिच्यावर चाकूने सात-आठ वार करत तिच्या आईसमोर तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने त्याच्याजवळची फिनाइलची पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. या गोंधळात आरोपीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण, तो पूर्ण फिनेल घेणार त्यापूर्वी नागरिकांनी त्याला थांबवलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

    कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आदित्य कांबळे हा काही दिवसांपासून पाठलाग करीत होता. याबाबत मुलीने आईला माहिती दिली. त्यानंतर ही मुलगी बाहेर पडताना आई देखील तिच्यासोबत जात असे. बुधवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही मुलगी शिकवणीवरुन आईसोबत घरी येत होती. जिना चढत असताना अचानक आदित्य तिच्या समोर आला. तो तिथेच तिची वाट बघत थांबला होता. त्याला तिची घरी येण्याची वेळही माहिती होती. अल्पवयीन येताच त्याने तिच्यासोबत असलेल्या तिच्या आईला ढकलून दिलं आणि अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याने अल्पवयीन मुलीवर सात ते आठवेळा वार केले. आईने आपल्या मुलीला वाचवण्याता प्रयत्न केला, तेव्हा त्याने पुन्हा तिला ढकलून दिले.

    आईचा आरडाओरड ऐकून सोसायटीतील लोक जमा झाले. तेव्हा आदित्यने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळताना त्याने फिनेलची बाटली काढली आणि फिनेल घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, तो पूर्ण फिनेल घेणार त्यापूर्वीच नागरिकांनी त्याला पकडलं. रक्तबंबाळ झालेल्या अल्पवयीन मुलीला तात्काळ केडीएमसी अंतर्गत रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे तिचा मृत्यू झाला.

    गेल्या काही दिवसांपासून आदित्य या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. काहीच दिवसांपूर्वी त्याने या मुलीला प्रपोज केलं होतं. पण, तिने नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून आदित्यने या मुलीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या केल्याचं समोर आलंय, याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आदित्य कांबळे विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरू केला.

    आदित्यला तिची परत येण्याची वेळ माहीत असल्याने आणि तो इमारतीच्या दुसऱ्या विंंगमध्ये वाट पाहत होता. त्याने हल्ल्याची योजना आखल्याचा पोलिसांना संशय आहे. वेळ जाणून घेण्यासाठी त्याने एका रहिवाशाशी संपर्क साधला होता, असेही पोलिसांनी सांगितले. आरोपीला नंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Maharashtra Government :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ

    March 15, 2026

    Varangaon : वरणगाव पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूलसह आरोपी ताब्यात

    March 15, 2026

    Amalner : अमळनेर हादरले! भरधाव डंपरने तरुणाला चिरले जागीच मृत्यू

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.