शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाची सुरुवात
साईमत/नेरी, ता.जामनेर/प्रतिनिधी :
शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रब्बी) २०२५-२६ अंतर्गत जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी देवप्रिंपी गावात दाखल झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.बी.एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.एस.पाटील व विषयविशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवतील. कृषी दूत धिरज गोकुळ पाटील, श्रीकृष्ण पुंडलिक सोनोने, पैदीमरला नरसिंहा रेड्डी, शेखर नाना ठाकरे आणि विवेक प्रेमराज वरखड या गावात राहून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन देतील.
शेतजमिनीची माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, तंत्रज्ञानाचा वापर, पिकांवर येणारे रोग व त्यांचे निवारण या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. कृषी दूतांसोबत गावातील सरपंच तुकाराम निकम, उपसरपंच संजय पाटील व ग्रामसेवक अशोक पवार उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि ग्रामीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पिकांवरील रोग नियंत्रण व शेतीसंबंधी नवीन उपाययोजना याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांद्वारे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे मार्ग दाखवण्यात येणार आहेत.
