सत्कारासाठी गुरुजन घरी येताच विद्यार्थी भारावले

0
57

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांच्या पालकांसोबत सत्कार केल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शाळेच्या अभिनव उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे. उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाही सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला.

मोनाली योगेश बनकर हिने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या ठरावाप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाची तिला संधी मिळाली आहे. तसेच राज्यस्तरीय तायक्वांदो खेळाडू जागृती रवींद्र चौधरी हिने खेळासोबतच शालेय अभ्यासातत प्राविण्य मिळवत शाळेतून ८७. ६० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला. गायत्री पंढरी मोहनी हिने ८३. ६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच रोशनी दीपक जवखेडे ८२. ८० टक्के, भाग्यश्री संतोष फुसे ८२ टक्के, रुचिता योगेश पाटील ८१. ४० टक्के, रोहिणी ज्ञानेश्‍वर दांडगे ७९. ८० टक्के, रूपाली सुरेश पाटील ७९.६० टक्के, केतन चंद्रकांत क्षीरसागर ७७. ६० आणि वेदांत अनिल क्षीरसागर ७७.२० टक्के या प्रथम १० गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसोबत पुष्पगुच्छ देत पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे, उपमुख्याध्यापिका के. ए. बनकर, तायक्वांदो प्रशिक्षक हरीभाऊ राऊत, लिपीक प्रकाश जोशी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक उपस्थित होते. शेवटी वर्ग शिक्षक शंकर भामेरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here