राज्य शालेय शिक्षण समितीच्या सदस्यपदी डॉ. ईश्‍वर पाटील

0
18

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. ईश्‍वर एस. पाटील यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण विकसन समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर आधारित केंद्राचा अभ्यासक्रम आराखडा तयार झालेला असतो. त्यानुसार राज्यातील सद्यस्थिती आणि आव्हानांचा विचार करून राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करायचा असतो. ही निवड प्रक्रिया जवळपास दीड वर्षांपासून सुरू होती. सुरुवातीला काही टप्पे ऑनलाईन स्वरूपात झाले. त्यासाठी शेवटची मुलाखत ही ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रत्यक्षात घेण्यात आली. निवड प्रक्रियेत महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सेवेत असलेले आणि निवृत्त झालेले असे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा समावेश होता. प्रत्यक्ष निवड प्रक्रियेची मुलाखत ही इन कॅमेरा घेण्यात आली. त्यात कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीचा समावेश होता. निवड प्रक्रियेत डॉ. ईश्‍वर एस. पाटील यांची गणित शिक्षणासाठी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली.

याबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार वसंतराव मोरे, प्रशासकीय अधिकारी तथा संचालक रोहन मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सुहास ग्रुप अमळनेर आणि सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here