‘इंडिया’कडून पंतप्रधानपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल?

0
12

साईमत, नवीदिल्ली ः वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एनडीएकडून पुढील पंतप्रधान पदाचा चेहरा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत तर, इंडिया आघाडीतून पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांचें नाव पुढे आले आहे.

इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार,असा प्रश्न सातत्याने एनडीएतील घटकपक्षातून विचारला जात होता मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी ‌‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार राहुल गांधी असतील अशी माहिती दिली. दरम्यान, इंडिया आघाडीत विविध विचारधारा असलेले अनेक पक्ष सामील आहेत. यामध्ये आम आदमी पक्षानेही सहभाग घेतला आहे.

मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने आपच्या मुख्य प्रवया प्रियंंका कक्कर यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचा चेहरा कोण असावा असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “केजरीवाल यांनी नेहमीच फायदेशीर आणि लोकहितार्थी असा अर्थसंकल्प सादर केला आहे.पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी एक प्रवक्ता म्हणून मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा प्रस्ताव देईन.”ते पंतप्रधान व्हाव्ो अशी माझी इच्छा आहे, परंतु निर्णय माझ्या हातात नाही”, असेही त्या पुढे म्हणाल्या. केजरीवाल यांच्या उमेदवारीबाबत बोलताना आपचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय म्हणाले, “प्रत्येक पक्षाला त्यांच्या नेत्याने पंतप्रधान व्हाव्ो असे वाटते.आप सदस्यांनाही त्यांचा अरविंद केजरीवाल पंतप्रधान व्हाव्ो असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here