साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा केला. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील होते.
यावेळी वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले. यशस्वीतेसाठी सलीम तडवी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुभेदार मेजर श्रीराम पाटील तर नायक सुभेदार भटु पाटील यांनी आभार मानले.